×

कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे शरद पवार बोलल्याने तुम्हांला राग का?

Published On :    27 Sep 2021
साझा करें:

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर ऍड. किरण चन्ने यांच्या प्रश्‍नावर भाजपाचे जयेश शिंदे यांची बोलती बंद



पुणे:  कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात आहे अशा प्रकारे वक्तव्य १ जानेवारी २०१८ रोजी शरद पवार यांनी केले. पवार यांचे ते वक्तव्य चुकीचे आहे असल्याची साक्ष भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी दिली. या त्यांच्या साक्षीवर ऍड. किरण चन्ने यांनी शिंदे यांची उलटतपासणी घेतली. कोरेगाव-भीमा दंगलीत हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचे शरद पवार बोल्याने तुम्हांला राग का? या ऍड. चन्ने यांच्या प्रश्‍नावर शिंदे यांची बोलती बंद झाली आणि त्यांनी भाजपा हा सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष असल्याची सारवासारव केली. आज कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर भीमा-कोरेगाव दंगलीची चौकशी करण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष जे.एन.पटेल व  आयोगाचे सदस्य सुमित मलिक यांच्यासमोर आज साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या.


कोरेगाव-भीमा दंगलीत माझ्या शोरूमचे नुकसान झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली व  त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी सरकारकडे अर्ज केला. सरकारकडून मला १ कोटी ६५ लाख नुकसान भरपाई मिळाली. माझ्या कामगारांनी शोमरूमला आग लावण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे मी तेथे हजर झालो. ज्या माणसाने आग लागल्याचा व्हिडीओ केला त्याला घेऊन या असे फर्मान आयोगाने सोडला. हे ऍफिडेव्हीट बनवताना कुणाची मदत घेतलीत? ऍफिडेव्हीटमध्ये कोण होते? त्यांची नावे सांगा? 


या प्रश्‍नावर केशव फडतरे, कांतीलाल फडतरे, विनायक गव्हाणे व इतर उपस्थित असल्याचे शिंदे यांनी सांगितले. हे जयसिंग भंडारे कोण आहेत असा प्रश्‍न ऍड.चन्ने यांनी विचारल्यावर शिंदे म्हणाले, ते वढू: बुद्रुकचे पोलीस पाटील आहेत असे सांगितले. म्हणजे जयसिंग भंडारे जसे सांगत आहेत तसे तुम्ही बोलत आहात ना..राजेंद्र गायकवाड यांना कधी व्यक्तीगत भेटला आहात का? या प्रश्‍नानंतर आयोगाचे अध्यक्ष पटेल यांनी मध्येच हस्तक्षेप करत दंगलीच्या अगोदर भेटला नाही का? असा सवाल केला. तर तुम्ही कुठल्या पक्षात काम करत आहात? आणि कधीपासून काम करत आहात? दंगल झाली तेव्हा पद काय होते? ऍड.चन्ने यांच्या प्रश्‍नांच्या सरबत्तीवर मी ७ ऑगस्ट २०२० पासून भारतीय जनता पार्टीचा कामगार आघाडीचा पुणे जिल्हाध्यक्ष असल्याचे शिंदे यांनी सांगितले.


शरद पवार यांनी वक्तव्य करून कुठल्या जातीय भावना दुखावल्या सांगाल का? असा सवाल ऍड.चन्ने यांनी विचारला. त्यावर शिंदे यांना उत्तर देता आले नाही. पवार यांनी काय वक्तव्य केले ते सांगाल का? या प्रश्‍नावर ग्रामस्थांकडून माहिती घेतली असता दंगलीमागे हिंदुत्वादी संघटनांचा हात आहे असे पवार म्हणाल्याचे शिंदे यांनी सांगितले. पवार असे म्हटल्यानंतर तुम्हांला राग येण्याचे कारण काय? भाजपाचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्ववादी आहात म्हणून राग आला का? या प्रश्‍नांवर शिंदे यांनी पवारांचे बोलणे चुकीचे होते असे त्यांनी पालूपद लावले. 


भाजपा हिंदुत्वादी पक्ष आहे हे तुम्हांला मान्य आहे का? ऍड.चन्ने यांच्या प्रश्‍नावर आम्हांला सर्वधर्मसमभाव पाहिजे. भाजपा सर्वधर्मसमभाव आहे असे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आपले शिक्षण काय? शिंदे म्हणाले, दहावी. हिंदुत्ववादी शब्दाचा अर्थ माहित आहे का? असा प्रश्‍न विचारल्यावर शिंदे यांची भंबेरी उडाली. मी केवळ मीडियात आणि पुस्तकात वाचले आहे. 


भगवा झेंडा हातात असणे म्हणजे हिंदुत्वादाची व्याख्या शिंदे यांनी केली. त्यांना हिंदुत्ववाद म्हणजे काय हे सांगता आले नाही. लोकांच्या हातात भगवा झेंडा हे सांगायचे नाही, धारणा काय आहे? यावर बोला, तुम्हांला सांगता येत नाही का? असा प्रश्‍न न्या. जे.एन. पटेल यांनी विचारला असता शिंदे यांची ततपप झाली. भाजपाचा स्टडी केला आहे का? ऍड.चन्ने यांच्या प्रश्‍नावर शिंदे यांना काहीच बोलता आले नाही, माहिती नाही असे सांगा ना, अशी टीप्पणी चन्ने यांनी केली.


तुम्हांला हिंदुत्वादी शब्दाचा अर्थ माहित आहे का? शरद पवारांनी चुकीचे वक्तव्य केले होते का? कोर्टात तसे तुम्ही सांगत आहात. ऍड.चन्ने यांच्या प्रश्‍नावर शिंदे यांच्याकडे कुठलेही उत्तर नव्हते. भाजपाच्या  मातृसंघटनेची पुस्तके न वाचल्याने शिंदे यांना विचारधारा सांगता येत नाही का? असा खोचक सवाल ऍड. चन्ने यांनी केला. यावर मध्येच हस्तक्षेप करत न्या. जे.एन.पटेल यांनी शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत भाजपाची विचारधारा माहित नाही का? असा सवाल केला. संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांच्या संघटना माहित आहेत का? या प्रश्‍नावर मी केवळ त्या व्यक्तींना ओळखतो असे शिंदे यांनी मोघम उत्तर दिले. त्यांच्या संघटनेबाबत माहिती नाही का? असा सवाल न्या. पटेल यांनीही केला. त्यावरही शिंदे यांना बोलताच आले नाही.


भिडे यांची हिंदुत्ववादी विचारधारा फॉलो करता का? शिंदे म्हणाले माहित नाही, तसेच प्रिंट मीडिया व सोशल मीडियात आले होते की, एकबोटे आणि भिडे यांच्या संघटना दंगलीत कार्यरत आहेत यावर काय म्हणाल? या प्रश्‍नावर शिंदे यांनी टोलवाटोलवी करीत मीडियात आले असेल एवढेच उत्तर दिले. त्याच्याच आधार घेऊन शरद पवार असे म्हणाले असावेत अशी टीप्पणी ऍड.चन्ने यांनी केली. शिंदे यांनी केलेले ऍफिडेव्हीट  भरपाई मिळावी म्हणून केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर केल्याचे ऍड.चन्ने यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.


ऍड.चन्ने यांनी उलटतपासणी घेतल्यानंतर ऍड. राहुल मखरे यांनीही शिंदे यांची उलटतपासणी घेतली. तुम्ही कोरेगाव-भीमावरून वाघोलीला किती वाजता गेला? ऍड. मखरे यांच्या प्रश्‍नावर शिंदे यांनी ३१ डिसेंबरला आदल्या दिवशीच गेल्याचे सांगितले. तुमच्यावर १ जानेवारीच्या दंगलीच्या अगोदर बरेच कर्ज होते. तुमच्या गाड्या तुम्ही विकल्या होत्या? हे खरे आहे का? या प्रश्‍नावर त्यांनी काहीच बोलले नाही. आरएसएसबद्दल काही माहित आहे का? शिंदे म्हणाले, मी स्वयंसेवक आहे. किती वर्षापासून असा सवाल ऍड. मखरे यांनी केला. तीन वर्षापासून परंतु २०१५ पासून त्यांच्या संपर्कात आहे. 


आरएसएसची विचारधारा काय आहे? त्यांच्या कधी कार्यक्रमांना गेला होता का? तुमची उपस्थिती होती का? एकदा गेलो होतो असे शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या कार्यक्रमात गेला होता मग त्यांचे काही तरी आवडले असेल ना? मला विचारधारा माहित नाही असे त्यांनी सांगत उत्तर देण्यास टाळाटाळ केली. आरएसएस हिंदुत्ववादी संघटना आहे का? या प्रश्‍नावर मला माहित नाही असे शिंदे यांनी सांगितले.


वढू बुद्रुक येथील लोक संभाजी महाराजांच्या समाधीची स्वच्छता करतात तुम्ही कधी गेला आहात का? मी कधी गेलो नाही असे सांगतानाच एकदा गेलो होतो असे संभ्रम निर्माण करणारे उत्तर दिले.  तुम्हांला सीडी दाखवतो, त्यावरूनही प्रश्‍न विचारतोे, त्यात शिंदे यांचेच वक्तव्य आहे. त्या सीडी दाखवण्याचा प्रयत्न करताच त्या दाखवू नका असे न्या. पटेल यांनी सांगितले. १ जानेवारीला बंद पुकारला होता का? तुमचे शो रूम बंद होते की गावदेखील बंद होते? ऍड. मखरे यांच्या प्रश्‍नावर शिंदे म्हणाले, माझे शोरूम सुरू होते असे सांगत त्यांनी खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. तुमचे शोरूम बंद होते खोटे कशाला बोलताय असा सवाल करताच शिंदे निरूत्तर झाले.


तुमचे फेसबुक अकाऊंट आहे का? शिंदे म्हणाले, आहे. अतुल शिवले-देशमुख मित्र आहेत का? या प्रश्‍नावर माझे पाच हजार मित्र आहेत असे उत्तर त्यांनी दिले. कोणत्या नावाने अकाऊंट आहे? ते म्हणाले, जयेश शिंदे या नावाने फेसबुक अकाऊंट आहे. तुमचीच ही पोस्ट आहे का? ऍड. मखरे यांनी आयोगासमोर पुरावा दिला. शिंदे यांच्यासमोर पुरावा ठेवताच हो ही पोस्ट माझीच आहे अशी कबुली दिली. अतुल शिवले-देशमुख फेसबुक मित्र आहे का? शिंदे म्हणाले, तपासावे लागेल. 


तुमचे लातूर-उस्माबादचे मित्रही आहेत यावर शिंदे यांनी मी काय सांगणार असे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. या पोस्ट तुमच्या मित्राने टाकल्या आहेत, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? ऍड. मखरे यांच्या प्रश्‍नावर मी सहमत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. ज्यावेळी तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेला होतात त्यावेळी तुमच्याबरोबर बाबुराव पाचर्णे होते का? त्यांनी नाही असे उत्तर दिले. तुम्ही कधी निळा झेंडा हातात घेतला आहे का? पूजा वगैरे करताना घेतला असल्याची त्यांनी कबुली दिली. एवढेच नाही तर जीवनातील पहिली गाडी निळी घेतली असे बळेबळे सांगण्याचा प्रयत्न केला. निळा फक्त महार, बुद्धीस्टांनीच घ्यायचा का? असे काही नाही असे शिंदे यांनी सांगितले.


तुमचे कर्मचारी अनिल यांचे पूर्ण नाव सांगाल का? नंतर सांगतो असे सांगत शिंदे यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावरून शिंदे यांना त्यांच्या कर्मचार्‍याचेही पूर्ण नाव माहित नव्हते. अनिलने मला फोन केला येथे दंगासदृश्य वातावरण आहे तुम्ही इकडे या. निळे झेंडे आणि काठ्या घेऊन लोक आली आहेत असे अनिलने मला सांगितले. यावरून न्या. पटेल म्हणाले, अनिलला बोलवावे असे फर्मान सोडले. परंतु अनिल काही उपस्थित नव्हता. तुम्ही तयारी करून या असे शिंदे यांना न्या. पटेल यांनी बजावले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
आरोग्य विभागाचा गोंधळ सुरुच, वेगवेगळ्या संवर्गाच्या पर
भारतात दरवर्षी ४० टक्के अन्न होते खराब, २० कोटी लोक दररोज
दररोज ३० लाख मुलांना पुरेल इतके अन्नधान्य गोदामात जाते व
स्वाभीमानाची ज्योत पेटवणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper