×

परमबीर सिंग २३४ दिवसांनी मुंबई पोलिसांसमोर हजर

Published On :    25 Nov 2021
साझा करें:

चौकशीचा ससेमिरा सुरू



मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग तब्बल २३४ दिवसांनंतर मुंबई पोलिसांसमोर हजर झाले आहेत. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा क्रमांक ११ सिंग यांची गेल्या पाच तासांहून अधिक वेळ चौकशी करत आहे. त्यामुळे सिंग यांच्यामागील चौकशीचा ससेमिरा सुरू झाल्याचे समजले जात आहे.


सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले. त्यामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यांना ईडीने अटकही केली. देशमुख सध्या कोठडीत असून परमबीर सिंग हे फरार होते. 


 हे पण वाचा: पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीनंतर आता वीज दरवाढीचा शॉक


त्यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून बिमल अग्रवाल या बिल्डरने दाखल केलेल्या तक्रारीबाबत त्यांची चौकशी सुरू आहे. यातील काही गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. या गुन्ह्यांमध्ये अपहरण, खंडणी, भ्रष्टाचार आणि ऍट्रॉसिटीचा समावेश आहे. याबाबत मुंबई आणि ठाण्यातील न्यायालयांनी सिंग यांना फरार घोषित केले होते. तसेच त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू होती.


हे पण वाचा:  तीन राज्यांतील ३१४ जागांवर शेतकर्‍यांचे वर्चस्व



दरम्यानच्या काळात सिंग यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले. त्यानंतर लगेचच परमबीर सिंग यांनी आपण चंदीगढ येथे असल्याचे सांगितले. सिंग यांनी त्यानंतर मुंबईतील येत गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. सिंग यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिसांत १५ कोटींच्या खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी दोघेजण अटकेत आहेत. कोपरी पोलिसांत सिंग यांच्यासह एक उपायुक्त आणि अन्य तिघांविरोधात खंडणी, फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 हे पण वाचा: राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्या जेलभरोने शासक वर्गाला फुटला घाम



ठाण्यातील नगर पोलिस स्टेशन केतन तन्नाने दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याबरोबरच हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी केली आहे. पोलिस अधिकारी अनुप डांगे यांनी सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणांची चौकशी सुरू असून एसआयटी, गुन्हे शाखा आणि एससीबी स्वंतत्र चौकशी करत आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
देशात गेल्या तीन वर्षांत दरडोई उत्पन्नात फक्त तीन हजारा
परमबीर सिंग अखेर निलंबित
एसटीचे ९ हजार कर्मचारी निलंबित
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper