×

संदर्भहीन असलेल्या नरहर कुरुंदकरांच्या सर्व साहित्यावर सरकारने बंदी घालावी

Published On :    15 Jan 2022
साझा करें:

पुण्यातील समाजवादी ब्राम्हणांची छावणी आम्ही उध्वस्त केली-वामन मेश्राम यांनी डागली तोफ, डॉ.विलास खरात लिखीत शिव, फुले, शाहू, आंबेडकर विरोधी नरहर कुरुंदकर या संदर्भग्रंथाने ऍकॅडमीक क्षेत्रातील लोकांना चपराकपुणे: महाराष्ट्रात नरहर कुरूंदकरांनी एक छाप सोडली, त्यामुळे त्याला कोणीही माणूस संदर्भ विचारात नव्हते. ते ठोकून देत होते. त्यामुळे कुरूंदकर कुठली बाब मांडतात त्याचा ते संदर्भ देत नाहीत हे सांगण्याची संधी डॉ. विलास खरात यांना मिळाली. कुरूंदरांची अनेक पुस्तके आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे संदर्भ मिळत नाहीत. त्यामुळे संदर्भहीन असलेल्या नरहर कुरुंदकरांच्या सर्व साहित्यावर सरकारने बंदी घालावी अशी मागणी करतानाच आपण संदर्भ देऊन एखाद्या मुद्याचे खंडन केले तर विद्वान लोकांनाही ते स्विकारावे लागते, म्हणून खरात यांच्या विषयाला विद्वान लोकांनी मानले. एका बाजूला कुरूदकरांचे लिखाण आहे आणि त्याला प्रतिवाद करणारे दुसर्‍या बाजूला कागदोपत्री पुरावे आहेत. ते कागदोपत्री पुरावे खरात यांनी प्रस्तुत केले. तर पुण्यातील समाजवादी ब्राम्हणांच्या छावणीला उध्वस्त करण्याचे काम आम्ही केले आहे अशा शब्दात बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी तोफ डागली. बामसेफ भवन पुणे येथील डी.के.खापर्डे सभागृहात डॉ. विलास खरात लिखीत शिव, फुले, शाहू, आंबेडकर विरोधी नरहर कुरुंदकरच्या भूमिकेची चिकित्सा या संदर्भग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.


ते म्हणाले, शिव, फुले, शाहू, आंबेडकर विरोधी नरहर कुरुंदकर हा थिसीस आहे. त्या विषयावर विलास खरात यांना पीएचडी देण्यात आली आहे. पीएचडी बहाल करण्यापूर्वी विद्वान लोकांची मते विचारात घेतली जातात, त्यानंतरच पीएचडी दिली जाते. त्यामुळे हे पुस्तक नसून मान्यताप्राप्त थिसीस आहे. ज्याला विद्वान लोकांनी ऍकॅडमिक मान्यता दिली आहे.  माझे शिक्षण औरंगाबादमध्ये झाले, त्यानंतर तेथेच मी नोकरीला लागलो. त्यावेळी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या आमच्या विभागाचे विभाजन झाले. एक औरंगाबाद आणि दुसरा नांदेड विभाग झाला. जे कनिष्ठ लोक होते त्यांची नव्या विभागात बदली झाली. आमचीदेखील नांदेडला बदली झाली. नांदेडला गेल्यानंतर नरहर कुरूंदकर कोण आहे याची माहिती मिळाली. महाराष्ट्रातील विश्‍वविद्यालय, विद्यापीठाचे जे लोक आहेत ते नरहर कुरूंदकरांना बोलावून कार्यक्रम लावायचे. आपल्या विरोधातील जे लोक आहेत त्यांचे साहित्य योजना बनवून ते वाचायचे अशी कुरूंदकर यांच्याकडे योग्यता होती. कुठल्या गोष्टी चुकीच्या मांडता येतील यावर त्यांचा विचार सुरू व्हायचा, त्यातून मग विकृत लिखाण करून लोकांच्या मेंदूवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांची लिखाणाची एक शैली होती, ती महत्वपूर्ण आहे. त्या शैलीचा मी बारकाईने अभ्यास केला. त्यांची लिखाणाची शैली अशी होती, की ज्यांना त्यांचा विरोध होता, त्यांच्यावर अनेक पाने प्रशंसा म्हणून लिहायचे. पहिली पाने वाचल्यानंतर आंबेडकरवाद्यांचा दिमाख पकडून ठेवायचे आणि त्यानंतर मात्र विरोधात लिहायचे. पहिली प्रशंसा केल्यानंतर वाचकाचा दिमाख बनायचा, की हे बाबासाहेबांच्याविरोधात नाही. हे तर बाबासाहेबांचे समर्थक आहेत. हे तर आमच्या आंदोलनाचे समर्थक आहेत असे वाचकाचे मत तयार होते. त्यानंतर विरोधात लिहूनदेखील हेसुद्धा खरे असेल असे वाचकाचे मत तयार व्हायचे. म्हणजे नरहर कुरूंदकर बुद्धीभेद करण्याचे काम करायचे, हे कमी लोकांना समजून येते.


दरम्यान, दलित साहित्य लिहणारे सर्वात जास्त नालायक लोक होते. हे मी व्हिडीओसमोर बोलत होते. बाबुराव बागुल यांना मोठा साहित्यिक मानतात, त्यांचे साहित्य वाचले तर मोेठे ताकदवार लिहणारे आहेत असे वाटते. मात्र आंदोलन व डावपेच समजणे हे काही कथा, कविता लिहण्याचे काम नाही. आंदोलनाला समजणे, चालवणे व त्याची रणनीती बनवणे हे साधे काम नाही असा टोला त्यांनी त्या साहित्यिकांना लगावला. बाबासाहेबांनी आंदोलनाची रणनीती बनवली, तो त्यांनी त्यांच्या दिमाखात बनवली ती तर तुमच्या समोर आहे. परंतु त्यांनी जी रणनीती बनवली ती त्यांच्या दिमाखात होती, ती काही लिहलेली नाही. आमचे जे साहित्यिक लोक आहेत, ते लिहलेले वाचतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहले, त्यांनी का लिहले, काय त्यांना साहित्यिक बनायचे होते? त्यासाठी लिहले, नाही. तर त्यांना आपल्या आंदोलनाची पॉलीसी लोकांना समजायला हवी म्हणून त्यांनी लिहले. आंदोलनाचा त्याला संदर्भ आहे. आंदोलनाचा संदर्भ समजल्याशिवाय कसे काय समजू शकते? आंदोलन समजायला हवे. अनेक बारकावे आहेत ते आपल्या लोकांना समजून येत नाही. समजून येण्यासाठी मी आपल्याला दोन बाबी समजावून सांगतो. चवदार तलाव सत्याग्रहाच्यावेळी बाबासाहेब आंबेडकर काय बोलत होते, त्यामध्ये काय सिद्धांत आहे? अस्पृश्यता हा हिंदू धर्मावर लागलेला कलंक आहे आणि तो पुसून काढण्याची जबाबदारी हिंदू म्हणवणार्‍या प्रत्येक व्यक्तीची आहे. परंतु ब्राम्हणांनी त्यांच्या लोकांची पिटाई केली. पिटाई झाल्यानंतर त्यांच्या मनात परिवर्तन झाले. बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस जे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत, ते आपल्या लोकांची पिटाई करतानाही पाहत होते. त्यामध्ये आंदोनलाच्या रणनीतीत बदल केला नाही तर हे आंदोलन चालणार नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलनाच्या रणनीतीत परिवर्तन केले. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावर लागलेला कलंक नसून तो आमच्या नरदेहावर लागलेला कलंक आहे, तो पुसून काढण्याची जबाबदारी इतरांची नसून ती आमची आहे. याचा संदर्भ १९२७ मध्ये जे ब्राम्हणांनी आपल्या लोकांशी व्यवहार केला त्याच्याशी आहे. १९२७ आणि १९३० मध्ये त्यांनी रणनीतीत बदल केला. आम्ही बाहेर जाऊनच संघर्ष करू. दगडावर डोके आपटले तरी दगडाचे कुठलेच नुकसान होणार नाही, डोक्याचे मात्र होणार आहे. त्यामुळे दगडावर डोके आपटण्याचे काम आम्ही करणार नाही, भविष्यात हे सारे बंद करणार आहोत. बाहेर जाऊन दुसरा रस्ता तयार करू याची माहिती मेश्राम यांनी दिली.


काळाराम मंदिराचा सत्याग्रह सुरू होता, त्यावेळी ३ मार्च १९३० रोजी पत्र आले आणि गोलमेज परिषदेत बाबासाहेबांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित केले व लंडनकडे रवाना झाले. लंडनकडे रवाना होण्यापूर्वी समता सैनिक दलाने मला सलामी दिली. त्यावेळी हिंदू महासभेचे बॅ.मुंजे माझ्यासोबत होते. ते माझ्याकडे येऊन म्हणाले, की आंबेडकर तुमच्या समता सैनिक दलाने मी प्रभावित झालो आहे. या फौजेचा उपयोग मुसलमानांविरोधात केला तर कसे होईल? यावर बोलताना बाबासाहेब म्हणाले, मुसलमानांनी आम्हांला अस्पृश्य बनवले नसून तुम्ही लोकांनी बनवले आहे. जर भविष्यात कधी या फौजेचा उपयोग करण्याचा माझ्यावर प्रसंग आला तर मी तुमच्या विरोधात करेन, त्यांच्याविरोधात करणार नाही. जहाजामधील अनुभव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पत्रात लिहला आहे. दादासाहेब गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहले आणि विचारले, की अनेक दिवस नाशिकचे आंदोलन बंद आहे, ते पुन्हा सुरू करण्यासाठी अनुमती द्यावी. आमच्या आंदोलनाचे लक्ष्य काळ्या रामाचे दर्शन घ्यावे असा नव्हता, तर आमचे मानवीय अधिकार सिद्ध करण्यासाठी आमच्या लोकांमध्ये जिद्द निर्माण व्हावी यासाठी तो सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. त्यासाठी आमच्या लोकांनी मार खाऊन सिद्ध केलेली आहे. त्यामुळे येथून पुढे हे आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. अनुयायी आणि नेतृत्वमध्ये काय फरक आहे, हे समजावत असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.


बाबासाहेब आंबेडकर काय विचार करायचे, हे कथा लिहणार्‍या लोकांना समजणार नाही. कविता लिहणार्‍या लोकांना ते कळणार नाही. ते लिहलेले आहे, ते त्यांनी वाचलेलेदेखील असेल. मात्र त्यांना ते समजणार नाही. कारण ते कविता, कथा लिहणारे लोक आहेत. आम्ही अस्पृश्य लोक आहोत, आम्ही वेगळे आहोत असे लंडनमध्ये बाबासाहेबांनी सांगितले. आता आम्हांला स्वतंत्र मतदारसंघ हवा. चवदार तलाव व नाशिकच्या आंदोलनातून ते जे शिकले त्यातून त्यांनी रणनीती बदलली. हिंदू समाजावर डोके आपटून उपयोगाचे नाही, कपाळमोक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब इंग्रजीत विचार करायचे. तशी त्यांना सवय होती.  परंतु पेपर मराठीत काढायचे ठरवले. त्यामुळे त्यांनी तुकाराम महाराजांचे साहित्य वाचले, तेथून त्यांनी मराठीचे शब्द उचलले. त्यावेळचा मूकनायक, बहिष्कृत भारत वाचले तर लक्षात येईल. खासकरून तुकाराम महाराजांची भाषा घेतलेली आहे. १९२७ व १९३० चे आंदोलन लक्षात घेऊन त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी गोलमेज परिषदेत केली होती. यावर कुरूंदकर कसे लिहतात ते बघा. जर संयुक्त मतदारसंघ गांधींनी बाबासाहेबांवर थोपवलेला आहे, हे जे दलितांमधील तरूण लोक बोलतात, त्यांचा सिद्धांत जर मान्य केला तर गांधींनी आंबेडकरांचा पराभव केला होता ही गोष्ट मान्य करावी लागते. दलित पँथरचे जे उग्र लोक आहेत, त्यांना पराभव मान्य नाही. जर त्यांना आंबेडकरांचा पराभव मान्य करायचा नसेल आणि गांधींचा पराभव मान्य करायचा असेल तर संयुक्त मतदारसंघाचा स्विकार करावा लागतो. तेव्हा मी याच मताचा आहे, की आंबेडकरांचा विजय झालेला आहे. संयुक्त मतदारसंघ थोपवण्यात आलेला आहे, त्यातून दलाल व भडवे निर्माण झाले, त्याचे समर्थन आमच्या लोकांनी करावे, अशाप्रकारे ते उलटा-सुलटा तर्कशास्त्र मांडतात अशा शब्दात मेश्राम यांनी कुरूंदकर यांची खिल्ली उडवली.


पुणे करारासंदर्भात डॉ.बाबासाहेबांचे ओरिजनल लिखाण ज्यांनी वाचले नसेल तर त्या लोकांची पंचायत झाल्यावाचून राहणार नाही. आता यशवंत मनोहरांचे नाव घ्या. उत्थान करणारा मोठा कवी म्हणून महाराष्ट्रात मानला जातो. जेवढे दलित साहित्यिक म्हणवून घेणारे होते ते सारेच्या सारे कुरूंदकरांची प्रस्तावना घ्यायला जायचे. त्यांची अहमिका लागायची. त्यांच्या कविता संग्रहाला कुरूंदकरांची प्रस्तावना लागायची. अर्धे भाषण बाबासाहेबांच्या प्रशंसेवर आणि अर्धे विरोधात करायचे असे कुरुंदरांचे वैशिष्टये होते. लोकांना या बाबी लक्षात यायच्या नाहीत. मानसशास्त्राचा ते वापर करायचे. मी ज्यावेळी नांदेडमध्ये रहायचो त्यावेळी या बाबी लक्षात यायच्या. अनेक तरूण त्यांची प्रशंसा करायचे, त्यामध्ये भगतदेखील होते. त्यांची प्रशंसा करणारे व त्यांना अनुकूल लिखाण करणार्‍यांमध्ये रावसाहेब कसबेदेखील आहेत. सचिन बनसोडे आणि रावसाहेब कसबे बोलायला लागले. तुमचे म्हणणे चुकीचे आहे असे एका वाक्यात बनसोडे यांनी कसबे यांना सांगितले. तुम्ही बामसेफचे का? हो...मला जर दुसरे काम अर्जंट आले आहे मला जायचे आहे. विचारवंत म्हणवून घेणारे जे कोणी लोक आहेत ते महाराष्ट्रात बामसेफच्या लोकांबरोबर चर्चा करायला तयार नाहीत. बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनात आणि नागपूरच्या दिक्षाभूमीवर जे पुस्तकांचे स्टॉल येतात तेथे बामसेफशी संबंधित पुस्तकांची करोडो रूपयांची विक्री होते. बामसेफच्या माध्यमातून आम्ही लोकांना चिकित्सा शिकवली, तमाम प्रकारची चिकित्सा करण्याचे लोकांना शिकवले. चिकित्सेची चिकित्सादेखील शिकवली. त्यासाठी कुठले तथ्य एकत्र करावी लागतात, कुठली पुस्तके घ्यावी लागतात, कुठले ओरिजिनल जमा करावे. संविधानाला हात लावाल तर छाटून काढू असे अनेक आंबेडकरवादी लोक बोलतात, त्यांना मी अनेकदा विचारले आहे, मात्र काय छाटून-बिटून काही नाही, केवळ फेकामफेक असते असा टोला तथाकथित आंबेडकरवाद्यांना मेश्राम यांनी लगावला.


यावेळी मेश्राम यांनी कवाडे आणि खापर्डेसाहेब यांच्या भेटीचा किस्सा सांगितला. हे दोघेही बर्डीचे. एकदा खापर्डेसाहेबांनी एक आठवण सांगितली. एकदा मी बर्डीच्या घरी जात होतो,  त्यावेळी कवाडे खाटेवर बसले होते. मी तेथून जात असताना दाढी वाढवलेली असल्याने मला त्यांना काही ओळखता आले नाही. पुढे गेल्यानंतर हे तर जोगेंद्र कवाडे आहे, म्हणून मी परत आलो. दाढीला कुरवाळत म्हणालो, अरे...जोगू...जोगू...लोक म्हणत होतेे तू तर नेता झाला परंतु तू तर साधू झाला. तुम्ही बामसेफवाले लोक ही अशीच टिंगळटवाळी करता असे कवाडे म्हणाले. खापर्डेसाहेब व कवाडे दोघेही समता सैनिक दलात जाणारे, समवयस्क मित्र..म्हणून काही बोलता येईना. बामसेफव आंदोलनाच्या विचारधारेचे आम्ही पाच-पाच दिवस प्रशिक्षण लावले. प्रशिक्षणात सार्‍या क्रोनोलॉजीकली बाबी सांगितल्या जातात. संघटनात्मक प्रशिक्षणातही लोकांचे मनोबल वाढवले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात कुठलाही माणूस बामसेफच्या लोकांशी वाद घालत नाही. बामसेफच्या लोकांशी चर्चा करू नका असे अनेक लोक बोलतात. ते फार पटविणारे लोक आहेत. त्यांचेच म्हणणे मानणे करावे लागते, जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत ते सोडतच नाहीत. मान्य केल्यानंतर आणखी काही आहे का? असे पण विचारतात. तेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा करायला जायला नको. दलित साहित्याची मोठी लाट आम्ही निकालात काढली. दलित साहित्यावरच पुण्यातील समाजवादी ब्राम्हण फिरत होते. जेवढे महाराष्ट्रात लोक आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांचे नामस्मरण करणारे आहेत. दलित पँथर व साहित्यिक लोकांनी नामस्मरणाची चुकीची सवय लावली असा हल्लाबोल मेश्राम यांनी केला.


बामसेफने सुक्ष्म चिकित्सेच्या परंपरेला सुरूवात केली. प्रत्येक बाबींची समीक्षा सुरू केली. विलास खरात मिलींद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आमचेदेखील औरंगाबादला कार्यक्रम व्हायचे. औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात मी ऍनिहिलेशन ऑफ कास्टवर काही बाबी सांगितल्या.  कार्यक्रम संपल्यानंतर काही प्राध्यापकांचा गु्रप मला भेटला. ऍनिहिलेशन ऑफ कास्टवर आपण जे सांगितले ते चुकीचे आहे असे ते प्राध्यापक म्हणाले. दुसर्‍यांदा वाचा, एक महिन्याचा वेळ देतो, वाचल्यानंतर मला सांगा, परंतु त्या प्राध्यापकांचा गु्रप मला दुसर्‍यांदा भेटला नाही.  मी माझ्या कमी वयात दोन पुस्तके वाचली, त्यामध्ये व्हॉट क्रॉंग्रेस ऍन्ड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स व ऍनिहिलेशन ऑफ कास्ट ही पुस्तके आहेत. त्या पुस्तकांमध्ये सुक्ष्म पद्धतीने बाबासाहेबांनी मांडणी केली आहे त्याचा प्रभाव माझ्यावर पडला.


भारताच्या प्राचीन विषयावर विदेशी लोकांनी भरपूर लिहले. मात्र ते इंग्रजीत आहे. विद्यापीठात शिकवणारे ब्राम्हण ते वाचतात, मात्र त्याची माहिती विद्यार्थ्यांना देत नाहीत. कारण सारे हेड ब्राम्हण असतात. तशाप्रकारचा कुठला विषयदेखील विद्यार्थ्यांना देत नाहीत. कुठल्याप्रकारे मार्गदर्शन केले जात नाही. मराठा माणूस मार्गदर्शक होता म्हणून हा थिसीस तयार झाला.  त्यामुळे हा एक संदर्भग्रंथ आहे. बामसेफचे लोक हवेत बाता करत नाहीत असा एक संदेश गेला. सार्‍या कागदोपत्री पुराव्यानिशी बाता करतो. पुणे करारासंदर्भात मान्यवर कांशीराम यांनी आंदोलन केले होते ते कागदोपत्री पुराव्यानिशी होते. पुणे करारावर बाबासाहेबांनी सही केली होती, परंतु पुणे कराराच्याविरोधात बामसेफवाले धिक्कार करत आहेत. याचा अर्थ बामसेफवाले बाबासाहेबांचादेखील धिक्कार करत आहेत असे पुण्यातील समाजवादी ब्राम्हणांनी प्रोपोगंडा केला होता. पुणे करार काय आहे? दलित पँथरच्या लोकांनी वाचलाय का? मुंबईतील एका कार्यक्रमात पुणे करारासंदर्भात जे भाष्य होते ते पुस्तकातील संदर्भ मी वाचून दाखवला. त्यावेळी ढालेच्या लोकांना कळून चुकले. बात तर दुसरीच आहे. ढाले, ढसाळ पुरावे देत नाहीत, ते जागरण करत नाहीत असे मेश्राम यांनी सांगितले.


विचारधारेला प्रासंगिक बनवायला हवी. बामसेफमध्ये नेतृत्वाचा गॅप दिसून येत नाही. मी गेल्यानंतरही या आंदोलनात नेतृत्वाचा गॅप राहणार नाही. योग्य लोक या आंदोलनात आहेत. ते सांभाळू शकतात. परंतु आम्ही मिशन पूर्ण करण्याच्यादृष्टीने पुढे जात आहोत. त्यासाठी त्या दिशेने पुढे जावे लागणार आहे. आम्ही बामसेफचे लोक काहीही सांगतो असे अकॅडमीक क्षेत्रातील लोक बोलतात, ते चुकीचे आहे, हे आम्ही शिव, फुले, शाहू, आंबेडकर विरोधी नरहर कुरुंदकरच्या भूमिकेची चिकित्सा या संदर्भग्रंथाने कागदोपत्री पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले आहे. तर ब्राम्हणांनी ज्या चुकीच्या बाबी सांगितल्या आहेत त्यावर संशोधन करून देशात त्याचा प्रसार करू असे मेश्राम यांनी सांगितले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींची दशा आणि दिशा
२०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीवर ७३ लाखांचा खर्च
ओबीसी आरक्षण: इम्पिरिकल डेटाबाबत २४ जानेवारीला मुख्यमं
हिंदू धर्म अस्तित्वात नसतानाही तथाकथित हिंदू धर्माच्या
देशातील उपासमारीची जुनी आकडेवारी सादर
तब्बल ५ कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगार
वेगवान आर्थिक विकासासाठी धोरण बदलण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाला ओबीसींचा डेटा सोपवा
कोरोना लसीच्या सक्तीविरोधात आंदोलनाची घोषणा होताच केंद
जनमत विरोधात असल्याने भाजपाला आठवले राम मंदिर आणि साड्य
संघर्षाचा त्रिकोण, सरकार,पोलीस आणि नागरिक
उत्तर प्रदेशात लोकांचा उद्रेक
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये २७ टक्के ओबीसी आ
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होण
भाजप नेत्याला कौटुंबिक हिंसाचार भोवला
एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुल
आरोग्य कर्मचार्‍याची नावाड्यावर लसीकरणाची सक्ती
समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा
आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून झाकण्या
गोव्यातील २३ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper