×

मुंबई महापालिका प्रमाणेच संपूर्ण १८ महापालिकांमध्ये १ वॉर्ड पध्दती लागू का नाही?

Published On :    28 Sep 2021
साझा करें:

मुंबई महापालिकेत वॉर्ड पध्दती व बाकी महापालिकेत प्रभाग पध्दती असा भेदभाव का? बाकीच्या महापालिकांनी पाप केले काय? असे अनेक प्रश्‍न उद्भवतात. सरकारने आगामी १८ पालिका निवडणुकीसाठी प्रभागाऐवजी एक सदस्यीय वार्ड पध्दत जाहीर केली होती.



मुंबई महापालिकेत वॉर्ड पध्दती व बाकी महापालिकेत प्रभाग पध्दती असा भेदभाव का? बाकीच्या महापालिकांनी पाप केले काय? असे अनेक प्रश्‍न उद्भवतात. सरकारने आगामी १८ पालिका निवडणुकीसाठी प्रभागाऐवजी एक सदस्यीय वार्ड पध्दत जाहीर केली होती. परंतु आता मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला. हा सरकारचा चुकीचा निर्णय असल्याचे मी समजतो. कारण गेल्या एक वर्षापासून पालिका निवडणुकीसाठी एक वॉर्ड पध्दती होईल असे सरकारकडून संकेत होते आणि त्या पध्दतीने कार्य सुध्दा सुरू होते. २२ सप्टेंबर बुधवारला सरकारनेच मन पलटले व फक्त मुंबई सोडून १७ महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पध्दती घोषित केली. हा सरकारचा निर्णय  हेतू पुरस्तररीत्या असावा असे वाटते.


मुंबईत एक वॉर्ड पध्दती व बाकीच्या १७ महापालिकेत प्रभाग पध्दती हा कुठला न्याय म्हणावा? महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करून राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदामध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती. नंतर २००२ मध्ये चार सदस्यीय प्रभाग पध्दती अमलात आणली. परंतु प्रभाग पध्दतीमध्ये वार्डाचा विकास खुंटतो ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लक्षात आली व २००७ मध्ये पुन्हा वॉर्ड पध्दती लागू करण्यात आली. 


यानंतर राज्यात भाजपाची सरकार सत्तेमध्ये आली असतांना २०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबई वगळून अन्य महापालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली होती. या निर्णयाचा फायदा भाजपाला झाला होता असे आघाडी सरकारमध्ये चर्चा सुरू झाली. त्यामुळे सत्तांतर झाल्यानंतर आघाडी सरकारने हा निर्णय फिरवून पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पध्दत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आघाडी सरकारने स्वत:चे स्वार्थ लक्षात घेऊन तीन सदस्यीय प्रभाग पध्दती अमलात आणल्याचे दिसून येते. 


कारण प्रभाग पध्दतीचा फायदा फक्त राजकीय पक्षांनाच (क्षेत्रीय व राष्ट्रीय पक्षांना) होतो. यात अपक्ष उमेदवार घायाळ होतात. कारण प्रभाग पध्दती म्हणजे मिनी विधानसभा निवडणुक. परंतु आघाडी सरकारने तीन प्रभाग पध्दती निर्णय घेवून घोडचूक केल्याचे दिसून येते.कारण प्रभाग पध्दतीमध्ये जर तीनही नगरसेवक एकाच विभागातुन निवडणूक आल्यानंतर प्रभागातील इतर वॉर्डाकडे दुर्लक्ष करतात ही सत्य परिस्थिती आहे. 


एखादा व्यक्ती आपल्या कामासाठी नगरसेवकाकडे गेला असता तो नगरसेवक दुसर्‍या नगरसेवकाकडे बोट दाखवितो. यामुळे वॉर्डाच्या विकासात व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे नगरसेवक हा ठराविक वॉर्डापुरता सिमीत असावा.तेव्हाच त्याचे संपूर्ण लक्ष वार्डाकडे केंद्रीत राहील व नगरचा विकास होईल.


प्रभागपध्दतीमध्ये असेही लक्षात आले की नगरसेवक फक्त आपल्या एरियापुरतेच सिमित काम करून प्रभागातील इतर एरीयाकडे दुर्लक्ष करीत असतात.आजही अशी परिस्थिती आहे की आपल्या प्रभागातील नगरसेवक किंवा नगरसेविका कोण आहे हेसुद्धा बर्‍याचशा लोकांना माहित नाही किंवा त्यांचा चेहरा सुद्धा पहायला नाही. त्यामुळे सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा व मुंबई प्रमाणे एक वार्ड पध्दत संपूर्ण महापालिककांसाठी लागू करावी. 


प्रभाग पध्दतीमध्ये कॉंग्रेस,भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांना अवश्य लाभ मिळेल. परंतु जे उमेदवार सामाजिक कार्याच्या ताकदीवर निवडणूक लढु इच्छितात अशा अपक्ष उमेदवारांचे काय? याचाही विचार सरकारने करायला हवा. प्रभाग पध्दतीची निवडणूक म्हणजे धनाढ्य उमेदवारांची निवडणूक असे म्हणायला हरकत नाही.सरकारने सत्तेचे व स्वहीताचे राजकारण न करता जनहीताचे राजकारण केले पाहिजे व एक वॉर्ड पध्दती करून सर्वसामान्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार द्यायला पाहिजे. 


सर्वसामान्य व्यक्तीची ताकत  तीन सदस्यीय प्रभागात पोहचुच शकत नाही. कारण तीन प्रभाग पध्दतीत सर्वसामान्य व्यक्ती तन,मन आणि धनाने संपूर्णपणे खचुन जातो. याची दखल आघाडी सरकारने व राज्यपालांनी घेतली पाहिजे. तीन सदस्यीय प्रभाग पध्दती पुन्हा अमलात आली तर सर्वसामान्यांचे स्वतंत्र हिरावल्यासारखे होईल. त्यामुळे मी सरकारला आग्रह करतो की समान अधिकार या अंतर्गत मुंबई प्रमाणे संपूर्ण १८ महानगरपालिकामध्ये एक वॉर्ड पध्दती अमलात आणावी तेव्हाच सर्वसामान्यांना योग्य न्याय मिळेल व वॉर्डाचा विकास भरभराटीला येईल.माझ्या पत्र्याची दखल सरकार अवश्य घेईल असे मला वाटते.        
 
रमेश कृष्णराव लांजेवार    
९९२१६९०७७९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
आरोग्य विभागाचा गोंधळ सुरुच, वेगवेगळ्या संवर्गाच्या पर
भारतात दरवर्षी ४० टक्के अन्न होते खराब, २० कोटी लोक दररोज
दररोज ३० लाख मुलांना पुरेल इतके अन्नधान्य गोदामात जाते व
स्वाभीमानाची ज्योत पेटवणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper