×

गुजरात दंगल जाणूनबुजून घडवण्यात आली

Published On :    24 Nov 2021
साझा करें:

झाकिया जाफरी यांचे वकील कपिल सिब्बल यांचा आरोप



नवी दिल्ली: गुजरात दंगल जाणूनबुजून घडवण्यात आली असा आरोप झाकिया जाफरी यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. नरेंद्र मोदी आणि इतर ६४ जणांना गुजरात दंगल प्रकरणी क्क्लिनचीट दिल्याप्रकरणी झाकीया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुनावणीवेळी सिब्बल बाजू मांडत होते.


सिब्बल म्हणाले की, ही अशी हिंसा आहे जी मुद्दाम घडवली गेली आणि कागदपत्रे तशीचदर्शवत आहेत. कायद्याला कलंक लावण्याचे हे प्रकरण आहे. गोध्रा नंतरची दंगल ही राष्ट्रीय शोकांतिका आहे. २८ फेब्रुवारी २००२ रोजी अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीमध्ये झालेल्या हिंसाचारात ठार झालेले कॉंग्रेस नेते एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ जणांना एसआयटीने दिलेल्या क्लीन चिटला आव्हान दिले आहे.


हे पण वाचा: कृषी कायद्यांप्रमाणे नवे कामगार कायदेही गुंडाळणार


सिब्बल म्हणाले की ही कागदपत्रे अधिकृत रेकॉर्डचा भाग आहेत आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) या पैलूंचा तपास केला नाही. याचिकाकर्ता कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा संदर्भ देत नाही किंवा तो कोणावरही खटला चालवू इच्छित नाही. हा मुद्दा व्यक्तींवर खटला चालवण्याच्या मुद्यापेक्षा अधिक व्यापक आहे. त्याचा संबंध या देशाच्या राजकारणाशी आहे. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये संस्थांनी कोणत्या पद्धतीने कार्य करावे याच्याशी ते संबंधित आहे. ती राष्ट्रीय आणीबाणी होती. साबरमतीत जी घटना घडली ती राष्ट्रीय आणीबाणी होती. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसचा एक डबा जाळला, त्यात ५९ जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या.


हे पण वाचा: शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत एक लाख शेतकरी जमणार


युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकिलांनी साबरमती एक्स्प्रेसच्या घटनेनंतर जे घडले ते राष्ट्रीय शोकांतिका असल्याचे सांगितले. मी राज्यघटनेकडे पाहत आहे आणि स्वतःला म्हणत आहे की, आपल्या व्यवस्थेत कायद्याच्या अधिपत्याखाली याची परवानगी दिली जाऊ शकते आणि ती परवानगी दिली जात असेल तर आमचे संरक्षण कोण करेल? विशेष तपास पथकाने रेकॉर्डवर उपलब्ध असलेल्या अनेक बाबी आणि साहित्य तपासले नाही आणि ट्रायल कोर्टानेही त्याकडे लक्ष दिले नाही. या कटाचा थेट पुरावा क्वचितच कोणाकडे असू शकतो आणि तो परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे जो तपासानंतरच बाहेर येईल. तुम्ही तपास केला नाही, तर तुम्ही कधीच परिस्थिती शोधू शकणार नाही आणि तुम्ही कधीही कट उघड करू शकणार नाहीत असे सिब्बल यांनी सांगितले.


मी येथे कट रचण्यासाठी आलेलो नाही. तो माझा व्यवसाय नाही. हे एसआयटीचे काम आहे. त्यांनी चौकशी केली नाही, अशी माझी तक्रार आहे, असे सिब्बल म्हणाले. प्रजासत्ताक हे जहाजासारखे आहे, ते स्थिर केले पाहिजे आणि कायद्याचे वैभव राखले तरच जहाज स्थिर राहील, असे म्हणत सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाचा शेवट केला.सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने बुधवारी एसआयटीच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांचा युक्तिवाद ऐकणार असल्याचे सांगितले. 


हे पण वाचा: आसाममधील अनेक संघटना सीएएविरोेधात एकवटल्या


सिब्बल यांनी यापूर्वी असा युक्तिवाद केला होता की झाकिया जाफरी यांची २००६ ची तक्रार होती की नोकरशाहीची निष्क्रियता, पोलिसांची मिलीभगत, द्वेषयुक्त भाषण-नारे आणि हिंसाचाराचे मोठे षड्यंत्र होते.गोध्रा ट्रेन घटनेनंतर झालेल्या हिंसाचारात माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६८ जणांचा मृत्यू झाला होता. मोदी आणि इतर ६३ वरिष्ठ अधिकार्‍यांना क्लीन चिट देताना, एसआयटीने २०१२ मध्ये दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते की, त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यायोग्य पुरावा नाही. झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून गुजरात उच्च न्यायालयाच्या ५ ऑक्टोबर २०१७ च्या एसआयटीच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळण्याच्या आदेशाला आव्हान दिले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
भाजपा सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा निती आयोगाने
८० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा ठपका
नागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper