×

विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग

Published On :    18 Oct 2021
साझा करें:

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा नवा उच्चांक



मुंबई:  रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर सोमवारी इंधनाचे दर तेल कंपन्यांनी स्थिर ठेवले आहेत. मात्र असं असलं तरी दिल्ली, मुंबईसहीत अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांनी नवीन उच्चांक गाठले आहेत. स्वयंचलित पेट्रोल-डिझेल हे हवाई इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी महाग झाले आहे.पेट्रोल-डिझेलच्या दरांत रविवारी सलग चौथ्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांची वाढ झाल्यामुळे देशभरात हे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.



मुंबईत दर किती?
मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी १११.७७ रुपये मोजावे लागत असून, दिल्लीतही हे दर आजवरचे सर्वाधिक, म्हणजे १०५.८४ रुपये इतके झाले आहेत. मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर १०२.५२ रुपये असून, दिल्लीत ९४.५७ रुपये आहेत.


हवाई इंधन (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल- एटीएफ) ज्या दरांत विमान वाहतूक कंपन्यांना विकले जाते, त्यापेक्षा दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणार्‍या पेट्रोलचे दर आता ३३ टक्क्यांनी अधिक आहेत. दिल्लीत ‘एटीएफ’चे दर एका लिटरला ७९ रुपये इतके आहेत. देशभरातील सर्वात महाग इंधन राजस्थानमधील गंगानगर या सीमेवरील शहरात मिळत असून, तेथे पेट्रोलचे दर लिटरला ११७.८६ रुपये, तर डिझेलचे दर १०५.९५ रुपये आहेत.


देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. ९२२४९ ९२२४९ क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
भाजपा सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा निती आयोगाने
८० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा ठपका
नागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper