×

सामाजिक बांधीलकीतून समजते समाजातील व्यक्तीमत्व

Published On :    29 Sep 2021
साझा करें:

सरकारी निमसरकारी किंवा राजकीय पक्षात, संस्था, संघटनेत पदावर असतांना जी माणसं पदाचा गर्व न बाळगता तळागाळातील माणसांशी माणसासारखे वागतात तेच खरे पदाधिकारी किंवा अधिकारी सन्मानासाठी पात्र असतात.



सरकारी निमसरकारी किंवा राजकीय पक्षात, संस्था, संघटनेत पदावर असतांना जी माणसं पदाचा गर्व न बाळगता तळागाळातील माणसांशी माणसासारखे वागतात तेच खरे पदाधिकारी किंवा अधिकारी सन्मानासाठी पात्र असतात. त्यामुळेच ते सेवानिवृत्ती नंतर ही समाजावर प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्त्व ठरतात. तर काही लोक पदावर असतांना किंवा अधिकारी असतांना समाजातील माणसांपेक्षा स्वतःला वेगळे समजतात ते लोक निवृत्तीनंतर कोणत्याही समाजाच्या माणसावर प्रभाव पाडू शकत नाहीत.


 माणसाचे महत्व पद मिळाल्यामुळे किंवा शिक्षणामुळे कधीच वाढत नाही, तो सामाजिक बांधिलकी ठेऊन किती कर्तृत्व, नेतृत्व दाखवितो, यावर त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते. शाळा कॉलेज मधील गुणवत्ता आणि समाजातील वागणूक हेच गुणवत्ता कर्तृत्वात नसेल तर पद मिळाल्यामुळे अहंपणा,गर्व चढला असेल तर कालांतराने त्याचा गर्व खाली होतो.


पदामुळे तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते, पदामुळे आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित पूर्ण वेळ देऊन पार पाडली पाहिजे, चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे, ज्यांनी तुमच्यासाठी कष्ट घेतले व त्याग केला त्यांची जाणीव ठेवली पाहिजे. पद कधी तरी जाणारच पण गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे, असे पदाधिकारी अधिकार्‍यांनी माणसांशी वागले पाहिजे. 


नाहीतर समाज तुमचे कर्तृत्व, वागणं, बोलणं, पाहत असतो, ऐकत असतो अनं सहनही करत असतो, मात्र योग्य वेळ आल्यावर असा धडा शिकवतो की तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते. म्हणूनच पद प्रतिष्ठा गाडी,बंगला,सोने चांदी,संपत्तीचा अहंकार  ठेऊन माणसांशी वागू नये. तर माणसासारखे निट वागा, निट बोला व आपले कर्तृत्व चांगले आहे हे सिध्द करा, तरच लोक तुमच्या सोबत कायमस्वरूपी राहतील आणि तुम्ही त्यांच्या आठवणीत राहाल.


गोरगरीब कष्टकरी माणसांवर किंवा साधारणपणे सामान्य मध्यमवर्गीय समाज बांधवांवर सामाजिक नेत्यांचा प्रभाव असतो असं आपण गृहीत धरतो.  समाजात सामाजिक बांधीलकी ठेवणार्‍या नेत्यांनी कोणत्या गोष्टीचे समाज प्रबोधन करावे जेणेकरून समाजात जनजागृती निर्माण होण्यास मदत होईल. ज्ञान- अज्ञान,श्रध्दा- अंधश्रद्धा,निर्व्यसनी व्यसनाधीनता यातील फरक समजून सांगण्याचे महत्वपूर्ण धाडस समाज जागृती निर्माण करण्यासाठी परिणामकारक होऊ शकते. ते सत्य परिस्थिती मांडण्याची हिंमत पदाधिकारी अधिकारी यांनी दाखवली पाहिजे. तरच समाजमनावर योग्य संस्कार होऊन समाज त्या दृष्टीने वाटचाल करू शकतो व आपला सामाजिक विकास साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो.


समाजात समाज जागृती अशी करावी की समाजाची सर्वांगीण प्रगती होईल. त्यासाठी शिक्षण देणार्‍या संस्था आणि रोजगार निर्मिती करणारे उद्योग धंदे तयार करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या समाज कल्याणकारी विकास,अर्थ सहाय्य योजनेचा अभ्यास करावा.त्यात शिक्षण,प्रशिक्षण,रोजगारासाठी आर्थिकदृष्ट्या सहाय्य कसे मिळवता येते त्याची संपूर्णपणे माहिती असली पाहिजे.अनेक अधिकार्‍यांना ती असते पण ते शासनाच्या नोकरीत असतांना सर्वसामान्यांना सांगत नाही.


जेव्हा अधिकार असतात तेव्हा त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी नकारात्मक विचारांची असते आणि सेवानिवृत्तीनंतर सकारात्मक विचारांची होते. त्यामुळेच ते स्वत:चे समाजाचे आणि देशाचे न भरून येणारे नुकसान करतात. शिक्षण,रोजगार आणि आरोग्याची वेळेवर दक्षता घेतली तर कायमस्वरूपी त्यांचा फायदा होतो.वेळ निघून गेल्यावर तत्वज्ञान सांगितले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. 


आज तहान लागली व आजच विहीर खोदायला सुरुवात करायची याला समाज जागृती निर्माण करणे म्हणता येणार नाही. भविष्यात कोणालाही तहान लागली तर पिण्यासाठी पाणी कसे सहज उपलब्ध होईल यासाठी केलेली योजना म्हणजे सामाजिक बांधिलकी ठेऊन केलेलं समाजकार्य होय.कोणते ही सार्वजनिक हिताचे केलेले काम हे एक दोन दिवसाचे महिन्याचे किंवा वर्षाचे नसते. तर त्यासाठी अनेक वर्ष कष्ट,त्याग आणि जिद्द ठेऊन कामे करावी लागतात. तेव्हाच त्याचे परिणाम दिसायला लागतात.


समाजात संस्था संघटना वाढविण्यासाठी हे उच्चशिक्षित अधिकारी कधीच सामाजिक बांधिलकी म्हणून पुढाकार घेत नाहीत, त्यासाठी चार प्रकारच्या माणसांची आवश्यकता असते, ते चार जण महत्त्वाचे असतात.१) ज्यांच्याकडे बुध्दी आहे, त्यांनी प्रबोधन करून माणसे जोडण्यासाठी वापरावी.२)ज्यांच्याकडे वेळ आहे,त्यांनी तो वेळ संघटना बांधणी व वाढीसाठी वापरावा.तन,मन,धनाने जास्तीचा वेळ द्यावा. ३) ज्यांच्याकडे कष्ट करण्याची क्षमता आहे, त्यांनी कष्ट करून समाजातील माणसं संघटनेसोबत जोडून संघटना वाढवावी. त्यासाठी कष्ट द्यावेत आणि द्यावेत.४) ज्यांच्याकडे काही नाही,बुद्धी,वेळ,कष्ट  त्यांनी संघटनेत किमान गप्प बसून संख्या वाढवावी ते ही खूप महत्वाचे कार्य आहे. तेच आज समाजात नाही. 


त्यामुळेच अडचण वरील पहिल्या तिघांची नसते. पण ज्यांच्याकडे काहीच नाही,त्याचीच वळवळ जास्त असते आणि हीच वळवळ करणारी माणसे चळवळ मोडीत काढतात सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे आणि सुरक्षित ठिकाणी राहणारे कर्मचारी अधिकारी यांना खूप घाबरून राहतात. नोकरीवर असतांना त्यांनी हिंमत दाखविली तर त्यांचा संस्था, संघटना व समाजावर प्रभाव कायमच राहतो. सेवानिवृत्त नंतर त्यांनी सल्ले दिले तर त्यांचा समाजावर सेवानिवृत्त अधिकार्‍यांचा प्रभाव बिलकुल पडत नाही. म्हणूनच समाजावर सेवानिवृत्त अधिकार्‍यांचा प्रशासकीय अनुभव कामा येण्यासाठी सेवा करीत असतांना पुढाकार घेऊन माणसं घडवून संस्था, संघटना व समाजावर प्रभाव निर्माण केला पाहिजे.तरच समाजात कायमस्वरूपी संस्था,संघटना टिकतील,अन्यथा एक नां धड भराभर चिंध्या होत राहतील यांची दखल सर्वच समाजाच्या उच्चशिक्षित उच्चपदस्थ कर्मचारी अधिकारी वर्गाने घ्यावी.

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गुन्हेगारीमध्ये तामिळनाडू नंबर १, महाराष्ट्र पाचवे; उत्
शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भाजप प
उपासमारीने ग्रस्त असलेल्या भारतात १२ मंत्र्यांनी खरेदी
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
आरोग्य विभागाचा गोंधळ सुरुच, वेगवेगळ्या संवर्गाच्या पर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper