×

शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही

Published On :    19 Oct 2021
साझा करें:

राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा भाजपला घरचा आहेर



मिझोराम: सध्या उत्तर प्रदेशातील अनेक भागात भाजप नेत्यांना जाणं मुश्किल झालं आहे. आगामी काळात शेतकरी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, अशा शब्दात भाजपचे वरीष्ठ नेते आणि मिझोरामचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाजपालाच घरचा आहेर दिला आहे.


सध्या उत्तप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींचे पडघम वाजत आहे. पश्चिम उत्तरप्रदेशातील जाट समाजातील शेतकरी नेते असलेले सत्यपाल मलिक म्हणाले, मी उत्तर प्रदेशच्या मीरत भागातून येतो. मीरत, मुझ्झफरनगर आणि बागपत भागातील कोणत्याच गावात भाजपचे नेते सध्या जाऊ शकत नाहीत. मी शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. मी शेतकर्‍यांसाठी मी प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि इतरांशी भांडलो आहे. शेतकर्‍यांसोबत तुम्ही चुकीचं करत आहात , हे करु नका. हे माझं सर्वांना सांगून झालं आहे.


शेतकर्‍यांची प्रमुख मागणी हमीभावाची आहे. सुप्रिम कोर्टानं तसेही तीन कृषी कायदे स्थगित केले आहेत. हमीभावाशिवाय शेतकर्‍यांना शांत करता येणार नाही. प्रधानमंत्र्यांना याबाबत सार्वजनिकरित्या निरोप देणं योग्य ठरणार नाही. परंतू मी स्वतः वैयक्तिकरित्या या शेतकर्‍यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवील असं, सत्यपाल मलिक म्हणाले.


विशेषतः शिख समुदायांशी पंगा घेणं बरोबर नाही. याच शिखगुरुंनी शस्त्रशिवाय मुघल साम्राज्याविरोधात लढा दिला होता, हे लक्षात ठेवले पाहीजे. सरकारने सांगितले तर मी सरकार आणि शेतकरी संघटनामधे मध्यस्थ होण्यास तयार आहे, पंरतु शेतकरी समाधानासाठी हमी भाव महत्वाचा आहे, हमीभावाशिवाय शेतकरी रसातळाला जाईल, असा इशारा मलिक यांनी दिला आहे.


जम्मु कश्मिरचे माजी राज्यपाल असलेले मलिक यांनी सध्याच्या कश्मिरमधील अस्वस्थेबद्दलही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, पूर्वी दहशतवादी श्रीनगरच्या ५० किलोमीटर परीसरात प्रवेश करायला धजावत नव्हते. मात्र आता दशहतवादी खुलेआम लोकांना मारत आहेत असं सांगितलं.


नुकत्याच झालेल्या लखीमपुर खेरीमधे शेतकरी हत्याकांडाबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा दिला पाहीजे का? या प्रश्नावर सत्यपाल मलिक म्हणाले, मंत्र्याचा राजीनामा घटना घडल्यानंतर तातडीने झाला पाहीजे होता. हे मंत्री ( अजय मिश्रा) मंत्री पदाला पात्र ठरत नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
देशात गेल्या तीन वर्षांत दरडोई उत्पन्नात फक्त तीन हजारा
परमबीर सिंग अखेर निलंबित
एसटीचे ९ हजार कर्मचारी निलंबित
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper