×

शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?

Published On :    5 Dec 2021
साझा करें:

ओबीसी आंदोलनात अलीकडे अनेकजण प्रविष्ट झालेले दिसत आहेत, हे खरे आहे. ओबीसी नसलेले उच्च जातवालेही यात दिसतात. मात्र ओबीसीचे खरे हितैषी कोण? आणि विरोधक कोण? याची चाचपणी ओबीसीला यथार्थपणे करावी लागेल.



ओबीसी आंदोलनात अलीकडे अनेकजण प्रविष्ट झालेले दिसत आहेत, हे खरे आहे. ओबीसी नसलेले उच्च जातवालेही यात दिसतात. मात्र ओबीसीचे खरे हितैषी कोण? आणि विरोधक कोण? याची चाचपणी ओबीसीला यथार्थपणे करावी लागेल. ओबीसी विरोधकांची ओळख पटवून घेत असताना किंवा ओळख पटवून देत असताना, साधारणतः ओबीसींच्या आरक्षणाचा विरोध करणारे किंवा मंडल आंदोलना विरोधात उभे ठाकलेले तथाकथित उच्चजातीय हितसंबंधी नजरेसमोर येतात. ते दुसर्‍या कोणत्या धर्माचे आहेत? ओबीसींच्या आरक्षणाचा मुस्लिम बांधवांनी कधीच विरोध केला नाही. ख्रिश्चन, शिख बांधवांनी कधी मंडलविरोधी आंदोलनात जाळपोळ केली नाही. बौद्ध -आदिवासी तर, ओबीसी आरक्षणाचे नेहमीच पाठीराखे राहिलेले आहेत. मुस्लिम,ख्रिश्चन,शीख,बौद्ध यापैकी कुणीही ओबीसी आरक्षण विरोधात वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले किंवा करत नाही. ओबीसी विरोधात मोर्चे काढले नाही. मंडल आंदोलनात हिंसाचार करून ओबीसीची कत्तल केली नाही. तर मग ओबीसीशिवाय उर्वरित उच्चजातवर्गातील ब्राम्हणच ओबीसींच्या आरक्षणाला विरोध का करतात? ओबीसी बांधवांचे आरक्षण ब्राम्हणांना का खुपत असते?याचा गांभियाने विचार ओबीसी कार्यकर्ते, नेते, पत्रकार, साहित्यिक विचारवंत का करत नाहीत?


वस्तुतः हिंदू-हिंदू करून ओबीसींच्या बळावर हा उच्चजातीय कंपू मजा मारत आलेला आहे. मंदिर उभारणी करताना हेच ओबीसी राबतात. यांचेच रक्त आटते. देवालयासाठी लागणारा निधी गोळा करणे, दगड-विटा- माती आदि बांधकाम साहित्य जुळवणी करणे, रचणे आणि श्रमातून मंदिर यांच्या उभे राहते. भक्तीभावाने त्या ठिकाणी जाऊन दान देतात, त्या दानावर मंदिराचे संचालन- व्यवस्थापन चालते आणि ‘आयत्या बिळात नागोबा’ या उक्तीप्रमाणे पुजारी तिथे आपले बस्तान मांडून बसतो. तो मात्र ओबीसी नसतो.


 मंदिर बांधण्यासाठी राबणारी माणसं भिन्न आणि दान-संपत्तीचा उपयोग घेणारी वेगळे! ओबीसींना राशीभविष्य सांगणारेही तेच. कुंडली लग्नपत्रिका तिथी मुहूर्त सांगून,धर्मविधी-संस्कार-विधी करून घेणारे तेच. पुरोहिताशिवाय खरच धार्मिक कार्य होऊ शकत नाही का? मंदिरात बायाबापड्या मोठ्या श्रद्धेने पूजा सामग्री घेऊन जातात तेव्हा स्वतः ती मूर्तीला अर्पण करण्याऐवजी त्या ठिकाणी असलेला पुजारी ती तबकडी दैवतासमोर ठेवतात, म्हणजे अशा भाविकांना यथायोग्य पूजा करण्याची साधी विधी समजत नाही? की पुजार्‍याशिवाय पूजा पावन होत नाही. याचा विचार ओबीसी करायला लागला तर पूजाविधी करणारा श्रद्धाळूपेक्षा दीडशहाणा कसा असेल बरे! अशी उद्विग्नता व्यक्त झाली तर नवल काय? आपल्याच धर्मातील दैवतांची आराधना आपण स्वहस्ते करू शकत नाही, म्हणजे दैवत पुरोहिताच्या ताब्यात आणि आपण पुरोहिताच्या जाळ्यात! ही आपलीच दैवते आहेत की, परधर्मीय! असे कधी वाटू लागले की, ओबीसी आणि विरोधक यांचा धर्म एक कसा? असे प्रश्नचिन्ह उभे राहते?


 हे पूजा करणारे मंदिरातील पुजारी ओबीसी हिताबद्दल, शेतकर्‍यांच्या हक्कांविषयी कधी बोलतांना कुणालाही दिसणार नाहीत. उलट, त्यांच्या जवळ जाणारा भाविक अधिक अंधश्रद्ध कसा बनेल, त्यांच्या मस्तकात धर्मांधता- परधर्मद्वेश कसा रुजवता येईल याची पद्धतशीर आखणी करण्यात ते वाक्बगार. म्हणजे ओबीसी समाज जेवढा धर्मांध राहील तेवढे त्याच्यासाठी बरे! त्यांची कारस्थाने मतलबीपणा ओबीसींना समजू शकणार नाही हा त्यामागील शुद्ध हेतू! ओबीसीला धर्मशास्त्रानुसार शुद्र मानण्यात आल्याने तथाकथित हिंदू अर्थात ब्राम्हणी धर्मात चारही वर्णाचा विचार करता चौथा वर्ण वरील तिन्ही वर्णांपेक्षा नीच समजला गेला. त्यामुळे आजही ओबीसीच्या हीताला या धर्मबरहुकूम येणकेणप्रकारेन विरोध होतो, तो उच्चवर्णीयांनुसार धर्म-कर्म समजूनच, प्रत्येकांनी आपल्या ‘पायरीने वागावे’ ही स्मृती श्रुती ग्रंथांची शिकवण ओबीसींसाठी आजही कर्दनकाळ ठरत आहे. एवढी हिणकस गोष्ट ज्या जातीव्यवस्थेने निर्माण केली, ती जातीउतरंड शाबूत ठेवण्याचा आटापिटा करणार्‍यांची भूमिका ओबीसीला समजली पाहिजे, तरच ओबीसीचा खरा धर्म समजू शकेल!.


ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणात कृषीआधारीत कामावर उपजीविका करणारा वर्ग. श्रम-कष्ट करून इमानेइतबारे एका दाण्याचे शेकडो दाणे निसर्गसाथीने तो उत्पन्न करणारा किमयागार. त्याच्या अंगी हातचलाखी,लांडीलबाडी जराही नाही. तो ज्या अन्नधान्याचे उत्पादन करतो त्यामुळे अखिल समाजाचे पोषण होते. मात्र त्यांच्या सुरक्षेची हमी राहिलेली नाही. त्यास्तव शेतकर्‍यांचे अतोनात शोषण करणारी व्यवस्था बळकट केलेली आहे. वर्षभर शेतीत राबून अखेर भूमिपुत्रांच्या हातात काय पडते, हे त्यालाच विचारलेले बरे! बाजारपेठांमध्ये होणारे शोषण सामाजिक कलंक आहे.बडे व्यापारी एकिकडे मोठ्या दानधर्माचे देखावे करून, तो पापमुक्तीचा मार्ग समजतात, आणि दुसरीकडे आपल्याच कष्टकरी बांधवांचे अमानुष शोषण करतात. ओबीसी-कष्टकरी-शेतकरी यांचे प्रचंड शोषण करणारे हे त्यांचे धर्मबांधव आहेत का? मग,शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा?


शेतीचा तुकडा नाही, हक्काचे घर नाही, उपजीविकेचे साधन नाही, पाल टाकून भटकत फिरणारे, अर्थात विमुक्त-भटके यांचे निराश्रित तांडेच्या तांडे दिसतात. शिक्षणापासून हजारो वर्ष दूर ठेवलेले हे जनसमूह आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्याही अतिशय मागास असलेले. डोक्यावर छप्पर नाही पायाखाली जमीन नाही. पोट भरण्यासाठी काय करत असतील हे लोक? किती मोठा लोकसंख्येचा घटक अजूनही उपेक्षितच राहिलेला कोणत्या धर्माचा असेल तो जनसागर? त्यांची गणना हिंदू म्हणूनच होते ना? मग त्यांची ही परवड धर्म बांधवांना कशी काय बघवत असते? याचा अर्थ ते हिंदू नाहीत तर त्यांचा मूळचा बुद्ध धम्म आहे.


ओबीसी विमुक्त भटके हा जनसमूह धार्मिक-सांस्कृतिक शोषणाचा बळी ठरलेला आहे. त्यांच्या उत्थानासाठी शैक्षणिक आरक्षण, नोकरीतील आरक्षणाची तरतूद खूप महत्त्वपूर्ण असून त्याला विरोध करून या समाजाला सातत्याने आपल्या पंजाखाली दाबून ठेवण्यासाठी या देशातील व्यवस्था जद्दोजहद करत आलेली आहे. त्यासाठी अविश्रांतपणे धर्म आणि देव यांचा आधार घेऊन मानवी हक्काची पायमल्ली होऊन बंधुभावाचे मूल्य जाणीवपूर्वक पायदळी तुडवले जाते. या तमाम बाबींचा ओबीसी-भटके यांनी गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण आमचा धर्म जर एकच आहे,आणि तो जर शोषणावर आधारित आणि बंधुभावाचा त्याग करणारा असेल तर असा धर्म शोषकाच्या हिताचा आणि ओबीसीच्या अहिताचा असू शकेल. मग ओबीसी आणि विरोधकांचा धर्म एक कसा? याचा विचार प्रत्येक ओबीसीनी करावा हीच अपेक्षा.
 
अनुज हुलके
९८२३८८३५४१

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींची दशा आणि दिशा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीवर ७३ लाखांचा खर्च
ओबीसी आरक्षण: इम्पिरिकल डेटाबाबत २४ जानेवारीला मुख्यमं
हिंदू धर्म अस्तित्वात नसतानाही तथाकथित हिंदू धर्माच्या
देशातील उपासमारीची जुनी आकडेवारी सादर
तब्बल ५ कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार
वेगवान आर्थिक विकासासाठी धोरण बदलण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाला ओबीसींचा डेटा सोपवा
कोरोना लसीच्या सक्तीविरोधात आंदोलनाची घोषणा होताच केंद
जनमत विरोधात असल्याने भाजपाला आठवले राम मंदिर आणि साड्य
संघर्षाचा त्रिकोण, सरकार,पोलीस आणि नागरिक
उत्तर प्रदेशात लोकांचा उद्रेक
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २७ टक्के ओबीसी आ
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण
भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला
एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुल
आरोग्य कर्मचार्‍याची नावाड्यावर लसीकरणाची सक्ती
समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा
आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून झाकण्या
गोव्यातील २३ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper