×

‘बार्टी’ची स्थिती कधी सुधारणार?बजेटमध्ये ३०० कोटी प्रत्यक्षात मिळाले ९१.५० कोटी

Published On :    28 Sep 2021
साझा करें:

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेच्या केवळ घोषणा



पुणे:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेचे अनुदान गेल्या दोन वर्षापासून रखडलेले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून या मु्द्यावर सरकारला घेरले. यानंतर जनतेमध्ये सरकार विरोधात असंतोष निर्माण होत होता. 


माध्यमांचा आणि सामाजिक संघटनांचा दबाव वाढताच सरकारने बार्टीला तात्काळ ९० कोटी रुपयांचा निधी बार्टीच्या कामकाजाकरीता तसेच दीड कोटी रुपये महाड येथील स्मारकाला देण्याची घोषणा केली. त्यानुसार निर्णय झालासुद्धा, परंतु मिळालेली निधीची तरतूद ही अल्पच आहे.


गेली दोन वर्षे बार्टीचे अनुदान थकलेले असल्याने या विविध महत्त्वाकांक्षी योजनांना ब्रेक लागलेला होता. या अगोदरच उच्च शिक्षणातील फ्रिशिप सवलती बंद आहेत, स्वाधार, परदेशी शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप मिळत नसल्याच्या अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. 


सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी घोषणा माध्यमांमध्ये केली. परंतु सरकारने मंजूर केलेला हा निधी अर्थसंकल्पातील निधीपेक्षा अतिशय तुटपुंजा असून सरकारने मागासवर्गीय समाजाच्या तोंडाला केवळ पाने पुसली असल्याचा आरोप केला जात आहे.


राज्य सरकारने मागील दोन वर्षांपासून अनुदान बंद केले होते. या दोन वर्षाचा मोठा अनुशेष बाकी आहे. बार्टीला ३०० कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद आहे. अशा स्थितीत सरकारने केवळ ९० कोटी रुपयांचा अल्प निधी देत हे सरकार बार्टीला निधी कमी पडू देणार नाही, असे सांगत आहे. 


वास्तविक दोन वर्षांचा असलेला अनुशेष पाहता हा निधी बार्टी कर्मचारी अधिकारी यांचे पगार, जाहिरात, आणि इतर खर्च यातच हे पैसे वापरले जातील. यानिमित्ताने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मागासवर्गीयांना केवळ गाजर दाखवले आहे. महाजोतीसाठी १६३ कोटी, सारथीसाठी १४१ कोटींची तरतूद असताना केवळ बार्टीला केवळ ९० कोटी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या उपलब्ध केलेल्या निधीमध्ये सध्या अस्तित्वातील योजनांना देखील हा निधी पुरणारा नाही.


सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर या अगोदरही १०५ कोटींचा निधी परत घालवल्याची टीका अमोल वेटम यांनी केली होती. गेल्या पाच वर्षात सामाजिक न्याय विभागाचे १४ हजार १९८ कोटी निधी अखर्चित राहिलेला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ६७ टक्के निधीची कपात करण्यात आली आहे. या स्थितीत इतक्या तुटपुंज्या अनुदानात बार्टीला निधी कमी पडू न देण्याची सामाजिक न्याय मंत्र्यांची घोषणा केवळ राजकीय आश्‍वासन आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गुन्हेगारीमध्ये तामिळनाडू नंबर १, महाराष्ट्र पाचवे; उत्
शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भाजप प
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
आरोग्य विभागाचा गोंधळ सुरुच, वेगवेगळ्या संवर्गाच्या पर
भारतात दरवर्षी ४० टक्के अन्न होते खराब, २० कोटी लोक दररोज
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper