×

भारतातील सर्वात मोठा घोटाळा ब्राम्हणांनी लिहलेल्या इतिहासाचा

Published On :    22 Nov 2021
साझा करें:

मौर्य क्रांती संघाच्या तिसर्‍या राज्यस्तरीय धनगर परिषदेत वामन मेश्राम यांचा हल्लाबोलजेजुरी : आजच्या घडीला भारतात ब्राम्हणांनी लिहलेला इतिहास शिकवला जात आहे. हा भारतातील सर्वात मोठा इतिहासाचा घोटाळा असल्याचा हल्लाबोल बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. मौर्य क्रांती संघाच्या तिसर्‍या राज्यस्तरीय धनगर परिषदेत ते जेजुरी येथे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


मेश्राम म्हणाले, मौर्य क्रांती संघाच्या माध्यमातून आज जेजुरी येथे राज्यस्तरीय धनगर परिषद होत आहे. जेजुरी आमचा खंडोबा दैवत आहे त्याचे केंद्र आहे. राज्यातील सार्‍या बहुजनांसाठी जसे पंढरपूर आहे तसे जेजुरीचे महत्व आहे. दैवत कसे होते? अनेक लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानतात, ते ईश्‍वर नव्हते की भगवान. तरीही त्यांना दैवत मानण्यात आले. मला असे वाटते खंडोबा देखील भगवान अथवा ईश्‍वर नाही. असे असतानाही ते समाजाचे दैवत आहे. त्यामुळे निश्‍चित स्वरूपात ते आपल्या समाजाचे लढाई लढणारे आंदोलनाचे महानायक असतील. केवळ महानायक नसतील तर मान्यवर महानायक असतील. त्यामुळेच ते आपले दैवत झाले आहेत. 


हजारो सालापासून आपण त्यांना दैवत मानत आहोत. हे लक्षात घेऊन मौर्य क्रांती संघाने तिसर्‍या राज्यस्तरीय धनगर परिषदेचे आयोजन जेजुरी येथे केले आहे. विचार परिवर्तन हे सर्व परिवर्तनाचे मूळ आहे, या विषयावर बोलताना माझी मातृभाषा मराठी आहे, मात्र या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग अमेरिकेत, लंडनमध्येदेखील ऐकले जात आहे. ते मराठीला जास्त ओळखत नाहीत, म्हणून मी हिंदीत बोलणार आहे. मी भाषण कधीच करत नाही, मी जे काही बोलतो, त्याचे मी नाव ठेवले आहे ‘समझाना’ म्हणजेच ‘समाजावणे’होय. ज्याला काहीच कळत नाही त्यालादेखील समजून येते. म्हणजेच मी काही बोलतो ते समजावण्याचे काम केले जाते. विचार परिवर्तन हे सर्व परिवर्तनाचे मूळ आहे. महाराष्ट्रातील संतांनी महाराष्ट्रातील लोकांचे मन, मस्तिष्क मुक्त केले नसते तर शिवाजी महाराजांची राजनीतीक क्रांती झाली नसती. 


अभ्यासाची क्रमवारी मांडणी केली तर लक्षात येईल. इतिहासाच्या तारखेचे अध्ययन केले तर आपल्याला लक्षात येईल. मी सामान्य बाब सांगत नाही. पंजाबमध्ये गुरू नानक यांच्या माध्यमातून लोकांने मन, मस्तिष्क मुक्त नसते झाले असते तर तर सिखांचे साम्राज्य निर्माण झाले नसते. महाराजा रणजितसिंगचे साम्राज्य निर्माण झाले नसते. महाराजा रणजितसिंगने आपले साम्राज्य अफगाणिस्तानपर्यंत स्थापित केले होते. त्यामुळे मन आणि मस्तिष्क मुक्त झाल्याने राजनीतीक क्रांती झालेली आहे. इतिहास क्रमिक सांगत आहे. विचार परिवर्तन प्रत्येक परिवर्तनाचे मूळ आहे या विषयावर बोलत असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.


अरब ज्याठिकाणी कबील्याच्या ठिकाणी राहत होते. एक कबीला दुसर्‍या कबील्याचा दुश्मन होता.  जर घरात मुलगा जन्माला आला तर त्याला जीवंत जमीनीत दफन केले जात होते. त्याच अरब देशात महम्मद पैदा झाले.  त्यांनी अरबी कबील्यात राहणार्‍या लोकांना मन आणि मस्तिष्कला मुक्त केले. आज अरब जगभरात एक मोठी राजनीतीक शक्ती निर्माण झाली आहे. कधी कधी ते अमेरिकेलाही डोळे वटारून दाखवतात. आपण बातम्या वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल. 


एक कबीला दुसर्‍या कबील्याचा दुश्मन होता. ते सारे एकत्र झाले आणि त्यांनी मोठे राजनीतीक साम्राज्य उभे केले. हादेखील इतिहासाच्या विचारांचे परिवर्तन हा क्रम दाखवत आहे. आपल्या समजेल असे सांगत आहे. काल्पनिक बाबी सांगत नाही तर ऐतिहासिक संदर्भ सांगत आहे. आपल्याला समजेल असे सांगत आहे. ही सामान्य बाब नाही. बुद्धांनी मन, मस्तिष्क मुक्त केले नसते तर चंद्रगुप्त मौर्य यांची क्रांती झाली नसती. खरी बाब लक्षात यावी म्हणून हे सांगत आहे. आपल्या देशात जो इतिहास ब्राम्हणांनी लिहला व शिकवला तो भारतातील सर्वात मोठा एक नंबरचा घोटाळा आहे. अनेक घोटाळे झाले आहेत, मात्र सर्वात कुठला मोठा घोटाळा असेल तर तो इतिहासाचा असा हल्लाबोल मेश्राम यांनी केला.


आपले किती सारे धनगर जातीचे लोक आरएसएस आणि भाजपासाठी पागल झाले आहेत. मी महाराष्ट्रातीलच राहणारा असल्याने ते सारे मला माहित आहे. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे म्हणणारे लोकही आहेत. ‘गर्व से कहो मैं खंडोबा का भक्त हूँ’ असे कोणी म्हणत नाही. असे म्हणणे ऐतिहासिक असेल. अरे, तुम्ही चुकीचे बोलत आहात असे कुणी त्यांना म्हणणा नाही. मात्र ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा चुकीचा इतिहास शिकवला जातो. हा चुकीचा इतिहास कसा आहे हे मी सांगत आहे. हिंदू शब्द वेद, श्रृती, पुराण, रामायण, महाभारत, गीता आणि ब्राम्हणांच्या संस्कृत भाषेत नाही. हिंदू शब्द ब्राम्हणांनी जी डिक्शनरी लिहली त्यामध्ये लिहला आहे. हा पर्शियन भाषेतला शब्द आहे. आम्ही लिहलेला नाही तर ब्राम्हणांच्या डिक्शनरीत लिहलेले आहे. त्याचा अर्थ डाकू, चोर, काळा असा आहे. 


जाणीवपूर्वक हा शब्द वापरला जात आहे. ज्या लोकांनी भारतावर आक्रमण केले, ज्यांनी भारतीयांना पराजित केले, पराजित करणार्‍या लोकांनी हे नाव दिले आहे ‘हिंदू’. गुलामांना नाव दिले आहे ‘हिंदू’. पर्शियन भाषा बोलणार्‍या लोकांनी हे नाव दिले आहे. पर्शियन भारतीय भाषा नाही. आक्रमक मुस्लीम लोकांची ती भाषा आहे. स्वातंत्र्यांचे आंदोलन ब्राम्हणांनी जिंकले तर त्यांनी आपल्याला नाव दिले ‘हिंदू’. मुस्लीमांच्या राज्यात तुम्ही गुलाम होतात आमच्या राज्यात तुम्ही गुलाम आहात, त्यामुळे तुम्ही ‘हिंदू’. जनावरांची आमची गणती करणार मात्र तुमची करणार नाही. तुम्ही माणसे थोडी आहात, माणसे असता तर गणती केली असती असा उपरोधिक टोला मेश्राम यांनी लगावला.


सारे ब्राम्हण लोक लोकांचे नामकरण करतात, त्यांच्या घरात ‘हिंदू’ नावाचा मुलगा पैदा झाला त्याचे नामकरण महम्मद भाईंनी केले. आपण नाव ठेवण्यासाठी ब्राम्हणाला बोलवा असे म्हणतो. हिंदू हा शब्द आक्रमक मुस्लीमांनी ठेवला. याचा अर्थ असा की, आम्हांला दररोज मुस्लीमांच्या विरोधात भडकावतात मात्र आक्रमक मुस्लीमांनी दिलेले नाव तिथेच. जर त्यांनी हिंदू धर्माचा ब्राम्हण धर्म म्हणून प्रचार केला तर तुम्ही काय म्हणाल? तुमचा धर्म आहे, तुम्ही बघून घ्या. आम्हांला काही देणं-घेणं नाही. मात्र त्यांनी काय चलाखी केली की ब्राम्हण धर्माचा प्रचार हिंदूच्या नावाने केला आणि आम्ही जाळ्यात हिंदू म्हणून अडकलो. जर त्यांना तुम्ही विचारले, काय हो, हा मूलत: ब्राम्हण धर्म आहे. तर याचा हिंदूच्या नावावर का प्रचार करत आहात? त्यावर ब्राम्हण म्हणतो, अरे, तो एकच आहे. तुम्हांला समजत नाही, परंतु ते एकच आहे. त्यांना विचारा, हिंंदूच्या धर्मग्रंथांची नावे सांगा? 


मग तो नावे सांगायला सुरूवात करतो, वेद, श्रृती, स्मृती, पुराण, रामायण, महाभारत, गीता. मग हे तर ब्राम्हणी धर्माचे धर्मग्रंथ आहेत, आम्ही तुम्हांला हिंंदू धर्माचे धर्मग्रंथ विचारत आहोत. तुम्ही ब्राम्हण धर्माचे धर्मग्रंथ सांगत आहात. ते काय म्हणतात, ते एकच आहे. ते एकच आहे तर ब्राम्हण धर्माच्या नावाने प्रचार का करत नाही? असा सवाल करतानाच मेश्राम यांनी सांगितले की, कारण ब्राम्हण धर्माच्या नावाने प्रचार केला तर वामन मेश्रामांना प्रचार करण्याची जास्त आवश्यकता भासणार नाही. आपल्या बापजाद्याचं दुसरा कुठला तरी धर्म असू शकतो.  मग आपण शोध घेण्याचा प्रयत्न करू. कुठला तरी असेल. त्यामुळे मी तुम्हांला सांगत आहे. ज्या लोकांनी इतिहासाचा घोटाळा त्यांनी चुकीची माहिती सांगितली. खरी माहिती सांगितलीच नाही. बुद्धांच्यानंतर ८०० वर्षानी रामायण लिहले आहे हे किती लोकांना माहित आहे. बुद्धांच्या प्रवचनात दशरथ जातकाचे उदाहरण येते. मौलिक बाब सांगत आहे. सार्‍या देशातीलव जगभरातील ब्राम्हणांना माझे आव्हान आहे की, मी सांगत असलेली बाब खोटी ठरवून दाखवा असे त्यांनी सांगितले.


ब्राम्हण नेममीच प्रचार करतो की, आमचा धर्म प्राचीन...प्राचीन..प्राचीन...प्राचीन...प्राचीन आहे. अरे, किती प्राचीन आहे. तुम्ही तर रामायण बुद्धांच्या ८०० वर्षानंतर लिहले आहे. त्या रामायणात दोन श्‍लोक बुद्धांच्या विरोधात लिहले आहे. जर ते बुद्धांच्या पूर्वी लिहले असते, बुद्ध जन्माच्या अगोदर लिहले असते तर बुद्धाच्या बाबतीत दोन श्‍लोक कसे आले असते? आता नवीन संशोधन आले आहे. इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी संशोधन केले आहे की, १६ वेळा बुद्धांचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात. हे रामायण इसापूर्व १८५ साल सम्राट बृहद्रथ मौर्य यांची पुश्यमित्र शुंगच्या माध्यमातून हत्या केल्यानंतर निर्माण झाले आहे. मौर्य बुध्दांच्या नंतर, बुद्ध मौर्य यांच्या पहिले. मौर्य यांचे दहा राजा, त्यानंतर त्यांची हत्या. अनुकूल राज्य स्थापित झाल्यानंतर रामायण लिहण्याचे काम का करण्यात आले? बुध्दांनी आपल्या प्रवचनात जातक कथांची उदाहरणे दिली आहेत. दशरथ जातकमध्येही राम आहे. मात्र तो बोधीसत्व राम आहे. दशरथ जातक कथेत सीताही आहे. आपल्याला माहिती व्हावे म्हणून सांगत आहे. ही बाब ब्राम्हणांनी खोटी ठरवून दाखवावी असे माझे त्यांना आव्हान असून ज्या ब्राम्हणांनी रामायण लिहले त्यांनी दशरथ जातकची चोरी केल्याचा आरोप मेश्राम यांनी केला आहे.


जे लोक इतिहासाचा घोटाळा करतात त्या लोकांना आमचे आव्हान आहे. ज्यांना तुम्ही लोक पंडीत, महापंडीत म्हणता, त्या महापंडीतांना आमचे आव्हान आहे. हे खोटे आहे ते सिद्ध करून दाखवा. कागदोपत्री पुराव्याच्या आधारे बोलत आहे. छानबिन, तुलना, चौकशी, सर्व पुरावे गोळा केल्याशिवाय वामन मेश्राम बोलत नाहीत हे ब्राम्हणांना माहित आहे. मी जे काही बोलतो ते आधी सर्व पुरावे गोळा करून बोलतो. नाही मिळाले तर ते इंग्लंडवरून आणतो. ब्राम्हणांचे सर्व कागदपत्रे इंग्लंडमध्ये इंग्रज घेऊन गेले आहेत. क्रांती आणि प्रतिक्रांतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृतीचा संदर्भ दिला आहे ती मनुस्मृती ब्राम्हणांनी गायब करून टाकली. बाबासाहेबांनी रेफर केलेला मनुस्मृतीचा ग्रंथ मिळेल का? असे विचारले असता तो इथे मिळणार नाही तर ऑस्ट्रेलियाला मिळेल. तिथे देखील इंग्रज आहेत. २०० वर्षापूर्वीची मनुस्मृती ऑस्ट्रेलियाहून घेऊन आलो. ते लोक लपवून राहिले होते. मी पुरावे घेऊन आलो. ते आता डिजीटलायझेशन करण्यात आले आहे. त्यामुळे ते नष्ट करता येणार नाही असे मेश्राम म्हणाले.


महाभारतात ३१ जातक कथांची चोरी आहे. अरे किती चोरी करणार? असा सवाल करतानाच त्याला चोरी म्हणता येणार नसून त्याला डाका म्हणायला हवे अशी खिल्ली त्यांनी उडवली. ब्राम्हण लोक चार्तुमास शब्दाचा प्रयोग करतात. बुध्दांचा चार महिन्याचा वर्षावास व्हायचा. ब्राम्हणांनी त्यालाच चोरले आणि चार्तुमास असे नाव दिले. वर्षावासचे नाव केवळ चार्तुमास असे केले. येथील एका कार्यकर्त्याने शेषनाग या शब्दाचा प्रयोग केला. शेषनाग या शब्दाचा अर्थ काय आहे? आपले लोक शब्दप्रयोग करतात परंतु त्याचा त्यांना अर्थ माहित नसतो.  शेषनाग म्हणजे शेष म्हणजे शिल्लक राहणे. नाग म्हणजे नाग. नागांची आणि ब्राम्हणांची लढाई झाली त्यामध्ये शिल्लक राहिलेला नाग म्हणजे शेषनाग. शेषनाग नावाचा कुठला नाव आहे का? नागांचा एक तो प्रकार आहे. मी काही सर्पतज्ञ नाही. हे लोक शब्दांचे खेळ करतात आणि आमच्या लोकांना भुरळ पाडतात. या बाबी समजून घेतल्या पाहिजेत. यामध्ये खूप अर्थ दडलेला आहे. इतिहास दडलेला आहे. आमच्या संस्कृतीचा उल्लेख आहे. 


ब्राम्हणांचे येथे काहीच मिळत नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री बनताच त्यांनी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून शोध घेणे बंद केले. पुरातत्व विभाग इंग्रजांनी सुरू केला होता. या सार्‍या बाबी आपल्याला माहित असायल्या हव्यात. आपल्याला आपला इतिहास, आपला वारसा, आपले साम्राज्य याची माहिती मिळाली तर आपल्यामध्ये असलेली हिन भावना नष्ट होईल. ज्यावेळी गावातील व्यक्ती शहरात येते त्यावेळी त्याच्या मनात हिन भावना निर्माण होते. बोलणे, चालणे, व्यवहारात ती हिन भावना डोकावत असते. सम्राट बृहद्रथ मौर्य यांची हत्या केल्यानंतर त्यांनी देशात जातीव्यवस्था निर्माण केली. महिलांची दास्यता निर्माण केली. ब्राम्हणांच्या घरात ज्या आई, बहीण, बायको, मुलगी, सून आहेत त्यांचा जनेऊ संस्कार केला जात नाही. केवळ पुरूषांचा जनेऊ संस्कार केला जातो. महिलांचे उपनयन संस्कार केले जात नाहीत. ब्राम्हण युरेशियातून भारतात आले येताना एकटेच आले. आक्रमण करण्याच्या हेतूने ते आले.  महिलांना बरोबर घेऊन आले नाही. आक्रमण करण्यासाठी पुरूषांची गरज होती. महिलांमुळे अवरोध निर्माण झाला होता. एखादा व्यक्ती मेला तर महिला रडणे सुरू करते. त्यामुळे अवरोध निर्माण होतो. आपला प्रजनन सुरू रहावे यासाठी त्यांनी येथील महिलांशी संबंध बनवले. 


ब्राम्हणांच्या घरात ज्या महिला आहेत त्यांचा डीएनए भारतीय आहे. हे डीएनएच्या आधारावर सिद्ध झाले आहे. हा इतिहासाचा घोटाळा आहे तो लोकांना माहित असायला हवा. इतिहासाच्या घोटाळ्यामुळे आपल्या लोकांना काय खरं आणि काय खोटं हे समजत नाही. हा कधी पैदा झाला. कुठल्या तारखेला, ब्राम्हणांच्या कुठल्याच ग्रंथात उल्लेख नाही. समजा तारीख लिहली असती तर हे ब्राम्हण प्राचीन...प्राचीन असा बोंबलत फिरणार नाहीत. या सार्‍या बाबी इंग्रजांनी हुडकून काढल्या. पुरावे गोळा करण्यासाठी पुरातत्व विभाग त्यांनी सुरू केला. जमीनीच्या खाली खोदले त्यामध्ये मौर्यांचे शिलालेख मिळाले. सारे कागदोपत्री पुरावे मिळाले. 


पुरातत्व विभागाचा पुरावा म्हणजे फायनल होय. कुठलाच विवाद नाही. याबाबत इतिहासाच्या सारा घोटाळा आम्ही पुराव्यानिशी सांगू शकतो. त्या आधारे सप्रमाण सिद्ध करू शकतो. माझ्याजवळ पुरातत्वीक प्रमाण आहे. त्या आधारे बोलत आहे. नरेंद्र मोदींसारखा फेकत नाही. ब्राम्हणांच्या काही प्रचारकांनी सोशल मीडियात लिहले की, भाषण करायचे असेल तर वामन मेश्राम यांच्यासारखे करायला हवे. त्यांच्याकडून शिकायला हवे. मात्र त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही. परंतु भाषण कसे करायचे हे त्यांच्याकडून शिकायला हवे. पुरावा, तर्कशिवाय मी कधीच बोललेलो नाही. तसे झाले असते तर मी एव्हाना मी जेलमध्ये गेेलो असतो असे मेश्राम यांनी सांगितले.


यावेळी मौर्य क्रांती संघाने २ लाख जनआंदोलन निधी व बामसेफ युनिटने ३ लाखांचा हार घातला. या परिषदेचे उद्घाटन  ऑनलाईन पद्धतीने डॉ.मुरहरी केळे यांनी केले. विचारपीठावर टी.टी.सुभेदार, प्रताप पाटील, सत्यवान दुधाळ, कोमल दुधाळ, प्रा. डॉ.बजरंग कोरडे, लक्ष्मण व्हटकर, तुषार सहाने, प्रवीण काकडे, अघडते गुरूजी, पार्थ शिंदे उपस्थित होते.  मान्यवरांचे स्वागत चंद्रसेन लहाडे, प्रास्ताविक बलभीम माथेले तर सूत्रसंचालकन राजीव हाके, ऍड. कोळेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या मुख्य संयोजकाची जबाबदारी राहुल शिंगाडे यांनी पार पाडली. आभार प्रकाश कुटे व रमेश माने यांनी मानले. विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मौर्य क्रांती संघाच्या या कार्यक्रमाला लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
भाजपा सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा निती आयोगाने
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
देशात गेल्या तीन वर्षांत दरडोई उत्पन्नात फक्त तीन हजारा
परमबीर सिंग अखेर निलंबित
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper