×

अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोजत आहोत

Published On :    17 Oct 2021
साझा करें:

संजय राऊत यांचा केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा



मुंबई : आपले प्रधानमंत्री लोकशाही मानतात, असे गृहमंत्री अमित शहा यांना सांगावे लागले. कारण भारतात लोकशाही उरली आहे का? हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोजत आहोत हेच गृहमंत्र्यांनी मान्य केले, त्यामुळेच सरकारला प्रश्न विचारणे गुन्हा ठरतो. सत्य बोलणे ओझे वाटते. सत्य बोलणार्‍यांवर ‘धाडी’ घालायच्या व तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा हीच नवी लोकशाही आणि नवे स्वातंत्र्य आहे अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.


एकेकाळी मुंबईत कॉन्ट्रक्ट किलिंग जोरावर होते, भाडोत्री मारेकरी वापरून आपल्या शत्रुचा काटा काढायला जातयचा. पण आता कॉन्ट्रॅक्ट किलिंगची जागा गव्हर्नमेंट किलिंगने घेतली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या दिल्लीत ज्या पक्षाचे सरकार आहे त्यांच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलिंगचे काम करताना दिसत आहेत. नको असलेले राजकीय विरोधक सरकारी यंत्रणांचा वापर करून संपवायचे हे सध्याचे धोरण आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे.


राऊत यांनी पीएम केअर्स फंडावर सुद्धा टीका केली आहे. भ्रष्टाचार नक्की करतोय कोण व धाडी कुणावर पडताहेत? हा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ‘पीम केअर्स’ फंडाचा हिशेब कोणी द्यायला तयार नाही. या खात्यात प्रधानमंत्र्यांच्या नावावर हजारो कोटी रुपये कोणी जमा केले व ते पैसे देण्याच्या बदल्यात कोणाला काय मिळाले यावर शेवटी देशाच्या सर्वोच्च न्यायालयातही चर्चा झाली. 


पीएम केअर्स फंड हा सरकारी नसून खासगी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि सरकारातले अनेक ’वाझे’ या फंडात पैसे जमा करावेत म्हणून उद्योगपती, व्यापार्‍यांना सूचना देत होते.‘पँडोरा’ पेपर्स प्रकरण समोर आले. कर चुकवण्यासाठी देशातील श्रीमंत राजकारणी, उद्योजकांनी आपले धन परदेशात वळवले. त्यात भाजपसंबंधित अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे याची आठवण राऊत यांनी करून दिली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
भाजपा सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा निती आयोगाने
८० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा ठपका
नागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper