×

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्पण करणारे संघिष्ट रामनाथ कोविंद यांच्या आंबडवे भेटीचे कारण काय?

Published On :    3 Dec 2021
साझा करें:

विश्‍वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दि. ६ डिसेेंबर २०२१ रोजी बाबासाहेबांच्या मूळगावी आंबडवे येथे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत आहेत. अचानक बाबासाहेबांच्या मूळगावी येण्याचे कारण काय? काहीतरी षड्यंत्र असू शकते.



विश्‍वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी दि. ६ डिसेेंबर २०२१ रोजी बाबासाहेबांच्या मूळगावी आंबडवे येथे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत आहेत. अचानक बाबासाहेबांच्या मूळगावी येण्याचे कारण काय? काहीतरी षड्यंत्र असू शकते. कारण संघिष्ट लोकांकडे षड्यंत्र असल्याशिवाय ते असे कार्यक्रम करीत नाहीत. 


या रामनाथ कोविंद यांनी जाणीवपूर्वक दि. १४ एप्रिल २०२० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांनी ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली होती. एवढ्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला जयंतीदिनी अभिवादन करतात की श्रद्धांजली अर्पण करतात हे माहित नाही असे होणारच नाही. मात्र जाणीवपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. यावरून कोविंद यांचा मेंदू हा ब्राम्हणी षड्यंत्रकारी विचाराने ग्रस्त आहे असेच म्हणावे लागणार आहे. त्यावेळी केवळ कोविंदच नव्हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासारख्या संघिष्ट लोकांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रकार केला होता. यावरून संघिष्टांच्या मनात बाबासाहेबांविषयी किती अढी आहे हे समोर आले होते. तेच कोविंद आंबडवेत भेट देत आहेत.


याच संघिष्टांच्या सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संंबधित ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांना पंचतीर्थ म्हणून घोषित केले होते. त्यात मूळगाव आंबडवे, जन्मस्थळ महू, मुंबईतील इंदू मिल, लंडन येथील घर आणि २६ अलीपूर रोड. काय संघिष्टांच्या सरकारने पंचतीर्थांचा विकास केला. केवळ घोषणाबाजी करण्यात आली. आजही बाबासाहेबांचे मूळगाव आंबडवे विकासापासून कोसो दूर आहे. ज्या महामानवाने देशाला सर्वोच्च अशी राज्यघटना दिली, त्या बाबासाहेबांचे मूळगाव विकासापासून कोसो दूर असेल तर ब्राम्हणी सरकारांनी काय दिवे लावले? मग ते कॉंग्रेस असो अथवा भाजपा.


कोविंद हे देशाचे राष्ट्रपती आहेत. तरीही त्यांना ब्राम्हणांकडून जगन्नाथ मंदिरात येऊ दिले गेले नाही. त्यांना मंदिराच्या पायरीवरच पूजा करायला भाग पाडले गेले. यावरून तुम्ही घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पदी असलात तरी धार्मिकदृष्ट्या व वर्णव्यवस्थेवरनुसार आम्हीच सर्वोच्च स्थानी आहोत असा दाखवण्याचा ब्राम्हणांचा खटाटोप आहे. त्यामुळे त्यांनी कोविंद यांना मंदिरात येऊ दिले नाही. अर्थात कोविंद यांना तो अपमान सहन होऊ शकतो, कारण ते संघिष्टांच्या मुशीतूनच तयार झाले असल्याने त्यांनी गुलामी मान्य केलेली आहे. एवढा मोठा अपमान होऊनही त्यांनी तोंडातून ‘ब्र’ देखील काढलेला नाही.


आज संघिष्टांना अचानक बाबासाहेब कसे आठवले? काहीतरी षड्यंत्र असू शकते. याच संघिष्टांनी संविधान संपवले आहे. संविधान संपवण्यासाठी कोविंद यांच्यासारख्या बहुजनाचा वापर करण्यात आला आहे. एकच उदाहरण देतो संविधानात कुठल्याही प्रकारे आर्थिक आरक्षणाची तरतूदच नाही, तरीही सवर्णांसाठी १० टक्के आर्थिक आधारावर केंद्राने कायदा केल्यानंतर त्याला तत्काळ मंजुरी देण्याचे काम राष्ट्रपती म्हणून कोविंद यांनी केले. संविधानात आर्थिक आधारावर आरक्षण नाही हे कोविंद यांना माहित नसेल का? निश्‍चितच माहित असणार. केंद्राने केलेला हा कायदा त्यांना फेटाळता आला असता मात्र तो त्यांनी फेटाळला नाही. उलट त्यावर स्वाक्षरी करून सवर्णांचा मार्ग मोकळा केला. 


म्हणजेच  केंद्राने व राष्ट्रपती केविंद यांनी संविधानाच्या विरोधात जाऊन काम केले. असे अनेक निर्णय सांगता येतील, देशात सारासार संविधानाच्या विरोधात निर्णय घेतले जात आहेत. याला कारण संविधान राबवणारे हात हे विदेशी अल्पसंख्य ब्राम्हण आहे. संविधान अर्पण केल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, मी संविधान कितीही चांगले लिहले असले तरी ज्यांच्या हातात संविधान राबवण्याची जबाबदारी आहे त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही तर संविधान काय कामाचे नाही. आज त्यांचे ते विधान तंतोतंत खरे ठरले आहे.


संघिष्ट डॉ.केशव हेगडेवार, माधव गोळवळकर यांची विचारधारा ही विषमतेवर, उच्चनिचतेवर आणि वर्णव्यवस्थेवर आधारित आहे. संघिष्टांच्या विचारधारेचा पाया हा विषमतेवर आधारित आहे. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारित आहे. संविधानाची प्रास्ताविकाच या चतुसुत्रीवर आधारित आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकात बाबासाहेब म्हणतात, भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून आर्य आणि नाग यांच्यातील खुनी संघर्षाचा आहे. 


राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या भाषेत शेठजी, भटजी, लाटजी विरूद्ध शुद्र-अतिशुद्र, बाबासाहेबांच्या भाषेत आर्य विरूद्ध अनार्य आणि कांशीरामजींच्या भाषेत ८५ विरूद्ध १५ तर बामसेफच्या भाषेत मूलनिवासी विरूद्ध ब्राम्हण विदेशी असा तो संघर्ष आहे. आज देशात परस्पर विरोधी विचारधारेचा संघर्ष सुरू आहे. आपण पाहिले तर कधीही नाग लोकांनी हार मानलेली नाही. आठवा तो १ जानेवारी १८१८ चा कोरेगाव-भीमाचा इतिहास. त्यामुळे आज संघिष्ट लोकांनी बाबासाहेब आमचे आहेत असे सांगण्याचा कितीही बळेबळे प्रयत्न केला तरी मूलनिवासी बहुजनांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडता कामा नये. 


राष्ट्रपती या नात्याने कोविंद हे भारताच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात जाऊ शकतात, त्यांना घटनेने अधिकार दिलेला आहे. मात्र त्यांनी आंबडवेत येताना संघिष्टांचे विषमतेचे विचार पेरू नयेत, कारण आंबडवे हे समतामूलक समाज निर्मितीचे केंद्र आहे. त्या समतामूलक समाज निर्मितीच्या विचारधारेतून ‘समता’च हवी ‘समरसता’ नसावी असे सांगावेसे वाटत आहे.

दिलीप बाईत
९२७०९६२६९८

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींची दशा आणि दिशा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीवर ७३ लाखांचा खर्च
ओबीसी आरक्षण: इम्पिरिकल डेटाबाबत २४ जानेवारीला मुख्यमं
हिंदू धर्म अस्तित्वात नसतानाही तथाकथित हिंदू धर्माच्या
देशातील उपासमारीची जुनी आकडेवारी सादर
तब्बल ५ कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार
वेगवान आर्थिक विकासासाठी धोरण बदलण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाला ओबीसींचा डेटा सोपवा
कोरोना लसीच्या सक्तीविरोधात आंदोलनाची घोषणा होताच केंद
जनमत विरोधात असल्याने भाजपाला आठवले राम मंदिर आणि साड्य
संघर्षाचा त्रिकोण, सरकार,पोलीस आणि नागरिक
उत्तर प्रदेशात लोकांचा उद्रेक
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २७ टक्के ओबीसी आ
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण
भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला
एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुल
आरोग्य कर्मचार्‍याची नावाड्यावर लसीकरणाची सक्ती
समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा
आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून झाकण्या
गोव्यातील २३ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper