×

नरेंद्र मोदी आरएसएसने ठेवलेलं बुजगावणं

Published On :    12 Sep 2021
साझा करें:

लातूर दौर्‍यात बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी डागली तोफ



लातूर : प्रस्थापित पक्ष ओबीसींची जातिनिहाय जणगणना करण्याची मागणी करत नाहीत पण ओबीसीची जणगणना झाली पाहिजे ही बहुजन मुक्ती पार्टीची मुख्य मागणी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल पाहिजे. कारण पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा संविधानात कुठेही नाही, ही मर्यादा न्यायालयाने लावली आहे. देशात ओबीसींची जनगणना झाली आणि बहजन मुक्ती पार्टीची सत्ता आली तर आम्ही ब्राम्हणांना केवळ ३.५ टक्के आरक्षण देऊ. नरेंद्र मोदी आरएसएसने ठेवलेलं बुजगावणं आहे, ह्या बुजगावण्यामागे एक मिश्यावालं झुरळ आहे अशा शब्दात बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर तोफ डागली.


बहुजन मुक्ती पार्टीचा सध्या महाराष्ट्रात राज्यस्तरीय दौरा सुरू आहे.  तो दौरा काल लातूर येथिल प्रतिम हॉटेल येथे जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ तर प्रमुख उपस्थिती म्हणून लखन चव्हाण युवा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी तसेच विचारमंचावर बालाजी कांबळे,  महाराष्ट्र राज्य प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चा, जिल्हा अध्यक्ष दत्ता करंजीकर, जिल्हा सचिव बंडुसिंग भाट (ठाकूर), राष्ट्रीय लिगांयत मोर्चाचे मनोज राघो व प्रदिप पवार, सनी बनसोडे सह इतर मान्यवर विचार मंचावर होते.  


यावेळी होवाळ आपले विचार व्यक्त करताना विविध समस्यांवर भाष्य केले. शेतकर्‍यांचा माल, सुशिक्षित बेरोजगार व बंद पडलेल्या शाळांची दखल घेताना सरकार दिसत नाही, ती दखल घ्यायला लावण्यासाठीच हा बहुजन मुक्ती पार्टीचा दौरा आहे. शेतकरी, सुशिक्षित बेरोजारांच्या सर्व मुद्याचं समर्थन बहुजन मुक्ती पार्टी करते. कारण बहुजन मुक्ती पार्टी केवळ एका जातीपुरती मर्यादीत नाही, या पार्टीत चार हजार आठशे जातींची लोक काम करत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात लातूरचा खासदार मुस्लिम असेल. आज मराठा आरक्षणासाठी मराठा समाजात संताप आहे. मराठा समाज देणारा होता त्याला प्रस्थापित पक्षांनी मागणारा केला. त्यामुळे मराठा समाजाने समिक्षा केली पाहिजे. मराठा समाजाचे शेकडो आमदार व दोन डझन खासदार असताना सुद्धा मराठा आरक्षण भेटत नसेल तर हे प्रतिनिधी नेमकं करतात तरी काय ? ते मराठा आरक्षणावर बोलणार आहेत का ? असा सवाल त्यांनी केला.


होवाळ म्हणाले, आमचा आमदार, खासदार आहे कोण ? तर बुजगावणं, पण चर्चा होतोय आमदार खासदार आहे तसेच नरेंद्र मोदी आरएसएसचं बुजगावण आहे, पण चर्चा होतेय प्रधानमंत्री असल्याची. जस पूर्वी कामासाठी सालगडी असायचे तस आता कॉंग्रेस भाजपने आपल्या आमदारांना सालगडी ठेवले आहे. देशात संविधान जाळले जात असताना हे भाजप कॉंग्रेसचे सालगडी  हिजड्यासारखं टाळ्या वाजवतात होते. आमच्यावर अन्याय अत्याचार होत असताना आम्ही निवडून दिलेला आपल्या जातीचा आमदार खासदार बोलत नसेल तर त्याच काय लोणचं घालायचं आहे का ? ह्या प्रस्थापितांना लाथ घालण्यासाठीच बहुजन मुक्ती पार्टी मैदानात आहे. 


आतापर्यत मुस्लिमांना विदेशी बोलणारा तो मिशीवाला झुरळ आता मुस्लिमांचा व आमचा डीएनए एकच आहे असे म्हणत आहे. विठ्ठलाची पुजा करण्याचा ठेका काय फक्त मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीनेच घेतला आहे का ? हाच कॉंग्रेस भाजपरूपी डोंगर आपल्याला हटवायचा आहे.  माळशिरस येथिल घटना पाहिल्यास कळते की, जिवंतपणी आमच्या लोकांचा सन्मान होत नाही आणि मेल्यानंतरही होताना दिसत नाही. इव्हीएम मशिन चोर आहे आणि निवडणूक आयोग चोरांचा सरदार आहे. बहुजन मुक्ती पार्टीचा जाहीरनामा हा शंभरच्या बॉंन्डपेपरवर असतो, असा जाहीरनामा देणारी बहुजन मुक्ती पार्टी हा देशातील पहिलाच पक्ष आहे. कारण आज कॉंग्रेस भाजपचा अस्त होताना दिसतोय आणि बहुजन मुक्ती पार्टीचा विकास होतोय हे वास्तव आहे. आमची सत्ता आल्यास तुम्हाला स्वातंत्र्य सैनिक म्हणून घोषित केले जाईल असे ते म्हणाले.


कोरोनापेक्षा लॉकडाऊनने लोक जास्त मरण पावली. लस घेणे ऐच्छिक आहे पण लस बंधनकारक कराल तर त्याला बहुजन मुक्ती पार्टीचा विरोध आहे. कारण लस बंधनकारक करणारे तुम्ही कोण? लसीमुळे काही झाल्यास आमच्या लोकांच्या जीवाची भरपाई सरकारने दिली पाहिजे. लसीची सक्ती करणार्‍या नाना पटोलेंनी स्वतः दहा बारा लस्सीचे डोस घ्यावेत. आज मंदीर उघडण्यासाठी राजू पेंटरसह भाजपचे लोक ओरडत आहे पण मंदीर ऑनलाईन व शाळा ऑफलाईन सुरू झाल्या पाहिजेत अशी बहुजन मुक्ती पार्टीची मागणी आहे. कॉंग्रेसच्या मागे फिरणारा मुस्लिम स्वतःला किती दिवस फसवणार आहे? कारण मुस्लिमांना जाळलं जात असताना शरद पवार, अजित पवार, वळसे पाटील राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी कधी निषेधाच सिंगल ट्विट केले आहे का ? 


लिंगायत हा स्वतंत्र्य धर्म आहे पण कॉंग्रेस भाजप सरकार त्याला मान्यता देत नाही परंतु बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता येताच त्याला मान्यता देऊ. देशात बहुजन मुक्ती पार्टीला संधी मिळाल्यास नरेंद्र मोदीच्या घराचे देखिल सरकारीकरण करू हा शब्द बहुजन मुक्ती पार्टी देत आहे. कारण प्रस्थापित पक्षाकडून मतदारांचा दर तोंड बघून ठरवला जातो, पण बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता आल्यास तुमचा दर ठरवणार्‍या पक्षाची मान्यता रद्द केली जाईल. तसेच बहुजन मुक्ती सत्तेत आल्यास पत्रकारांना संरक्षण दिल जाईल. तुम्हाला प्रतिनिधी करायचे आहे त्यासाठी निमंत्रण द्यायला देण्यासाठी राज्यस्तरीय दौरा करत आहे. आम्ही कोणाला फसवणार नाहीत, लोकांना फसवण्यापूर्वी आम्ही स्वतःला गोळी झाडून घेऊ असे त्यांनी शेवटी सांगितले.


कार्यक्रमाच्या सुरूवातीला बालाजी कांबळे म्हणाले की, प्रस्थापित पक्षांनी आमच्या लोकांची औकात ओळखली आहे, ती औकात दाखवण्यासाठी बहुजन मुक्तीची गरज आहे कारण प्रस्थापित पक्ष निवडणुकीपूर्वी एकट्याची भुमिका बजावतात आणि सत्ता स्थापन करताना त्रिकुट करतात हे ओळखा. आमच्या मुद्याच समर्थन कॉंग्रेस राष्ट्रवादी भाजप सेना वंचितचे लोक का करत नाहीत ? तसेच देशातील कोणताच पक्ष ईव्हीएमवर का बोलत नाही ? त्यामुळे यांची नाटक थांबवली पाहिजेत असे त्यांनी शेवटी सांगितले.


लखन चव्हाण म्हणाले की, आज देशात ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याच मुळ कारण ईव्हीएम मशिन व सत्तेवर बसलेले नालायक लोक आहेत. आम्हाला मागील ७५ वर्षात काय मिळालं ? याची समिक्षा करावी लागेल कारण आमच्या लोकांचा केवळ या व्यवस्थेने वापर केला आहे. तुम्हाला वाटत की, आमचा भैय्या, काका, मामा लोकप्रतिनिधी आहे पण हा तुमचा भैय्या, काका व मामा तुमच्या विरोधात संसदेत कायदे पास होताना तोंड बंद करून बसतो ? त्यामुळे या भैय्या काका मामांचा बंदोबस्त करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीला साथ द्या, कारण देशाची सत्ता गद्दारांच्या हातात गेली आहे ती सोडवायची असेल तर बहुजन मुक्ती पार्टीला साथ द्या असे म्हणाले.


या कार्यक्रमासाठी दगडू पडीले, एजाज तांबोळी, दीपक इंगळे, चंद्रसेन लहाडे, आंतेश्‍वर गायकवाड, डी.एम.कांबळे, जे.एम. उमरगेकर, दीपक कांबळे, राजेंद्र केंदळे, जमील अत्तार, राहुल जवळे, रवि कोरे, एन. ए. ईनामदार, मारूती माने, संतोष ननीर, वैशाली करंजीकर, दत्ता करंदीकर, बंडुसिंग भाट ठाकूर, ऍड. लक्ष्मी गिलचे, रामाजी गिलचे, राजेंद्र भदाडे, अशोक कांबळे, ऋषीकेश कांबळे, गुलाम देवणीकर, मुजीब देवणीकर, इंजि. तज्जमुल शेख, पत्रकार नवनाथ रेपे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार दत्ता करंजीकर यांनी मानले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस
शहीद भगतसिंग यांचे शिक्षण चिंतन
मुंबई महापालिका प्रमाणेच संपूर्ण १८ महापालिकांमध्ये १
एअर इंडिया खरेदीसाठी रतन टाटांची बोली
राज्यभरातील २४६ दुकानांना औषध विक्री बंद करण्याचे आदेश
अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपये
‘बार्टी’ची स्थिती कधी सुधारणार?बजेटमध्ये ३०० कोटी प्रत
१७५० ला पेशवाई आली असे अगोदर म्हणालात आता नाही म्हणता?
कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे
जातीनिहाय जनगनणेबाबत केंद्र सरकारवर दबाव टाकायला हवा
आरक्षण, जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनांसह राज्यसरका
जेवणाची भांडी वेगळी ठेवत शाळेत अनु.जातीच्या मुलांसोबत भ
ओबीसींचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी इम्पिरिकल डेटा रोख
अमेरिकन माध्यमांमध्ये नरेंद्र मोदींची भेट बेदखल
इंटरनेटवरील निर्बंध, नवीन आयटी नियमांवर फ्रीडम हाऊसचे भ
भारतीय विद्यार्थी मोर्चाचा ‘आक्रोश मोर्चा’
भारतात विज्ञान नष्ट, श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जलद कृती हवी
शेतकर्‍यांचा उद्या भारत बंद
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper