×

सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण

Published On :    5 Dec 2021
साझा करें:

आरएसएसप्रणित भारतीय मजदूर संघाचे कामगार कर्मचारी अधिकारी वर्गात जे प्राबल्य वाढले होते ते कोणालाच दिसत नव्हते. त्यांनी संघटित, असंघटित कामगार, मजुरांवर महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार थोपवला. त्याचबरोबर मोठं मोठी आश्‍वासने दिली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख ही घोषणेने तर गोरगरिबांना दिवसा स्वप्ने पाहायला लावली. त्यासाठीच ब्राम्हणशाही व भांडवलशाही हातात हात घालून चालायला लागली.



देशात नव्हे तर जगात ज्या काही सामाजिक राजकीय क्रांत्या झाल्या त्या कामगारांनी केल्या असे इतिहास सांगतो,भारतात ही जी सत्तर वर्षांनी संपूर्ण बहुमताने सत्ता परिवर्तन झाले ते ही कामगारांनी केले,यात संघटित कामगारांसोबत असंघटित कामगार मोठ्या संख्येने उभा राहिला. आरएसएसप्रणित भारतीय मजदूर संघाचे कामगार कर्मचारी अधिकारी वर्गात जे प्राबल्य वाढले होते ते कोणालाच दिसत नव्हते. त्यांनी संघटित, असंघटित कामगार, मजुरांवर महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार थोपवला. त्याचबरोबर मोठं मोठी आश्‍वासने दिली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख ही घोषणेने तर गोरगरिबांना दिवसा स्वप्ने पाहायला लावली. त्यासाठीच ब्राम्हणशाही व भांडवलशाही हातात हात घालून चालायला लागली.आज ती यशस्वी वाटचाल करीत आहे.


अनेक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भरमसाठ आश्‍वासने दिली,बिहारला सव्वा लाख कोटी, करोनासाठी वीस हजार कोटी आणि गेल्या तीन स्वातंत्र्यदिनी प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेले १०० लाख कोटींचे इन्फ्रास्ट्रुक्टर तयार करून देणारे आश्‍वासन जनता विसरू शकत नाही. पण म्हणतात नां लबाडाच्या घरचे जेवणाचे आमंत्रण जेवण भेटल्याशिवाय खरे नसते. केंद्र सरकारकडे गरिबांना देण्यासाठी पैसे नाहीत तर श्रीमंत भांडवलदारांचे कर्ज कसे माफ केले जाते? केंद्र सरकारला करोडो रुपये उत्पन्न देणार्‍या सार्वजनिक कंपन्या कर्जबाजारी भांडवदारांच्या कंपन्यांना कसे काय विकत आहेत.तो पैसा कुठे जात आहे,त्यांची माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगण्याची हिंमत ५६ इंच छातीच्या प्रधानमंत्री व अर्थमंत्री यांना नाही. त्याच बरोबर ३२ ते ३६ इंच छाती असणार्‍या प्रिंट, चॅनल मीडियाच्या पत्रकारांनाही विचारण्याची हिंमत नाही ही सर्वात मोठ्या लोकशाही(?)असलेल्या देशात घडत आहे.


देशात जो समाज अन्याय अत्याचार विरोधात जनआंदोलन करेल त्याला देशद्रोही ठरविला जातो.भारत हा कधीकाळी कृषिप्रधान देश होता. शेतकर्‍यांचा राज्यकर्त्यावर कायम दबाव होता.सर्वात मोठा मतदार म्हणूनच त्या अन्न दात्याची दखल घेतली जात होती.  भांडवलदारांच्या चौकीदाराने आणि ब्राम्हणी कलम कसायांनी शेतकर्‍यांची हर तर्‍हेने बदनामी केली.लाठ्याकाठ्या,अश्रुधुर,पाण्याचे फवारे मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तरी तो शेतकरी मागे नाही हटला. 


त्यांच्या मार्गात काटेरी कुंपणासोबत लोखंडी खिळे पेरून त्याला थांबविण्याचा प्रयत्न झाला. त्याचं रेशनिंग आणि पिण्याचं पाणी तोडून, वीज आणि इंटरनेट बंद करून पाहिले, त्यांच्या सनदशीर आंदोलनाच्या एक वर्षाच्या अतिशय परिश्रमपूर्वक व अथक आंदोलनात सुमारे ६५० हुन अधिक शेतकर्‍यांचे बळी जाऊ देऊनही त्यांना अतिरेकी, खलिस्तानी, नक्षलवादी अर्थात देशद्रोही ठरविण्यात आले. शेतकर्‍यांच्या शेतीचे सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण करण्याचे मनसुबे उध्वस्त झाले.कारण पंजाब, उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे मनुवादी विचारांचे भांडवलदारांचे सरकार मागे हटले. पण त्यांचे अंतिम उदिष्ट ते विसरणार नाहीत. हे भारतीय नागरिकांनी लक्षात ठेवावे.


केंद्र सरकार उत्पन्न देणार्‍या सार्वजनिक कंपन्या बिनधास्तपणे विकून त्याचे खासगीकरण करत असतांना महाराष्ट्रात एसटी कालबाह्य झाली आहे आता ती खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करू शकत नाही.तिचे खाजगीकरण करा. ही मागणी शिस्तबद्धपणे एक अत्यंत क्रूर खेळ खेळत रेटली जाते आहे. बी.एस.एन.एल सारख्या उत्पन्न देणार्‍या कितीतरी सरकारी कंपन्या अशाच पद्धतीने डब्ब्यात घालवल्या.नव्हे शिस्तबद्ध पद्धतीने आकडे मोड करून भांडवलदारांना दान देण्यात आल्या.


भारतीय घटनाकारांनी अगोदरच सांगितले होते की देशाचे दोनच दुश्मन आहेत.एक ब्राम्हणशाही दुसरी भांडवलशाही हे हातात हात घालून शिस्तबद्ध पद्धतीने राजकारणी, ट्रेड युनियन महासंघ, प्रशासकीय अधिकारी यांच्या एकमताने देशाचे सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण करीत आहेत. मला एकच प्रश्न विचारायचा आहे.या देशात DRDO (Defence Research and Development Organisation) आहे, ISRO  (Indian Space Research Organisation) आहे. हे जगाशी स्पर्धा करतात.चार पावले पुढेच चालतात.या सुद्धा सरकारी संस्थाच आहेत.यांच्यात सुद्धा युनियनबाजीपासून सगळे दोष आहेत.तरी ही पण हे यशस्वी होतात आणि बाकीच्या सरकारी कंपन्या डब्ब्यात जातात याचे कारण काय?.


महाराष्ट्राचा प्रश्न नाही, एसटीचा पण नाहीच. प्रश्न आहे आपल्या मनोवृत्तीचा, प्रश्न आहे आपल्या राजकारणी मंडळींच्या प्रेताच्या टाळूचे लोणी खाण्याच्या अमर्यादित मानसिक क्षमतेचा. ब्राम्हणी राजकारणी लबाड लांडगे असतील तर त्यांचे अनुयायी जंगली कुत्रे. शेवटी विषमतावादी विचारधारा सर्वांना सोबत घेऊन हिंसक बनवते.आणि बहुसंख्ये बहुजन समाजाचाच बळी घेते.त्यालाच सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण म्हटले जाते. बहुजन समाजाचे ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या कल्याण व विकास होत असतो त्या कोणत्याही संस्थेचा त्यावेळी त्यांना विनाश करायचा असतो.कामगार चळवळीतील ब्राम्हणी नेतृत्व असलेल्या जंगली कुत्र्यांच्या टोळ्या पाठलाग करत त्या संस्थेचे लचके तोडू लागतात. भांडवली तरस आणि राजकारणी लबाड लांडगे त्यांना भरघोस मदत करतात.राज्यात देशात कॉंग्रेस कम्युनिस्ट विचारांचे राज्य असतांना आणि इंटक,आयटक,सिटू या राष्ट्रीय ट्रेड युनियनचे नेतृत्व असतांना गिरणी कामगार,कारखाने कामगार कसा उध्वस्त झाला?


मुंबईसह मोठ्या शहरातील गिरण्याच्या कारखान्याच्या जमिनी बिल्डर भांडवलदाराच्या ताब्यात म्हणजेच सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण झाले आहे. सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण कसे होते याची जर यादी काढली तर डोळे पांढरे होतील. राज्यातील किंवा देशातील सर्वच सहकारी साखर कारखाने ज्यांना नंतर राजकीय मंडळींनी खरेदी करून खाजगी संस्थात रुपांतरीत केले. मुंबईतील सर्वच गिरण्यांची जागा यांचे आजचे मालक किंवा छुपे पार्टनर कोण आहेत ते कोणी पाहणार नाही आणि मांडणार नाहीत. हे सामान्य लोकांना समजू नये म्हणून खोट्या आरोपांच्या फैरी झाडणे चालू आहे. हे समजू नाही म्हणून हक्काचे शस्त्र ब्राह्मण द्वेष आहेच. महाराष्ट्राच्या १२ कोटी मराठी नागरिकांनी एकदा तरी विचार करा की सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण कसे होत आहेत.


गिरण्या बंद पडल्या उध्वस्त कोण झाले. किती ब्राह्मण भिकेला लागले? आणि इतर जातीचे कामगार किती उध्वस्त झाले. इतरच म्हणजेच बहुजन समाजातील कामगार जास्त असणार. कारण ब्राह्मण समाज ३.५ टक्क्यांच्या वर नाहीच.त्यांच्या समाजाचे कामगार किती आणि ट्रेड युनियन नेते किती याचा जरा विचार कराल काय? साखर कारखाने खड्ड्यात गेले भिकेला कोण लागते शेतकरी,शेतमजूर? रस्त्यावर कोणते कामगार कर्मचारी येतात? आणि त्यात ब्राह्मण किती असतात? देशात बारा राष्ट्रीय ट्रेड युनियन आहेत. त्यांची नांवे वेगळी वेगळी असली तरी विचारधारा एकच आहे विषमतावादी,मनुवादी म्हणूनच देशातील सर्वच सार्वजनिक कंपन्याचे भांडवल भांडवलदारांना विकले जात असतांना राष्ट्रीय ट्रेड युनियन आक्रोश करतांना दिसत नाही. बहुसंख्ये बहुजन समाज हा कामगार कर्मचारी अधिकारी असतांना तो ही फारशा संघटीत नाही. म्हणूनच त्यांची असंघटीत समाज असे नोंद होत आहे. त्यामुळेच सार्वजनिक सेवेचे ब्राम्हणीकरण म्हणजेच भांडवलीकरण झाले आहे. भविष्यात देशात काय होऊ शकते हे सांगण्याची गरजच राहत नाही.

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींची दशा आणि दिशा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीवर ७३ लाखांचा खर्च
ओबीसी आरक्षण: इम्पिरिकल डेटाबाबत २४ जानेवारीला मुख्यमं
हिंदू धर्म अस्तित्वात नसतानाही तथाकथित हिंदू धर्माच्या
देशातील उपासमारीची जुनी आकडेवारी सादर
तब्बल ५ कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार
वेगवान आर्थिक विकासासाठी धोरण बदलण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाला ओबीसींचा डेटा सोपवा
कोरोना लसीच्या सक्तीविरोधात आंदोलनाची घोषणा होताच केंद
जनमत विरोधात असल्याने भाजपाला आठवले राम मंदिर आणि साड्य
संघर्षाचा त्रिकोण, सरकार,पोलीस आणि नागरिक
उत्तर प्रदेशात लोकांचा उद्रेक
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २७ टक्के ओबीसी आ
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण
भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला
एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुल
आरोग्य कर्मचार्‍याची नावाड्यावर लसीकरणाची सक्ती
समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा
आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून झाकण्या
गोव्यातील २३ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper