×

पशूंवरील अत्याचाराचे ३३८ खटले

Published On :    5 Dec 2021
साझा करें:

महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर



मुंबई: कठोर कायदे असतानाही गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत. माणसांप्रमाणेच पशूही असुरक्षित बनला आहे. गेल्या १० वर्षांत पशूंवरील अत्याचाराच्या ५ लाखांहून अधिक घटनांची नोंद झाली. यात निर्घृण हत्या, विषप्रयोग आणि अनैसर्गिक कृत्यासारख्या घटना आहेत. त्यापैकी मोजक्याच प्रकरणात गुन्हे दाखल होऊन ते न्यायालयात गेले. यात महाराष्ट्र देशात तिसर्‍या क्रमांकावर आहे. देशभरातील ३३८ प्रकरणांपैकी ४२ प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत.


२०१६ मध्ये मुुंबईत १० कुत्र्यांची दगडाने ठेचून हत्या केली. पुण्यात बाणेरमध्ये ४ कुत्र्यांना जाळले, १६ कुत्र्यांना विष देऊन मारले. २०१९ मध्ये बुलडाण्यात ९० कुत्र्यांचे सांगाडे सापडले. बंगळूरजवळ ३० वानरांना विष पाजले. तामिळनाडूत इमारतीतील मांजर पकडण्यासाठी मुले नेमली. त्यांच्याकडून दोन पोत्यांत भरलेल्या मृत मांजरी सापडल्या. पशुप्रेमीच नव्हे तर कोणाचेही हृदय हादरवून टाकणार्‍या घटना देशात वाढतच आहेत.


पशू, पक्ष्यांवरील अत्याचाराच्या घटनांत प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० अंतर्गत कारवाईची तरतूद आहे. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या ३३८ खटल्यांची विविध न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पैकी ४४ खटले सर्वोच्च न्यायालयात, ५ राष्ट्रीय हरित लवादात तर उर्वरित राज्यांच्या वेगवेगळ्या न्यायालयात आहेत. 


सर्वाधिक ६६ खटले तामिळनाडू, दिल्ली ४३ तर महाराष्ट्रात ४२ खटले सुुरू आहेत. गुन्हे दाखल होऊन न्यायालयात पोहचलेले खटले नावालाच असल्याचा दावा प्राण्यांसाठी काम करणार्‍या फेडरेशन ऑफ इंडियन ऍनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (फिआपो) या स्वयंसेवी संस्थाने केला आहे. त्यांनी देशात पहिल्यांदाच २०१० ते २०२० दरम्यान प्राण्यांवरील अत्याचाराचा अभ्यास केला. त्यानुसार १० वर्षांत अशा ४ लाख ९३ हजार ९१० घटनांची नोंद आहे. तर नोंद नसणार्‍या घटना १० लाखांच्या घरात असल्याचे अभ्यास सांगतो.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींची दशा आणि दिशा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीवर ७३ लाखांचा खर्च
ओबीसी आरक्षण: इम्पिरिकल डेटाबाबत २४ जानेवारीला मुख्यमं
हिंदू धर्म अस्तित्वात नसतानाही तथाकथित हिंदू धर्माच्या
देशातील उपासमारीची जुनी आकडेवारी सादर
तब्बल ५ कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार
वेगवान आर्थिक विकासासाठी धोरण बदलण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाला ओबीसींचा डेटा सोपवा
कोरोना लसीच्या सक्तीविरोधात आंदोलनाची घोषणा होताच केंद
जनमत विरोधात असल्याने भाजपाला आठवले राम मंदिर आणि साड्य
संघर्षाचा त्रिकोण, सरकार,पोलीस आणि नागरिक
उत्तर प्रदेशात लोकांचा उद्रेक
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २७ टक्के ओबीसी आ
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण
भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला
एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुल
आरोग्य कर्मचार्‍याची नावाड्यावर लसीकरणाची सक्ती
समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा
आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून झाकण्या
गोव्यातील २३ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper