×

दररोज ३० लाख मुलांना पुरेल इतके अन्नधान्य गोदामात जाते वाया

Published On :    16 Oct 2021
साझा करें:

भारतीय अन्न महामंडळाची आकडेवारी



नवी दिल्ली:  दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत पिछाडीवर असताना देशात अन्नधान्य साठवण आणि पुरवठा करणार्‍या भारतीय अन्न महामंडळाची आकडेवारी थक्क करणारी आहे. आरटीआयच्या मदतीने ही आकडेवारी समोर आली आहे. एफसीआयने पाठवलेल्या माहितीनुसार दररोज शासकीय गहू आणि तांदूळ खराब होतात. गोडाऊन आणि रेल्वे ट्रकमधून वाहतुकीदरम्यान चोरी झाल्यामुळे अन्नधान्य वाया जाते. दररोज ३० लाख मुलांना पुरेल इतके अन्नधान्य गोदामात वाया जाते.


हे पण वाचा: भारतात दरवर्षी ४० टक्के अन्न होते खराब, २० कोटी लोक दररोज उपाशी झोपतात



१५ ते २० पैसे प्रति किलो दराने पशुखाद्य म्हणून विकले जाऊ शकते. आहारतज्ज्ञांच्या मते, एका सामान्य व्यक्तीला दररोज २०० ग्रॅम अन्नधान्याची गरज असते, तर वयोमानानुसार प्राथमिक शाळेत शिकणार्‍या मुलांना शाळेत मध्यान्ह भोजन, १०० ग्रॅम आणि कनिष्ठ हायस्कूलमध्ये शिकणारी मुलांना १५० ग्रॅम धान्य प्रतिदिन दिले जातात.


हे पण वाचा: स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे सांगत झटकले हात



एफसीआयच्या दिल्ली मुख्यालयानुसार, २००८-०९ ते २०१७-१८ या काळात गोदामांमध्ये १.८० लाख मेट्रिक टन गहू-तांदूळ खराब झाला. म्हणजे १६ मेट्रिक टन क्षमतेनुसार ११ हजार २५० ट्रक धान्य खराब झाले.आरटीआय नुसार, रेल्वे-ट्रकद्वारे वाहतुकीदरम्यान २००८-०९ ते २०१७-१८ दरम्यान १७ लाख मेट्रिक टन गहू-तांदूळ चोरीला गेला आणि खराब झाला. 


हे पण वाचा: भारतातील ब्राम्हणवाद्यांच्या हिंदुत्ववादाचा फुगा फुटला, ५ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या गप्पा झोडणार्‍या शासक वर्ग ब्राम्हणाने भारताला लोटले उपासमारीत


प्रादेशिक कार्यालय भुवनेश्‍वरमध्ये ६ वर्षात ८ हजार मेट्रिक टनांहून अधिक धान्य खराब झाले.  कोलकाता मध्ये ६ वर्षात १५३६५ मेट्रिक टन, क्षेत्रीय कार्यालय बंगळुरूमध्ये ११ वर्षांत ३ हजार ७१९ मेट्रिक टन धान्य, अहमदाबादमध्ये ८ वर्षांत ३ हजार १९१ मेट्रिक टन धान्य, पाटणा मध्ये ६ वर्षात ६ हजार ७१६ मेट्रिक टन धान्य खराब झाले.


जबाबदार अधिकार्‍यांवर दंड आकारण्यात आला. ३६१ मेट्रिक टन धान्य खराब झाल्याने पंजाबमध्ये  ९८५०० रुपये एकूण १४ पॅनल्टी आहेत. केरळ - ३० हजार, एकूण २ पॅनल्टी आहेत. ८७.९ मेट्रीक टन धान्य खराब झाले. यूपी- १.५ लाख रुपये एकूण ५ पॅनल्टी आहेत. ६८ मेट्रीक टन धान्य खराब झाले. पश्‍चिम बंगाल - १.४० लाख रुपये एकूण २ पॅनल्टी, ८.६९ मेट्रीक टन धान्य खराब झाले.A आसाम- १ लाख रुपये एकूण २ पॅनल्टी आहेत. ३२१.२ मेट्रीक टन धान्य खराब झाले. छत्तीसगड- ७५०० रुपये एकूण २ पॅनल्टी आहेत. ८.७८ मेट्रीक टन धान्य खराब झाले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
भाजपा सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा निती आयोगाने
८० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा ठपका
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
देशात गेल्या तीन वर्षांत दरडोई उत्पन्नात फक्त तीन हजारा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper