×

मुस्लीमांविरोधात भडकाऊ भाषण प्रकरणात पहिली अटक

Published On :    14 Jan 2022
साझा करें:

हरिद्वार धर्म संसद आली अंगलट



डेहराडून: उत्तराखंड येथील ‘धर्म संसद’मध्ये द्वेषयुक्त भाषणे केल्याच्या प्रकरणावर पोलिसांनी गुरुवारी वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी याला अटक केली आहे. तर यती नरसिंहानंद आणि अन्नपूर्णा या दोघांना हजर राहण्याची नोटीस बजावली. या तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले.


एनडीटीव्हीनुसार त्यागीला अटक करत असताना नरसिंहानंद पोलिसांना धमकावताना व्हिडीओमध्ये दिसत असून आणि त्यागीला अटक का करत आहे हे विचारताना दिसत आहे. तुम्ही सर्व मराल आणि तुमच्या मुलांनाही मारले जाईल असे नरसिंहानंद अरेरावीची भाषा बोलत आहे. यती नरसिंहानंद याने हरिद्वारमध्ये धर्मसंसदेचे आयोजन केले होते, तर अन्नपूर्णा या कार्यक्रमात वक्त्या म्हणून सहभागी झाल्या होत्या, तिथे मुस्लिमांविरुद्ध प्रक्षोभक भाषणे करण्यात आली होती. 


हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक योगेंद्र रावत यांनी सांगितले की, रिझवीला रुरकीच्या नरसन सीमेवरून अटक करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी तथाकथित हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर जितेंद्र नारायण त्यागी बनलेल्या ५२ वर्षीय लखनौचा रहिवासी वसीम रिझवीचे नाव १० हून अधिक प्रकरणांमध्ये आहे. रिझवी हे उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे प्रमुख राहिले आहेत. हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेत मुस्लिमांविरोधात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी ही पहिली अटक आहे.


 जितेंद्र नारायण त्यागी याला हरिद्वार जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. धर्म संसदेत कथित भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारवर सर्वांगीण दबाव होता. या प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयानेही घटनेला इतके दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले.१७-१९ डिसेंबर २०२१ या कालावधीत हरिद्वार, उत्तराखंड येथे ब्राम्हणवादी नेत्यांनी ‘धर्म संसद’चे आयोजन केले होते, ज्यामध्ये मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात उघडपणे द्वेषपूर्ण भाषणे देण्यात आली होती, अगदी त्यांच्या नरसंहाराचीही हाक देण्यात आली होती. 


नरसिंहानंद हा आधीच द्वेषयुक्त भाषणे देऊन पोलिसांच्या नजरेत आहे. यती नरसिंहानंद यांनी मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक वक्तव्य करताना ‘हिंदू प्रचारक’ होणार्‍या व्यक्तीला एक कोटी रुपये देऊ, असे म्हटले होते. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या वादानंतर २३ डिसेंबर २०२१ रोजी या संदर्भात पहिली एफआयआर नोंदवण्यात आली होती, ज्यामध्ये फक्त जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांचे नाव होते. 


२५ डिसेंबर २०२१ रोजी धरमदास आणि अन्नपूर्णा उर्फ पूजा शकुन पांडे यांची नावे एफआयआरमध्ये जोडण्यात आली होती. पूजा शकुन पांडे ही निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्‍वर आणि हिंदू महासभेच्या महासचिव आहेत. दुसर्‍या एफआयआरमध्ये कार्यक्रमाचे आयोजक यती नरसिंहानंद गिरी, जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी), सागर सिंधुराज महाराज, धरमदास, परमानंद, अन्नपूर्णा, आनंद स्वरूप, अश्‍विनी उपाध्याय, सुरेश चव्हाण आणि प्रबोधानंद गिरी यांची नावे आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींची दशा आणि दिशा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीवर ७३ लाखांचा खर्च
ओबीसी आरक्षण: इम्पिरिकल डेटाबाबत २४ जानेवारीला मुख्यमं
हिंदू धर्म अस्तित्वात नसतानाही तथाकथित हिंदू धर्माच्या
देशातील उपासमारीची जुनी आकडेवारी सादर
तब्बल ५ कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार
वेगवान आर्थिक विकासासाठी धोरण बदलण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाला ओबीसींचा डेटा सोपवा
कोरोना लसीच्या सक्तीविरोधात आंदोलनाची घोषणा होताच केंद
जनमत विरोधात असल्याने भाजपाला आठवले राम मंदिर आणि साड्य
संघर्षाचा त्रिकोण, सरकार,पोलीस आणि नागरिक
उत्तर प्रदेशात लोकांचा उद्रेक
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २७ टक्के ओबीसी आ
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण
भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला
एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुल
आरोग्य कर्मचार्‍याची नावाड्यावर लसीकरणाची सक्ती
समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा
आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून झाकण्या
गोव्यातील २३ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper