×

राज ठाकरेंचा ‘जय श्रीराम’ चा नारा ब्राम्हणवादाच्या मजबुतीकडे

Published On :    4 Dec 2021
साझा करें:

हिंदुत्वाच्या नावाखाली स्वत:ची राजकीय खुंटी बळकट करण्याचा प्रयत्न



मुंबई : राज्याच्या राजकारणात सपशेल अपयशी ठरलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘जय श्रीराम’ चा नारा देण्याचा निर्णय घेतल्याने हा नारा मात्र ब्राम्हणवादाला मजबुतीकडे नेणारा आहे. यानिमित्ताने हिंदुत्वाच्या नावाखाली स्वत:ची राजकीय खुंटी बळकट करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. यासाठी त्यांनी अयोध्या दौरा आखला असून त्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.


 आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी शिवथीर्थ बंगल्यावर मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीस अशा प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या आगामी महाराष्ट्र आणि अयोध्या दौर्‍याची माहिती दिली.


राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यावर जाण्याचाही निर्णय झाला आहे. मात्र अद्याप याची तारीख निश्चित होणे बाकी असून राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा संपल्यानंतर त्याचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.


ऑक्टोबर महिन्यात मॉं कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी कृष्णकुंजवर जावून राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत हिंदू राष्ट्र हा अजेंडा होता. राज ठाकरे यांच्यासारखा माणूस त्यांना हिंदू राष्ट्रासाठी योग्य वाटतो असे सांगण्यात आले होते. 


आता हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राम्हणांचे राष्ट्र त्यांना निर्माण करायचे आहे. परंतु ब्राम्हणवादाची तळी उचलून धरलेल्या राज ठाकरे यांना त्याची कल्पना असली तरी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी हिंदू म्हणून ढोल बडवायला सुरू केली आहे. त्या माध्यमातून ते तरूणांना भडकावू शकतात अशी एक भीती व्यक्त केली जात आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींची दशा आणि दिशा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीवर ७३ लाखांचा खर्च
ओबीसी आरक्षण: इम्पिरिकल डेटाबाबत २४ जानेवारीला मुख्यमं
हिंदू धर्म अस्तित्वात नसतानाही तथाकथित हिंदू धर्माच्या
देशातील उपासमारीची जुनी आकडेवारी सादर
तब्बल ५ कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार
वेगवान आर्थिक विकासासाठी धोरण बदलण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाला ओबीसींचा डेटा सोपवा
कोरोना लसीच्या सक्तीविरोधात आंदोलनाची घोषणा होताच केंद
जनमत विरोधात असल्याने भाजपाला आठवले राम मंदिर आणि साड्य
संघर्षाचा त्रिकोण, सरकार,पोलीस आणि नागरिक
उत्तर प्रदेशात लोकांचा उद्रेक
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २७ टक्के ओबीसी आ
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण
भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला
एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुल
आरोग्य कर्मचार्‍याची नावाड्यावर लसीकरणाची सक्ती
समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा
आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून झाकण्या
गोव्यातील २३ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper