×

संविधान जाळणारी विदेशी ब्राम्हणी पिलावळ

Published On :    26 Nov 2021
साझा करें:

भारतीय प्रजासत्ताक ७३ वर्ष पूर्ण करून ७४ वर्षात पदार्पण करीत असतांना भारतीय संविधानाने संविधान न मानणारे देशद्रोही आणि देशभक्त उघड केले. देशातील साडेतीन टक्के असलेला समाज ज्या संविधानामुळे सुरक्षित होता.त्या समाजाची दुसरी तिसरी पिलावळ भारतीय संविधान जाळण्याची हिंमत करत नव्हती ती बाकीच्या समाजाला कट्टरपंथीय हिंदू बनवून लढवत होती.भारतीय प्रजासत्ताक ७३ वर्ष पूर्ण करून ७४ वर्षात पदार्पण करीत असतांना भारतीय संविधानाने संविधान न मानणारे देशद्रोही आणि देशभक्त उघड केले. देशातील साडेतीन टक्के असलेला समाज ज्या संविधानामुळे सुरक्षित होता.त्या समाजाची दुसरी तिसरी पिलावळ भारतीय संविधान जाळण्याची हिंमत करत नव्हती ती बाकीच्या समाजाला कट्टरपंथीय हिंदू बनवून लढवत होती. आणि त्यांचे छुपे समर्थन करणारी विविध समाजातील राजकीय वेश्या व्यवसाय करणारी (कार्यकर्ते नेते) मंडळी मूक बसते म्हणजेच भारताचं संविधान जाळणारे जर देशद्रोही आहेत, मग त्यांचे मूक समर्थन करणारी ही पिलावळ देशद्रोहीच समजली पाहिजे. भारत माता की जय,वंदे मातरम न म्हणणार्‍यांना देशद्रोही ठरविणारे देशप्रेमी संविधान जाळणार्‍यांना देशद्रोही का म्हणाले नाही? संविधानामुळे सर्व जातीधर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने नांदणारे सर्वधर्मसमभाव मानणारे समाज बांधव, ही घटना घडल्यानंतर कोण कोणत्या समाजातून निषेध नोंदविला जात आहे. प्रिंट मीडिया, चॅनल मीडिया किती प्रभावीपणे या संविधान जाळणार्‍या लोकांची दखल घेत आहे. हाच का लोकशाहीचा चौथा खांब. हीच का शोध पत्रकारिता? संविधानाने देशद्रोही पत्रकार,देशभक्त पत्रकार उघड केले.


संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.


हे पण वाचा: चला भारतीय संविधान समजून घेऊयाभारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. त्याची अंमलबजावणी आजही शाळा, कॉलेज, ग्रामपंचायतमध्ये केली जात नाही. त्याचं संविधानानुसार देशद्रोही गुन्हे दखल झाले पाहिजे होते. म्हणजे कोणीच त्याचे उल्लंघन करण्याची हिंमत करणार नाही.


देशात राजकीय परिवर्तन झाले तेव्हापासून संविधान बदलण्याची त्यात चुका काढणार्‍यांची संख्या वाढली ती एवढी पुढे गेली की दिल्ली पोलीसासमोर त्यांनी जंतर मंतरवर जाहीरपणे संविधान जाळण्याची हिंमत दाखविली. त्या विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानणार्‍या  विशिष्ट समाजच रस्त्यावर उतरून निषेधार्थ आंदोलन करीत होता. काही लोक निषेधाचे पत्रक काढून शांत बसले.सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावर एका ओळीचाही विरोध न दर्शवणारे खरेच देशप्रेमी आहेत काय?हेच संविधानानेच देशद्रोही देशभक्त उघड केले.


इतिहास सांगतो की हा देश हजारों वर्ष परकीयांचा गुलाम का राहिला? कारण त्यांच्यासाठी धर्म महत्वाचा आहे, देश नाही. ज्या देशातील नागरिकांची राष्ट्रध्वज,राष्ट्रगीताबद्दल जशी आस्था आहे.तशीच देशातल्या नागरिकांना देशाच्या संविधानाबद्दल आस्था का नाही? संविधानाने मनुस्मृतीचे समर्थन करणार्‍या कर्मठांचं धार्मिक वर्चस्व मोडीत काढलं आणि तथाकथित चारही वर्णांना एका पातळीवर आणलं, म्हणून त्यांच्या पोटात कायमस्वरूपी दुखतंय.त्यामुळे दर सहा महिन्यांनी, वर्षांनी त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर येते आणि देशभरात असंतोष निर्माण करून जाते. पण संविधान त्यांची देशद्रोही देशभक्ती उघड करते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र अभ्यासातुन,कष्टातुन संविधान घडविले आहे.त्यामुळे त्यांचे नाव संविधानाशी जोडलेलं आहे.हे कोणीच नाकारू शकत नाही.


धर्मसत्ता,शिक्षणसत्ता,प्रशासकीय सत्ता,आर्थिक सत्ता आणि राजकीय सत्ता यावर कायमस्वरूपी वर्चस्व या सोडेतीन टक्केवाल्या विशिष्ट समाजाचे आहे.जगात विज्ञानाने किती ही प्रगती केली असली तरी भारतातील एम बी बी एस डॉक्टर, पी एच डी प्राध्यापक, एम टेक,बी टेक इंजिनियर,बॅरिस्टर झालेला वकील, एम बी ए झालेला एम डी, सी ई ओ आणि  उच्च शिक्षित कोणत्याही अधिकारी साडेतीन टक्के वाल्यांच्या हातून पूजा,अर्चा,होम केल्याशिवाय आणि गंडा,धागा- दोरा बांधल्या शिवाय जगु शकत नाही एवढे त्यांचे भारतीय जनतेच्या मेंदूवर नियंत्रण असतांना ही ते समाधानी नाहीत. उठता बसता त्यांना संविधान आणि आंबेडकर यांना मानणारा समाज का डोळ्यात सळतो, का त्यांच्या मनात त्याचा आकस आहे. अगदी तो आम्ही जातपात मानत नाही म्हणणार्‍यांच्या वागणुकीतूनही कळत-नकळत डोकावतो. स्त्रियांना, मागासवर्गीय ओबीसी, आदिवासी,अल्पसंख्यांकांनाही स्वाभिमानाने जगण्याचा हक्क संविधान देतं, त्याचाच मनुवादी कर्मठांना राग आहे. हे ते ७४ वर्ष झाले लपवू शकले नाहीत.


भारताचं संविधान नागरिकांच्या श्रध्दा आणि उपासना यांचं सर्वांना समान स्वातंत्र्य देते, पण दगडांच्या मूर्तीला स्टेथोस्कोप लावून तपासणार्‍यांना ते नाकारते, कारण हे संविधान विज्ञानवादाचा पुरस्कार करणारे आहे. अंधश्रद्धाच्या आत श्रद्धा ठेवून शोषण,अन्याय अत्याचाराला चाप लावते आणि नेमकं तेच शोषण मनुवादी मनुस्मृतीचे थोतांड करणार्‍या कर्मठांच्या पोटापाण्याची तरतूद करते. हे त्यांना माहिती असल्याने मनुवादी कर्मठ संविधान नाकारतात.


जात, धर्म, रंग, वर्ण, लिंग कशाच्याही आधारे नागरिकांत भेदभाव करता येणार नाही, हे संविधानाचं तत्व सांगते. तर मनुस्मृती ते भेदभाव पाळण्याचे कडक नियम सांगून कारवाई करण्यासाठी भाग पाडते. संविधान अशा प्रकारच्या भेदभावास बळकटी देणार्‍या पारंपरिक पौराणिक धार्मिक मानसिकतेला ठोकरून लावते. याकरीता इथल्या मनुवादी कर्मठांना संविधान नकोय.म्हणूनच ते वेळ काळ पाहुन आपले नियंत्रण किती लोकांवर समाजावर आहे हे चेक करण्यासाठी संविधान आणि आंबेडकर यांच्या विरोधात गरळ ओकून तपासून पाहतात.


स्वर्ग आणि नरक, भुताप्रेतांची, आत्माबित्म्याची, अवतारांची, कर्मकांडांची, पुजा, विधी, होमहवन यांचं स्तोम माजवून लोकांना सतत भयाखाली ठेवून त्यांची लुबाडणूक करून वर्षानुवर्ष ऐतखाऊपणावर जगण्याची सवय झालेल्यांना आणि केवळ जातीच्या आधारावर गुणवत्तेचा टेंभा मिरवणार्‍यांना संविधानाने इतरांसारखंच कामधंदा मेहनत करून पोट भरायला मजबूर केले. हे मुख्य गोष्ट आहे. त्यामुळे साडेतीनटक्केवाल्या लोकांना संविधान मोडीत काढून पुन्हा ऐतखाऊ मनुवादी शोषणव्यवस्था प्रस्थापित करायची आहे. खरं कारण वर्चस्व प्रस्थापित करण्याचं आहे. संविधान त्यासाठी जाळलं जाते. हा विषय कोण्या आंबेडकरवाद्यांचा नाही, कोण्या पुरोगामी,धर्मनिरपेक्ष लोकांचा नाही. हा प्रश्न देशावर प्रेम करणार्‍या प्रत्येक नागरिकाचा आहे. विषय कोणताही असो,तुम्हाला समर्थनार्थ किंवा विरोधात मत मांडण्याचा पुरेपूर अधिकार आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचाही अधिकार आहे,पण संविधान जाळण्याच्या कृतीचं कदापि समर्थन होऊ शकत नाही.


भारतातील तमाम नागरिकांनी आपली जात,धर्म,भाषा,प्रांत,सामाजिक,राजकीय पक्ष, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून संविधानाचे रक्षण करावे तरच संविधान तुमचे रक्षण करेल. आपण भारतीय नागरिक आहोत. संविधानामुळे भारत जाती धर्मा पेक्षा मोठा आहे. तो अखंड राहावा यासाठी संविधान राहिले पाहिजे. अनेक मान्यताप्राप्त धर्माचे ठेकेदार साधू संत, महंत,महाराज त्याच संविधानामुळे जेलची हवा खात आहेत. कोणत्याही मंत्र,चमत्कार देव देवी त्यांना आजपर्यंत वाचू शकला नाही. मग आपल्याला कोण वाचविणार तर तेच संविधान. त्यांना संविधानाने देशद्रोही की देशभक्त उघड केले. म्हणूनच आपण फक्त भारतीय बना. संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९ 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण
शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?
१३ कोटींचा पेपर प्रिंटिंग कंपनीकडे ना प्रिंटिंग मशीन, ना
शेतकरी आंदोलन: गुन्हे मागे घेईपर्यंत घरी परतणार नाही
पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले
ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास देशव्यापी आंदोलन कर
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा विदेशी ब्राम्ह
भाजपा सरकारच्या बेगडी राष्ट्रवादाचा बुरखा निती आयोगाने
राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब
एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांवर उगारणार ‘मेस्मा’चा बडग
राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजब
परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
जातिनिहाय जनगणना नाहीच
राजकीय पक्षांना मिळाला १ हजार १०० कोटी रुपयांचा फंड
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याबाबत म
२०२० मध्ये युएपीए अंतर्गत १ हजार ३२१ लोकांना अटक
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्प
देशात गेल्या तीन वर्षांत दरडोई उत्पन्नात फक्त तीन हजारा
परमबीर सिंग अखेर निलंबित
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper