×

ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद करणार

Published On :    18 Oct 2021
साझा करें:

‘मौर्य एम्पायर’च्या भूमीपूजनप्रसंगी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचा इशाराइंदापूर: ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. त्यामुळे ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी येत्या १० डिसेंबरला भारत बंद करणार असल्याचा इशारा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिला. इंदापूरमधील ऍड.राहुल मखरे यांच्या ‘मौर्य एम्पायर’च्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी विचारपीठावर राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे, बाळासाहेब मिसाळ-पाटील, ऍड.राहुल मखरे, नीशा मेश्राम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


ते म्हणाले, उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये निवडणुका होत आहेत. तुमच्यापैकी राजकीय क्षेत्रातील लोकांना माहित असेल की, दिल्लीमध्ये ज्यांना सरकार बनवायचे असते त्याचा रस्ता लखनौमधून दिल्लीला पोहचतो. नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनायचे असल्याने त्यांना गुजरातऐवजी वाराणसीतून निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे आम्ही लखनौमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. ९ ऑक्टोबरला विशाल महारॅली पार पडली. त्यानंतर राजकीय पक्षांची विचार करण्याची पद्धत आणि आमच्याकडे बघण्याची पद्धत एकदम बदलून गेली. एका दिवसात काय अनुभव येऊ शकतो त्याचा अनुभव मला नव्हता. आता तो अनुभव आला आहे. टेलिफोन येणे सुरू झाले. राजकारण राहिल्यानंतर एकतर मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान राजकीमा मामा आणि दुसरे फक्त भरणे मामाच आहेत. तिसरा मामा आम्हांला मिळालेला नाही. तिसर्‍या मामाची आवश्यकता वाटत नाही. दोन मामा पुष्कळ झाले. या लोकांच्या आग्रहाखातर मी येथे आलेलो आहे. दुसरी मोठी इटावामध्ये रॅली आयोजित केली आहे. तीसुद्धा कित्येक लाख लोकांची रॅली असेल. त्या रॅलीची तयारी सोडून केवळ मखरे परिवाराच्या खास करून तात्यांच्या प्रेमाखातर आजच्या कार्यक्रमाला मी हजर आहे. त्यांच्या अनुपस्थित हा कार्यक्रम करावा लागत आहे तीच गोष्ट मला फार विचित्र वाटते. जितके वेळा मी येथे आलो आहे त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या घरी जेवण केले आहे. त्यामुळे तात्यांची फार मोठी मला आठवण येत आहे.पण कही गोष्टी आपल्या हातात नसतात. दु:खाची गोष्ट अशी आहे की, तात्या गेल्यावर शिक्षण संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्याचे काम करण्यात आले असे राहुलने आपल्या भाषणात सांगितले आहे. आमचे मामा असताना असे होते हे फारच वाईट वाटते. मामा शब्दाचा अर्थ तुम्हांला माहित आहे का? दोन आईचे प्रेम ज्याच्यात असते ते ‘मामा’ आले का लक्षात. दोन आईचे प्रेम ज्याच्याकडून मिळते ते असताना प्रशासक नियुक्त होणे, व्हायला नको होते. दोन माईचे प्रेम म्हटल्यानंतर राहणार नाही असे मला वाटते. शिक्षण संस्थेबाबत मी व्यक्तीगतरित्या संवेदनशील आहे. त्या शिक्षण संस्थेला कुठल्याही प्रकारे अडथळा येऊ नये. राज्य सरकारला माझी विनंती आहे, नाहीतर माझ्याकडे आणखी काही मार्ग आहेत असा इशारा देतानाच ते मार्ग सरकारसाठी अडचणीचे आहेत. त्या मार्गाकडे मला जाण्याची इच्छा नाही. बरेचदा नाईलाजाने बोलवे लागते. तेव्हा समस्या सुटून जाईल असे मेश्राम यांनी सांगितले.


यावेळी बोलताना मेश्राम म्हणाले, आम्ही उत्तर प्रदेशात ज्यांच्या पारड्यात वजन टाकू, त्यांचे सरकार बनणार आहे. १३ राज्यात १४० जिल्ह्यात बामसेफ संघटन होते त्यावेळी उत्तर प्रदेशात कांशीरामजींनी मुलायमसिंह यादव यांना मुख्यमंत्री बनवले होते. आता ३१ राज्या ५६७ जिल्ह्यात ४ हजार तालुक्यात २२ हजारांपेक्षा जास्त ब्लॉक व १.५ लाख गावांपेक्षा जास्त संघटन आहे. ज्यांच्या पारड्यात आम्ही वजन टाकू त्यांचे उत्तर प्रदेशात सरकार बनेल. मामा तुम्हांला एक आठवण करून देतो. पहिल्यांदा कांशीरामजींनी उत्तर प्रदेशात सरकार बनवले, त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी महाराष्ट्रात १६ वर्षे नामांतराचे आंदोलन सुरू होते. कांशीरामजींनी लखनौमध्ये सरकार बनवले आणि १५ मार्चला त्यांच्या जन्मदिनी शिवाजी पार्कवर रॅली आयोजित केली. त्याच्याअगोदरच पवारसाहेबांनी नामांतर करून टाकले. तुम्हांला राजकारण कळत असेल तर जास्त विस्तारात सांगत नाही. १६ वर्षे आंदोलन चालवून नामांतर झाले नाही परंतु १५ मार्चला शिवाजी पार्कवर रॅलीची घोषणा करताच नामांतर करण्यात आले. तारखा पाहून घ्या. माझ्या समोरच्या गोष्टी आहेत. नामांतर करण्यासाठी पवारसाहेबांनी सर्व पॅरा मिलीटरी फोर्स मराठवाड्यात लावल्या. पॅरा मिलीटी फोर्स लावून नामांतर करायचे होते तर ते अगोदरही करता आले असते. महाराष्ट्रातील लोकं त्या रॅलीत गेले असते मग राज्याच्या राजकारणावर त्याचा परिणाम झाला असता. राज्याच्या राजकारणात उलटा-पालट होईल याची पूर्वकल्पना पवारसाहेबांना होती. मी ज्युनिअर पवारांचे सांगत नाही. ज्युनिअर पवारांचे नाव मामांनी अनेकदा घेतले असल्याने मी जास्त वेळ काही घेत नाही. मी उत्तर प्रदेशात आहे आणि उत्तर प्रदेशात एका जागेवर पवारसाहेबांचा पक्ष निवडणूक लढवणार आहे. तुमच्या माध्यमातून थोडेसे लक्षात ठेवायला सांगतोय. तिथे मी आहे. तिथे माझे वजन समजा पारड्यात पडले नाही तर दु:ख दायक प्रसंग येऊ शकतो. मी कोणाला दु:ख देऊ इच्छित नाही, मी स्वत:च तात्यांच्या दु:खात असल्याने मला दुसर्‍याला दु:ख देण्याची इच्छा नाही असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


मंत्री होऊनही माणूस दु:खी राहू शकतो हे मामाचं भाषण ऐकल्यानंतर समजले. मंत्री राहूनही दु:खात रहावे लागते हे मी कधीच ऐकले नाही. मंत्री खुशीतच असतो. मंत्री म्हटल्यानंतर पॉवर ना हो. सत्ता म्हणजे साधारण गोष्ट नाही. पण आम्ही बॅकवर्ड लोक आहोत, त्यांना सत्ता मिळूनही दु:खी रहावे लागते हे खरे आहे. १९३२ मध्ये इंग्लडमध्ये ज्यावेळी ट्रान्सफर ऑफ पॉवर संदर्भात चर्चा चालू होत्या, त्यावेळी डॉ.बाबाासाहेब आंबेडकरांनी एक शब्द वापरला होता. सत्ताधारी वर्ग आमच्या लोकांना पोझीशन देतो पॉवर देत नाही. मग पोझीशन आणि पॉवरमध्ये काय फरक आहे? तर पोझीशन म्हणजे मोठी गाडी लाल दिव्याची, एक ड्रायव्हर, मोठे कॅबिन बसायला, मोठा काच लावलेला टेबल, मोठे घर, दिमतीला नोकर-चाकर याला म्हणतात, पोझीशन! तर पॉवर म्हणजे काय? आमच्या लोकांच्या हक्कासाठी, हितासाठी, फायद्याचा निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजे सत्ता. इथे मामांना दु:ख होत असेल असे मला वाटते. हे केवळ मामांचेच दु:ख नाही ते सर्वांचे आहे असे मेश्राम म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी ओबीसीचे २८ मंत्री बनवले. त्यामुळे मी सांगत आहे. पेपरात त्यांच्या त्यांची खूप जाहीराती केल्या आहेत. ओबीसीचे २८ मंत्री केंद्राच्या इतिहासात कधीच घेतलेले नव्हते. १२ एससीचे मंत्री आणि ८ एसटीचे आहेत. ज्या धर्मेंद्र प्रधान यांना मोदींनी शिक्षणमंत्री बनवले त्यांच्या मंत्रालयाच्या अधीन नीटचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. तो निर्णय विरोधात असताना मंत्र्याला माहितच नाही. तेव्हा मला सार्‍या देशात आंदोलन करावे लागले. सार्‍या देशात आंदोलन केल्याने त्याचा असंतोष त्यांच्यापर्यंत पोहचला. लोकं आपल्या विरोधात चालली आहेत. मग हे करावे लागेल. नीटचा निर्णय यांच्या बाजूने घ्यावा लागेल. नाहीतर लोक आणखी विरोधात जातील. निर्णय जर घेतला तर वामन मेश्राम यांना श्रेय जाते. कारण आंदोलन त्यांनी केले आहे. म्हणून पुन्हा अडचण निर्माण होतेे. राजकारण श्रेय फार महत्वाचे आहे. आता काम मामा करतात आणि श्रेय अजित पवारांना देतात, द्यावे लागते. तुम्ही लोक कधी आतल्या राजकारणात कधी घुसला नसाल म्हणून तुम्हांला ते माहित नाही. तेव्हा श्रेय द्यावे लागते. मग भाजपा आणि मंत्रीमंडळाने ठरवले की, वामन मेश्राम यांना श्रेय मिळाया नको. मग काय करण्यात आले तर ओबीसी मंत्र्यांचे एक डेलीगेशन तयार करण्यात आले आणि ते प्रधानमंत्र्यांना निवेदन देतील. अरे, वामन मेश्राम सडकेवर फिरून निवेदन देत आहे आणि मंत्रीही निवेदन देत आहेत, मग दोघेही सारखेच कसे काय? असा सवाल मेश्राम यांनी केला. आम्ही सकडेवर आहोत, कारण आमच्याजवळ सत्ता नाही. तुम्ही सत्तेवर असतानाही निवेदन देत आहात, मग तुमच्यात आणि वामन मेश्राम यांच्यात काय फरक आहे? मंत्री होऊनही आमच्या लोकांना पोझीशन दिली जाते, सत्ता दिली जात नाही. 


सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही असे नरेंद्र मोदी यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. त्यावेळी २८ ओबीसी मंत्र्यांना विचारलेदेखील नाही. बातम्या वाचल्या असाल. कुत्र्या, मांजराची, डुकरांची, कोंबड्यांची मोजणी करणार आहेत,परंतु ५२ टक्के असलेल्या ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणार नाही. म्हणून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, २८ मंत्र्यांना पोझीशन दिलेली आहे, पॉवर नाही. त्यासाठी १० डिसेंबरला ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी भारत बंद करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. यासाठी लढावे लागणारच आहे. आमच्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे. संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. मी वयाच्या १९ व्या वर्षापासून हे काम करत आहे. संघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय या देशामध्ये जेवढे अधिकार वंचित लोकांचा प्रश्‍न सुटणार नाही. ४५ वर्षापासून संघटन बनवण्याचे काम केले. मी खेड्यातून आलेला माणूस आहे. २० वर्षाचा तरूण झाला की त्याचे लग्न लावून दिले जाते असे खेड्यात म्हटले जाते. म्हणजे २० वर्षाची एक पिढी असते. त्यानंतर दुसरी पिढी जन्माला येते. वयाच्या १९ वर्षापासून ४५ वर्षापर्यंत एवढी संघटित शक्ती आम्ही निर्माण केली. ५ मार्च २०१९ ला १३ पॉईंट रोस्टरच्या विरोधात भारत बंद केला. त्यामुळे २०० पॉईंट रोस्टर सरकारला लागू करावे लागले. संविधानात दुरूस्ती करून ती गोष्ट लागू करावी लागली. नरेंद्र मोदी किती आकडू माणूस आहे माहित आहे ना. आकडू समजतो. ११ महिने झाले शेतकरी दरवाजात उभे आहेत तरी ऐकत आहेत का? एक भारत बंद करून संविधात दुरूस्ती करावी लागली त्यावरून आमच्या संघटन शक्तीची ताकद समजू शकता. २९ मार्च २०२० ला सीएए विरोधात भारत बंद केला. मोदी आणि शहा दररोज सीएए-सीएए बोलत होते. परंतु २९ मार्चच्या भारत बंदनंतर सीएए बोलतोय का कुणी आता? असा सवाल मेश्राम यांनी केला. याबाबत गृहमंत्र्यांनी आपल्या राज्यमंत्र्याला संसदेत उत्तर द्यायला लावले. तुम्ही देशभरात सीएए लागू करणार होतात, त्याची तयारी कुठपर्यंत आली आहे? असा सवाल विरोधी पक्षांनी संसदेत विचारला. सरकारने अजून यावर विचार केलेला नाही असे राज्यमंत्र्यांनी उत्तर दिले. आम्ही आहोत ना वामन मेश्राम मैदानात, पुन्हा भारत बंद करायला. मला एक सोशल मीडियात व्हिडीओ बनवून टाकला तर काहीच करावे लागत नाही. ४५ वर्षात जे पागल लोक बनवले आहेत ना, तेच सारे लोक करतात. पोलीस काय म्हणतात, ‘कम जादा करोगे तो जेम में डाल देंगे’ आमचे लोक काय म्हणतात, ‘चला’ हीदेखील मात्रा लागू पडत नाही. गांधीजी जेलमध्ये जाऊन महान झाले आम्ही कुठे लहान होणार आहोत. १९१८ ला गांधी कुणी महात्मा होता का? कोण विचारतो तो त्या गांधींना. जेलमध्ये जाणे जेव्हा सुरू केले तेव्हा गांधीजी मोठे झाले असे मेश्राम यांनी सांगितले.


आम्ही आमच्या लोकांना सांगितले आहे की, जेलमध्ये गेल्यावर माणूस लहान होत नाही तर मोठा होतो. कारण आपण कुठलेही क्रिमीनल ऑफेन्स केलेले नाही. राजकीय उद्दीष्टासाठी एखादा माणूस जेलमध्ये जातो, वामन मेश्राम ज्यावेळी जेलमध्ये गेल्यावर प्रथम दर्जाची सुविधा मिळते. गांधीजींनाही प्रथम दर्जाच्या सुविधा मिळायच्या. जवाहरलाल यांनाही मिळायच्या. सर्व पुस्तके, रेडीओ, दररोज पेपर वाचायला मिळतात. जवाहरलाल नेहरू यांनी डिक्सव्हरी ऑफइंडिया जेलमध्ये राहून लिहले आहे. जेलमध्ये राजकीय उद्दीष्टासाठी जे जातात त्यांना घटनात्मक अधिकार आहेत. किती लोकांना माहित आहे. संविधान कलम क्र. १९ देशातील लोकांना आम्ही सांगितले आहे. आर्टीकल १९ हा मूलभूत अधिकार आहे. पोलीसांना परमीशन न देण्याचा कुठलाही अधिकार नाही. जर वामन मेश्राम यांनी परवानगी मागितली आणि विरोधी पक्षातील लोक गडबड-गोंधळ करत असतील तर त्यांचा बंदोबस्त करून माझा मूलभूत अधिकार शाबूत राखणे ही पोलीसांची ड्युटी आहे. जर तुम्ही शांततेत व कुठल्याही प्रकारे हिंसक आंदोलन करणार नसाल ‘हमे गोली चलाने जरूरत क्या है?’ हमारे महापुरूषोने बोलने के लिए बोली बतायी ना. ‘बोली ’ गोली की क्या जरूरत है’, बोली जादा प्रभावशाली है, मगर बोलने आने चाहिए, बोली बोलने का मौलिक अधिकार है’. म्हणजेच हा मूलभूत अधिकार आहे. पोलीसांना असा कार्यक्रम नाकारण्याचा अधिकारच नाही. गुजतराच्या पोलीस कमिशनरने माझा अधिकार नाकारला. त्याविरोधात मी हायकोर्टात खटला दाखल केला आहे. दोन वर्षे झाली पोलीस कमिशनरला माझ्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर देता आलेले नाही.‘मामा’ देता येणार नाही. कारण त्यांच्याकडे उत्तर नाही. जर आम्ही कुठल्याही प्रकारे हत्यारे न घेता,  कुठल्याही प्रकारे हिंसा न करता कार्यक्रम करत असू, तुमच्याकडे एकच अधिकार आहे. कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करणे. लोकशाहीत जे अधिकार सत्ताधार्‍यांना असतात तेच अधिकार विरोधी पक्षांनाही असतात. सत्ताधारी आणि विरोधक संसदेत एकत्रच बसतात ना. भरणेजी, तुम्ही आणि फडणवीस विधानसभेत एकाच सभागृहात बसतात की नाही. तेव्हा घटनात्मक अधिकार सर्वांचे सारखेच आहेत.


आर्टीकल १९ हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलभूत अधिकार आहे. कुणाच्या बापाने दिलेला नाही. आम्ही म्हणू शकतो आमच्या बापाने दिला आहे. तेव्हा अधिकाराचा उपयोग आणि प्रयोग करून दोन वेळा भारत बंद केला आहे. तुम्ही विचार करत असाल भूमीपूजन कार्यक्रमात भारत बंदवर बोलत आहात. मग मला राहुल मखरे आणि तुम्हांला सांगायचे आहे की, लखनौवरून मी भूमीपूजनासाठी आलोय का? भूमीपूजन निमित्त आहे लोक एकत्र करण्याचे. त्यानिमित्त आपला संदेश देण्याचे, त्यासाठीच मी येथे आलो आहे. त्यामुळे जे अधिकार वंचित लोक आहेत, घटनेने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, परंतु ते अधिकार आपल्याला घटना घरी आणून देत नाही. ते तुम्हांला संघटित शक्तीच्या बळावर मिळवावे लागतात. भरणेजी कसे आमदार झाले आहेत याबाबत मी काही बोलणार नाही. ते गुप्त ठेवू इच्छितो. ते जाऊ द्या आता. तेव्हा या देशात आपल्याला घटनात्मक अधिकार असतानाही ते अधिकार संघटित शक्तीच्या बळावर मिळवावे लागतील. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे ८ तासाचे काम नाही. १६ तासाचे आवश्यकतेनुसार २४ तासाचे काम करत आहोत. नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री पदासाठी ज्यावेळी विरोध केला तेव्हा अडवाणींसाहेबांचे ८९ वर्ष वय होते. मी अजूनही प्रधानमंत्री पदाचा दावेदार आहे असे त्यांनी सांगितले. ८९ वर्षाचे असूनही त्यांनी दावा सोडला नव्हता, मग आता माझे वय ६४ वर्षे आहे. अजून २० वर्षे समजा या आंदोलनाचे नेतृत्व केले तर ८४ वर्षे होतात. ८९ वर्षे होतात का? तेव्हा २० वर्षात आम्ही काय करू शकतो या गोष्टी बोलण्यात आता काहीच अर्थ नाही. तुम्ही पेपरात वाचा. करून दाखवल्यानंतर ज्या बातम्या येतील त्या वाचा. आता ते लोक आमच्या बातम्या छापत नाहीत. पण काही प्रसंग असे येतात की, त्यांना बातम्या छापाव्याच लागतात. त्या आल्यानंतर तुम्हांला वाचायला मिळतील असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


मेश्राम म्हणाले, मी मखरे परिवाराला आश्‍वस्त करू इच्छितो की, शिक्षण संस्थेवर कुठलेही संकट आले तर साक्षात सहशरीर मी येथे उभा आहे. आणि माझ्याबरोबरच्या लोकांशी पंगा घ्यावा लागेल. त्यामुळे राहुल मखरे आणि त्यांच्या परिवारापाठीमागे ती सर्वशक्तीनिशी उभा आहे. हे मंत्र्यांचे आश्‍वासन नाही. मंत्र्यांचे आश्‍वासन कसे असते माहित आहे का? याचे उदाहरण देताना मेश्राम यांनी मंत्रीमंडळात बदल झाला आहे. अचानक एक आमदार मंत्री झाला. आज राजकारण सहा महिन्यात सरकार पडते. मग संधी मिळते, मग एक आमदार मंत्री झाला. त्या मंत्र्यांचा त्या मतदारसंघातील लोकांनी नागरी सत्काराचा कार्यक्रम घेतला. लोक म्हटले, आमदारसाहेब तुम्ही आता मंत्री झाला आहात, सर्व मंत्र्यांच्या मतदारसंघात साखर कारखाने आहेत, आपल्या मतदारसंघात साखर कारखाना नाही. ‘मंजूर’! तुम्हांला भाषण करायला संधी दिल्यावर तुम्ही सांगा ‘मंजूर’, तुम्ही तर आता बसलेले आहात. आम्ही आता मागण्या करत आहोत. मी बसलो तरी मंत्री आहे, उभा झालो तरी मंत्रीच आहे. ‘मंजूर’ म्हटले. आता साखर कारखाना मंजूर झाल्यानंतर बक्कड ऊस पिकवा. ऊस पिकवल्याशिवाय साखर कारखाना चालवता येणार नाही. ऊस पिकविण्यासाठी साहेब धरण पाहिजे. धरण मंजूर. मग एक तज्ञ माणूस उभा राहिला. साहेब आपल्या तालुक्यात नदीच नाही. ‘नदीही मंजूर’ ! भरणेजी, मंत्र्याला करायचे काहीच नाही. केवळ आश्‍वासने द्यायची आहेत. परंतु शिक्षण संस्थेच्या पाठीमागे मी उभा आहे हे मंत्र्यांचे आश्‍वासन नाही. मी संघटित शक्तीच्या बळावर बोलत आहे. त्या आधारावर मी त्यांच्या पाठीमागे असल्याचे मेश्राम यांनी सांगितले. यावेळी ऍड.राहुल मखरे यांनी प्रास्ताविक केले व त्यांच्याहस्ते मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
भाजपा सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा निती आयोगाने
८० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा ठपका
नागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper