×

शहीद भगतसिंग यांचे शिक्षण चिंतन

Published On :    28 Sep 2021
साझा करें:

२८ सप्टेंबर भारतीय स्वातंत्र्यसूर्याचा जन्म दिन ! समस्त जनतेसाठी खरे स्वातंत्र्य आणू पाहणारे शहीद-ए-आजम भगतसिंग या स्वातंत्र्यसूर्याचा जन्म दिन! भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे डोळस वृत्तीने पाहून ‘स्वातंत्र्य म्हणजे गोर्‍याऐवजी काळे’ असे आंधळे विचार न स्वीकारता शोषकव्यवस्थेचा अंत म्हणजे खरे स्वातंत्र्य अशी वैचारिक मांडणी स्वातंत्र्यसूर्य शहीद भगतसिंग यांनी केली.



२८ सप्टेंबर भारतीय स्वातंत्र्यसूर्याचा जन्म दिन ! समस्त जनतेसाठी खरे स्वातंत्र्य आणू पाहणारे शहीद-ए-आजम भगतसिंग या स्वातंत्र्यसूर्याचा जन्म दिन! भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे डोळस वृत्तीने पाहून ‘स्वातंत्र्य म्हणजे गोर्‍याऐवजी काळे’ असे आंधळे विचार न स्वीकारता शोषकव्यवस्थेचा अंत म्हणजे खरे स्वातंत्र्य अशी वैचारिक मांडणी स्वातंत्र्यसूर्य शहीद भगतसिंग यांनी केली. जन्म दिनाच्या निमित्ताने क्रांतिलढ्याला वैचारिक अधिष्ठान देणार्‍या स्वातंत्र्यसूर्य शहीद भगतसिंग यांच्या विचाराचे हे मुक्तचिंतन...


आज आपले शिक्षण हे कुचकामी आणि निरूपयोगी बनले आहे, आणि विद्यार्थी युवकांची पिढी आपल्या देशाच्या व्यवहारात अजिबात भाग घेत नाही. त्यांना याबाबतचे काहीच ज्ञान असत नाही. ते जेव्हा शिकून बाहेर पडतात. तेव्हा यापैकी काहीच उच्च शिक्षण घेऊ शकतात. परंतु ते अशा वायफळ व बालिश गोष्टी करतात की, त्या ऐकून पश्चाताप करत बसण्याशिवाय काहीच मार्ग उरत नाही. असे रोखठोक प्रतिपादन जुलै १९२८ च्या ‘किरती’ नियतकालीकात प्रकाशित लेखात स्वातंत्र्यसूर्य शहीद भगतसिंग यांनी केले. आजपासून ८२ वर्षांपूर्वी लिहिलेले हे विचार आजही तंतोतंत लागू पडतात. 


शिक्षण व्यवस्थेतून वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिप्रामाण्यवाद निर्माण होण्याची अपेक्षा असताना केवळ पोपटपंची करणार्‍या विद्यार्थ्याचीच निर्मिती होत असल्याने भगतसिंगांच्या विचारांची तीव्रता लक्षात येते. याच लेखात भगतसिंग पुढे लिहितात, पुढे जे नवयुवक देशाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांची बुद्धी आजच पंगू बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचे भविष्यात काय परिणाम होतील, हे आपणच समजून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याचे मुख्य काम शिक्षण घेणे हे आहे. 


हे आम्हाला मान्य आहे आणि त्यांनी आपले पूर्ण लक्ष्य त्यावर केंद्रीत करावे, पण देशाच्या सद्य:स्थितीचे ज्ञान आणि ती सुधारण्याचे उपाय याचा विचार करण्याची क्षमता विकसित करणे, याचा शिक्षणात समावेश असू नये ? आणि जर नसेल तर, जे शिक्षण फक्त कारकून करण्यासाठी घेतले जाते, त्या शिक्षणाला आम्ही निरुपयोगी मानतो. आजच्या आपल्या शिक्षणव्यवस्थेकडे आणि विद्यार्थ्याकडे पाहिल्यावर भगतसिंगाचे वरील उद्गार किती महत्त्वाचे ठरतात, याचे प्रत्यंतर येईल. आजच्या विद्यार्थी युवकाला शिक्षणाच्या व्यापारीकरणापेक्षा क्रिकेटची मॅच महत्वाची वाटते. क्रिकेटच्या सामन्याची तिकिटे मिळविण्यासाठी पोलिसांच्या लाठ्या खाणारे युवक भ्रष्टाचार, धर्माधता, बेरोजगारी, जातीय विद्वेश, अन्याय याविरोधात लाठ्या खायला मात्र तयार नाहीत.



विद्यार्थ्यांच्या सामाजिक व  राजकीय उदासिनतेवर भाष्य करतांना स्वातंत्र्यसूर्य शहीद भगतसिंग लिहितो, तरुण विद्यार्थ्यानी राजकारणात किंवा राजकीय कार्यात भाग घेऊ नये, अशा मतांचा गलबला हल्ली फार वाढला आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेतांनाच ‘राजकीय कार्यात भाग घेणार नाही’ अशा आशयाच्या अटींवर सह्या करायला भाग पाडलं जातं, ही खेदाची बाब आहे. विद्यार्थ्यांना राजकीय कार्याप्रती उदासिन बनवलं गेल्याने राजकीय जागृती होऊ शकत नाही. 


किंबहुना विद्यार्थी युवक राजकारणापासून दूर राहिल्याने सत्ताधार्‍यांचाच फायदा होणार असतो. म्हणून युवकांना राजकीय-सामाजिक कार्याप्रती पंगू बनविले जाते. शहीद भगतसिंग हे ‘विचारवंत क्रांतिकारक’ होते. विचारांशिवाय क्रांती होऊ शकत नाही. ही बाब त्यांना ठाऊक होती. पण त्यांची क्रांती हिंसक क्रांती नव्हती. तर सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी होती. क्रांतीच्या  संदर्भात स्वातंत्र्यसूर्य शहीद भगतसिंग म्हणतात, क्रांती हा मानवजातीचा जन्मजात अधिकार आहे, की जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. 


स्वातंत्र्यसूर्य शहीद भगतसिंगांनी वर उल्लेख केलेली क्रांती राजकीय परिपक्वतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. क्रांतिसाठी अभिप्रेत असणार्‍या राजकीय शिक्षणाची अशावेळी नितांत गरज भासते. राजकीय शिक्षण ही एक प्रवाही व निरंतर विकसित होत जाणारी बाब असते. म्हणूनच सत्ताधारी विद्यार्थी युवकांना राजकीय शिक्षणापासून दूर ठेऊ इच्छितात. शहीद भगतसिंग यांनी त्यावेळी मांडलेली शैक्षणिक सामाजिक-राजकीय व्यवस्था आजही फारशी बदललेली दिसून येत नाही. म्हणून मग आता प्रश्न उपस्थित होतो की, ही परिस्थिती का बदलली नाही ?


आपल्या देशात शेकडो राजकीय पक्ष, हजारो नेते आणि लाखो संघटना आहेत. हे सर्व आपणच सामान्य जनतेचे तारणहार असल्याचे भासवतात. पण सामान्य माणसाचे जीवन जगण्याचे प्रश्न दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहेत. जुन्या प्रश्‍नात नव्या समस्यांची भर पडतच आहे. सत्तेवर येण्यासाठी आश्‍वासनांची खैरात केली जाते. तरुणांना तर स्वप्नांच्या दुनियेत झुलत ठेवले जाते. बेरोजगारी, शिक्षणाचे खाजगीकरण, महागाई याकडे लक्ष जाणार नाही, असे तरुणांचे स्वप्नरंजन करणारी माध्यमे निर्माण केली जात आहेत. अशावेळी ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस उपाययोजनांचीच गरज आहे. 


शहीद भगतसिंग यासंदर्भात लिहितात. देशाला एका आमूलाग्र परिवर्तनाची गरज आहे. आणि ज्यांना ही गोष्ट उमजली आहे, त्यांचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी साम्यवादी सिद्धांतावर आधारित समाजाची पुननिर्मिती केली पाहीजे. जोपर्यंत हे केले जात नाही आणि माणसाचे माणसाकडून होणारे शोषण किंवा ज्याला आपण साम्राज्यवाद म्हणतो, ते एका राष्ट्राचे दुसर्‍या राष्ट्राकडून होणारे शोषण नष्ट केले जात नाही, तोपर्यंत, मानवतेची यातनांतून सुटका होणार नाही, आणि तोपर्यंत युद्ध थांबवून विश्‍वशांतीचे युग निर्माण करण्याच्या सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ ढोंग आहे.


आज अनेक प्रश्नांचा ढिग आपल्यापुढे उभा आहे. शिक्षण समाज आणि राजकीय आर्थिक प्रश्नांच्या मुक्ततेसाठी स्वातंत्र्यसूर्य शहीद भगतसिंगांनी वर म्हटल्याप्रमाणे आमुलाग्र  परिवर्तनाचीच  गरज आहे. शहीद भगतसिंगाच्या विचारांवर समाजाची पुन: निर्मिती करण्यासाठी त्यांचे विचार समजून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, कारण त्यावर आपले आणि आपल्या राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे.

प्रा. डॉ. प्रवीण  बनसोड
९४२३४२५१२९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गुन्हेगारीमध्ये तामिळनाडू नंबर १, महाराष्ट्र पाचवे; उत्
शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भाजप प
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
आरोग्य विभागाचा गोंधळ सुरुच, वेगवेगळ्या संवर्गाच्या पर
भारतात दरवर्षी ४० टक्के अन्न होते खराब, २० कोटी लोक दररोज
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper