×

एअर इंडियानंतर आता एलआयसी, बीपीसीएलसहित अनेक सरकारी कंपन्यांची विक्री

Published On :    14 Oct 2021
साझा करें:

शासक वर्गाने देशाचा केला खुळखुळा, खासगीकरणाचा विळखा घटट् आवळला



नवी दिल्ली: आरएसएसप्रणित केंद्रातील नादार झालेल्या भाजपा सरकारने देशाचा खुळखुळा करण्याचा निर्णय घेतला असल्याने अनेक कंपन्या विक्रीला काढल्या आहेत. एअर इंडियानंतर आता एलआयसी, बीपीसीएलसहित अनेक सरकारी कंपन्यांची विक्री करून १.७५ लाख करोड रूपये कमावण्याचे उद्दीष्ट सरकारचे असले तरी देशाला मात्र खासगीकरणाच्या विळख्यात ढकलले आहे. त्यामुळे आगामी काळात हेच का होते सरकारी उद्योग असे म्हणण्याची वेळ येणार आहे.


सरकारने एअर इंडियाची विक्री करून १८ हजार कोटी घशात घातले आहेत. आजपर्यंत जवळजवळ २६ हजार ३६९ हजार कोटी रूपये सरकारने कंपन्या विक्रीच्या माध्यमातून जमा केले आहेत. आता १.७५ लाख कोटी रूपये जमा करण्याचा त्यांचा मानस आहे. म्हणून त्यासाठी सरकारी कंपन्यांच्या विक्रीचा सपाटा लावण्यात आला आहे. 


काही दिवसांपूर्वी निर्गुतंवणूक सचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितले की, २०२२ पर्यंत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या खासगीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याचबरोबर शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमीटेड, पवन हंस आणि नीलांचल इस्पात लिमीटेड या कंपन्यांची विक्री केली जाणार आहे. त्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर सीएसयू बँक आणि एका विमा कंपनीवरही खासगीकरणाची कुर्‍हाड कोसळणार आहे.


हे पण वाचा: घरे खाली करण्याचे फर्मान-एअर इंडियाच्या लिलावानंतर कर्मचार्‍यांवर संकट, कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात



एलआयसीची विक्री करून सरकारच्या तिजोरीत १ लाख कोटी जमा होतील. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडमधील ५३ टक्के भागीदारी विकली जाणार आहे. त्यातून ५० हजार कोटी मिळणार आहेत. पवन हंस देखील खासगी हातात सोपवली जाणार आहे. त्यातून ५१ टक्के  हिस्सेदारी विकली जाणार आहे. तर ४९ टक्के भागीदारी ओएनजीसीची विकली जाणार आहे. 


नीलांचल इस्पात निगमचेही खासगीकरण केले जाणार आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमीटेड विक्रीची प्रक्रियादेखील तेजीत आहे. वित्त मंत्रालयाने तसे स्पष्ट केले आहे. आयडीबीआयदेखील विकली जाणार आहे. शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमीटेडचे मार्च २०२२ च्या अगोदर खासगीकरणाचे संकेत मिळत आहेत. त्यातील ६३.७५ टक्के भागीदारी विकली जाणार आहे.



देशात १९९१ च्या खासगीकरणाने आरक्षण समाप्त
देशात पी.व्ही.नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या कॉंग्रेसच्या सरकारने एलपीजी आणून सरकारी कंपन्यांचे खासगीकरण सुरू केले. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करून आरक्षण संपवण्यात आले.जे काम कॉंग्रेसने केलेे तेच काम भाजपा करत आहे. म्हणजे दोन्ही पक्षांची नीती एकसारखीच आहे. त्यासाठी खास निर्गुंतवणूक मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली. आता भाजपा सरकारच्या कालखंडात अनेक सरकारी कंपन्यांवर खासगीकरणाची कुर्‍हाड कोसळणार असून देशाला रसतळाला नेण्याचा पाया घालण्यात आला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गुन्हेगारीमध्ये तामिळनाडू नंबर १, महाराष्ट्र पाचवे; उत्
शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भाजप प
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
आरोग्य विभागाचा गोंधळ सुरुच, वेगवेगळ्या संवर्गाच्या पर
भारतात दरवर्षी ४० टक्के अन्न होते खराब, २० कोटी लोक दररोज
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper