×

स्वाभीमानाची ज्योत पेटवणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन

Published On :    15 Oct 2021
साझा करें:

नागपूरच्या मातीत, केली बुद्धत्वाची पेरणी ! धम्म देऊनी बा- भीमाने, दीपवली सारी धरणी !!



नागपूरच्या मातीत,
केली बुद्धत्वाची पेरणी !
धम्म देऊनी बा- भीमाने,
दीपवली सारी धरणी !!

इतिहासाच्या सुवर्णकालखंडात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमी या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अश्पृश्य बांधवांसह नागपुर येथील दिक्षाभुमीवर मानवतावादी बुध्द धम्म स्विकारून जातीवरून माणसाची होत असलेली ओळख संपुष्टात आणली. आणि तुच्छ म्हणून लेखल्या जात असलेल्या समस्त मानवजातीला माणूस म्हणून जगण्याची मुभा मिळवुन दिली. खरं तर नरक यातनेतुन मुक्त झालेल्या जीवांना ही नवसंजीवनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिली होती. त्याकाळी वर्णवादी व्यवस्थेविरूद्ध विश्‍वात गाजलेली एक रक्तविरहीत समाजक्रांतीच होती ती...!, या धर्मांतराची दखल जगाच्या पाठीवर प्रतिक्रांतीविरूद्धची क्रांतीच ठरली. मी हिंदु म्हणुन जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हतं, पण मी हिंदु म्हणुन मरणार नाही. अशी १३ ऑक्टोबर १९३५ ला येवला, नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्मांतरांविषयीची घोषणा प्रत्यक्षात खरी केली ती १४ ऑक्टोबर १९५६ ला....!, सुमारे ५ लाख अस्पृश्य बांधवाच्या साक्षीने तत्कालीन  बौध्द भदंत चंद्रमणी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनात हिंदु धर्माचा त्याग करून बौध्द धम्म स्विकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवकल्याणाचा मार्ग सुकर केला.


जातीच्या जमिनीत बुध्दत्वाची पेरणी करून धम्माचा शिवार फुलविणारा तो अजरामर सोहळा होता. ज्यात मांग, महार, वडार, चांभार, लोहार, सुताराचं पीक नाहीतर माणुसकीचं पीक फुलणार होतं. या धर्मांतराने आत्महिन झालेल्या लोकांमध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटविण्यात आली. षंढ होऊन झोपलेल्या कुंभकर्णी अश्पृश्यांना तु माणूस आहे. याची जाणीव करून अन्याय -अत्याचाराविरूद्ध जागृत केले गेले. स्वत:चे अस्तित्व हरविले असतांना अस्मिता मिळवुन दिली. असं हे दैदिप्य लाभलेलं ऐतिहासिक धर्मांतरण झालं होतं. आणि ते ही नागवंशीय नागपुरात..! 


प्राचीनकाळी नाग संस्कृतीचे केंद्र नागपूर होते. तसेच शुरता, धाडस, स्वाभिमानाची ऐतिहासिक पार्श्वभुमी नागपुर नगरीला लाभलेली होती. म्हणून मुंबई, औरंगाबाद, सारनाथ आणि नागपूर या शहरांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुर या शहराची धर्मांतरासाठी निवड केली होती. नागपुरातील ज्या जागेवर  बाबासाहेबांनी धर्मांतरण करून माणुसकीची बीजे रोवली होती. तेव्हा देशातील  हिंदु धर्माच्या प्रस्थापितांचे धाबे दणाणले होते. आज त्याच जागेवर विश्‍वविख्यात दिक्षाभुमी नटलेली आहे. 


कुठल्याही आमिषाला बळी न पडता स्विकृत केलेले जगातील एकमेव असे हे ऐतिहासिक धर्मांतरण होते. काळोखात दडलेल्या समाजाला प्रकाशित करून लाखो अश्पृश्य बांधवांना डॉ. आंबेडकरांनी सम्मानाची, स्वाभिमानाची, अस्मितेची शिकवण देऊन माणुस म्हणुन ओळख दिली. दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात जागतिक बौध्द विचारवंताना, जागतिक भिक्खु वर्गाला, बौध्द अभ्यासकांना,  इतिहासकारांना बोलावुन बुध्दत्वाची, धम्माची अमृतवाणी गुंजत असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या वाढता प्रभाव लक्षात घेऊन दीक्षाभूमीवर होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रशासनाने अनुमती दिली नसल्याने देशातील तसेच देशाबाहेरील समस्त आंबेडकरी समाज यंदा घरात राहून आपल्या महामानवाला अभिवादन करणार आहे.


डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यावर बर्‍याच धर्माचे धर्मगुरू त्यांच्याशी भेटले. अनेकांनी त्यांना आपल्या धर्माचे महत्त्व पटवून, काही अंशी प्रलोभन देऊन त्यांचा धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण दिले. ५ ऑगस्ट १९५६ ला धर्मांतराबाबत चर्चा करत असतांना दिल्लीतील अश्पृश्यवर्गीय कार्यकर्ते सोहनलाल  शास्त्री यांनी बाबासाहेबांना अनेक प्रश्न विचारलेत.  बौध्द धर्मापेक्षा इस्लामी किंवा इसाई धर्म आपल्याला जास्त फायदेशीर होणार नाही का..? 


असा बाबासाहेबांना सोहनलालजी यांनी प्रश्न केल्यावर बाबासाहेब त्यावर प्रतिक्रिया देतात की, कदाचित फायदा नक्की होणार पण इस्लामी, ईसाई हे धर्म भारतात निर्माण झालेले धर्म नाहीत. हे धर्म स्वीकारले तर बाहेरील देशातून आपल्या लोकांच्या भौतिक प्रगतीसाठी भरपूर पैसा मिळेल. भारतीय राजकारणात देखील भरपूर बळ कमविता येणार. आणि या सर्व गोष्टी आपल्याला त्यांच्या स्वाधीन राहून कराव्या लागतील. दुसर्‍यांच्या ओंजळीने दुसर्‍यांचे पाणी पिऊन आपल्या सर्वांगीण प्रगतीची तहान भागविणे हा खरा पुरुषार्थ नाही. स्वतःचा ताकदीने, स्वाभिमानाने, स्वावलंबनाने आणि स्वदेशी नव्या बौध्द धर्माच्या आश्रयाने आपण आपली प्रगती केली तर तो खरा पुरुषार्थ राहील. 


तसेच भारता बाहेरील धर्म स्वीकारून आपली भारतीय संस्कृती नष्ट होईल. आणि जातिवंत संस्कृती जपणे हेच बौध्द धर्माचे रहस्य आहे. बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे आणि सारा भारत बौद्धमय करणे हेच माझे उद्दिष्ट आहे. आणि याच उद्दिष्टांसह बाबासाहेबांच्या एका हाकेवर लाखो अनुयायी घरातील देव, धर्म सोडुन ‘बुध्दम् सरणम् गच्छामी’ म्हणत बौध्द झाले.  



१४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमीदिनी  दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांनी लाखो शोषित पिडीत लोकांना बुध्द धम्माची दिक्षा देऊन धम्मक्रांतीचे चक्र महान राजा सम्राट अशोक नंतर या देशात गतिमान केले. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी अथक परिश्रमातुन फुलविलेला हा धम्माचा मळा सदैव सुजलाम सुफलाम राखणे हे प्रत्येक आंबेडकरी व्यक्तीचे प्रथम आद्य कर्तव्य असले पाहिजे. सागरासारखा दिलेला विशाल बुद्ध धम्म जपणे आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक आंबेडकरी अनुयायाने स्वीकारणे या सारखे दुसरे अभिवादन आजच्या दिनी या महामानवास असू शकणार नाही.
     

      अखिल खैरे
       ७७६९८७४४००

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
देशात गेल्या तीन वर्षांत दरडोई उत्पन्नात फक्त तीन हजारा
परमबीर सिंग अखेर निलंबित
एसटीचे ९ हजार कर्मचारी निलंबित
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper