×

विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन !

Published On :    29 Sep 2021
साझा करें:

‘कोरोनोत्तर काळात ‘ग्रामीण डेस्टीनेशन्स’ना मोठ्या संधींचा कोकण संदर्भात विचार करताना आपल्याला विकासासाठी हव्या असलेल्या सर्वसमावेशक कोकण पर्यटनाचा विचार करावा लागेल.‘कोरोनोत्तर काळात ‘ग्रामीण डेस्टीनेशन्स’ना मोठ्या संधींचा कोकण संदर्भात विचार करताना आपल्याला विकासासाठी हव्या असलेल्या सर्वसमावेशक कोकण पर्यटनाचा विचार करावा लागेल. लोकांपर्यंत पर्यटनाचे महत्त्व पोहोचवणे, विविध पर्यटन स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक मूल्यांच्या माहितीचे आदानप्रदान करणे यासाठी १९८० सालापासून आपल्याकडे पर्यटन दिन साजरा होतो आहे. 


अलिकडे आपल्या देशाने जबाबदार प्रवासी  बनविण्याचे लक्ष ठेवले असून त्या पार्श्‍वभूमीवर इको टूरिझम सोसायटी ऑफ इंडियाचे रिस्पॉन्सिबल टूरिझम सोसायटी ऑफ इंडिया असे नामकरण करण्यात आले आहे. ग्रामीण पर्यटनातील संभाव्य संधींचा विचार करता कोकणसह महाराष्ट्रासाठी कोरोनोत्तर काळ ‘सुवर्णकाळ’ ठरू शकणार आहे. परदेशी पर्यटनात सर्वांत जास्त सहभाग हा ६०पेक्षा अधिक वय असलेल्यांचा असतो. कोरोनाने त्यांचा आत्मविश्वास कमी केला आहे. देशांतर्गतही अधिक दिवस फिरणारे लोकं ३/४ दिवसांच्या पर्यायांचा विचार करतील, असा अंदाज आहे.


कोकणसाठी राज्य सरकारने नुकतीच ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या मुंबई-सिंधुदुर्ग ह्या ४०० किमीच्या ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) प्रकल्प घोषणा केली. याद्वारे वरळी (मुंबई) उन्नत मार्गावरून साडेतीन तासात मनुष्य सिंधुदुर्गला पोहोचेल अशी संकल्पना आहे. या प्रकल्पाचा आराखडा (डीपीआर) आणि सर्वेक्षण काम सुरु झाले असताना वकील ओवेस पेचकर यांनी हा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित केल्यानंतर ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प पूर्ण करत नाही, तोवर आम्ही तुम्हाला दुसरा प्रकल्प सुरू करू देणार नाही,’ असं उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला सुनावले आहे. 


पर्यटकांची वर्तमान मानसिकता पुरेसी कॅश करण्यासाठी कोकणचं कोकणीपण टिकायला हवं आहे. असं असताना कोकणात ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’च्या नावाखाली गेली अनेक वर्षे काय सुरु आहे ? याची जाणीव आम्हाला जुलै महिन्यातील अतिवृष्टीने करून दिली आहे. तरीही अशा महामार्गांसाठी आम्ही अजून किती वृक्षतोड करणार आहोत ? किती निसर्गहानी करणार आहोत ? आणि विकासाचे अनेक मुद्दे बाजूला ठेवून अशा महामार्गाची कोकणला खरंच गरज आहे का ? हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. 


निसर्गसमृद्ध कोकणवर आपण ‘ग्रीन’ नावाने रिफायनरी लादतोय. कोकणच्या समुद्रकिनार्‍यासह इथल्या जंगलांमध्येही अतिक्रमण करून बंगले बांधले गेलेत. बेसुमार वृक्षतोडीमुळे इथल्या पर्यावरण प्रेमींना सातत्याने, ‘सह्याद्री वाचवा’ म्हणत आवाज उठवावा लागतोय. तरीही लोकप्रतिनिधी कोकणाचा पर्यटन विकास होत असल्याचे सांगत असतात. हा सारा विरोधाभास वाटावा अशी स्थिती आहे.


आरोग्य पर्यटनसारख्या विषयात केरळ, तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. नैसर्गिक संधी असताना आपण कधी यात पुढाकार घेणार ? यासाठी शासन धोरण काय आहे ? भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये आजही कोकण दिसत नाही. कोकणात ठिकठिकाणी पर्यटन संस्था आणि संघ कार्यरत आहे. शासनाने यांना विश्वासात घ्यायला हवे आहे. 


त्यांच्याकडे ‘कोकण पर्यटन’ म्हणून काही जबाबदार्‍या सोपवायला हव्या आहेत. जगभरातील पर्यटकाचा कोकण विषयक दृष्टीकोन नकारार्थी होणार नाही याची काळजी घेणारं वृत्तलेखन आणि वार्तांकन होण्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. ‘कोकणात फिरताना पर्यटकांनी कचरा हा कचरा पेटीत टाकावा. पर्यटनस्थळाच्या पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही, असे वर्तन असावे.


 कोकणच्या सागर किनार्‍यावरून मुंबई ते गोवा जाणार्‍या देशातील पहिल्या लक्झरियस क्रुज सेवेला कोकणात थांबा नाही. जलवाहतुकीद्वारे पर्यटन सेवेत असलेल्या कोर्डेलिया क्रूझया कंपनीशी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी)करार केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात क्रूझ टर्मिनलची आवश्यकता असणार आहे. पर्यटनाच्या या नव्या आयामाला शुभेच्छा देताना याच कोकणातल्या दाभोळ बंदराची माहिती घ्यायला हवी आहे. दाभोळ ते गोवळकोट (चिपळूण) बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे.


चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मली नव्हती. 


सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे प्रसिद्ध झालेल्या ‘विश्‍व गॅझेटिअर’मध्येही दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. इतक्या नैसर्गिक नोंदी उपलब्ध असताना आम्ही निसर्ग र्‍हासाचे प्रकल्प कोकणात का आणतो ? वर्षा ऋतूतील कोकणी निसर्ग आणि धबधब्यांविषयी चर्चा करताना ही स्थळे पर्यटक कुटुंबियांना पर्यटनासाठी सुरक्षित वाटायला हवीत. मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय सुरु करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथे असे भव्य प्रकल्प असणे काही गैर नव्हे ! मात्र एकट्या मुंबईवर आपण प्रकल्पांचा अजून किती ताण देणार आहोत ? आणि मुंबईच्या शेजारी असलेल्या कोकणाकडे ममत्वाने कधी पाहाणार आहोत ?

धीरज वाटेकर
९८६०३६०९४८

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गुन्हेगारीमध्ये तामिळनाडू नंबर १, महाराष्ट्र पाचवे; उत्
शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भाजप प
उपासमारीने ग्रस्त असलेल्या भारतात १२ मंत्र्यांनी खरेदी
भारतात क्षयरोगामुळे गेल्या वर्षभरात १५ लाख लोकांचा मृत
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper