×

समतेचे आंदोलन करणारे संत भगवानबाबा

Published On :    19 Jan 2022
साझा करें:

संत भगवानबाबा यांच्या १९ जानेवारी २०२२ स्मृतिदिनानिमित्त अभिवादन. संत भगवानबाबा यांची २९ जुलै ही जयंतीची तारीख जातींच्यासह अनेकांना माहित नाही,जागृती नाही त्याचे कारण म्हणजे इथली मनुवादी व्यवस्था. कारण पंचांगकर्ते, कॅलेंडरवाले हे संत भगवानबाबा यांची जयंती २९ जुलै या तारखेमध्ये अनेकजण छापतच नाहीत, नाहीतर पहा कॅलेंडर ! भारत मुक्ती मोर्चाचे कॅलेंडर वगळता इतर कॅलेंडरमध्ये बहुतेक दिसणार नाही.संत भगवानबाबा यांच्या १९ जानेवारी २०२२ स्मृतिदिनानिमित्त अभिवादन. संत भगवानबाबा यांची २९ जुलै ही जयंतीची तारीख जातींच्यासह अनेकांना माहित नाही,जागृती नाही त्याचे कारण म्हणजे इथली मनुवादी व्यवस्था. कारण पंचांगकर्ते, कॅलेंडरवाले हे संत भगवानबाबा यांची जयंती २९ जुलै या तारखेमध्ये अनेकजण छापतच नाहीत, नाहीतर पहा कॅलेंडर ! भारत मुक्ती मोर्चाचे कॅलेंडर वगळता इतर कॅलेंडरमध्ये बहुतेक दिसणार नाही. आम्ही सगळे या मनुवादी माध्यमांचे गुलाम आहोत.यावर भर म्हणून आमचे धर्मगुरु, अनेक महंत सांगतात, की संतांची जयंती नसते पुण्यतिथी असते ! 


जिवंत मेंदू असणार्‍या सर्व बंधूना सरळ प्रश्न आहे की, जन्मल्यावर आनंद असतो का मृत्युनंतर ? काही तर हे समर्थन करतात की, महापुरुषांची जयंती असते तर काही म्हणतात की, संतांचा मृत्यू ही प्रेरणादायी आनंदाने स्वीकार करावा म्हणून तो उत्सव सोहळा असतो. मी एक सत्यशोधक अभ्यासक असे म्हणतो की, आमची वैचारिक गुलामीची बंधने तोडून एकदा आम्ही तटस्थपणे विचार करावा. हा लेख वाचताना अनेकांना संत भगवानबाबांचा आदर आहे, गुरुसमान आहेत, पण त्यांच्या जन्म -मृत्यु, कार्याविषयी अधिकची माहिती नाही,असे नाही! ती माहिती होण्यासाठीची साधने,साहित्य उपलब्ध झाले नाही, होऊ दिले नाही. कारण जे समजत नाही, चालत नाही त्या पंचांग किंवा तिथीवरुन ती ठरवली आहे. जी तिथी तारखेत दरवर्षी बदलते. संत गाडगेबाबा यांची जयंती २३ फेब्रुवारी १८७६, संत तुकडोजी महाराज यांची जयंती ३० एप्रिल १९०९ ही नियमित साजरी होते. ही कॅलेंडरवर नोंदही आहे,जे भगवान बाबांच्या समकालीन आहेत.


 संत भगवानबाबा यांचा जन्म २९ जुलै १८९६ रोजी सावरगाव ता.पाटोदा,जि.बीड येथे झाला. बाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप होय. आईचे नाव कौतिकाबाई होते. त्या लोणी येथील केशवराव बडे यांच्या कन्या होत्या. बाबांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण सावरगावातच झाले. पुढील वर्ग नसल्यामुळे आणि आकलनशक्ती चांगली असल्याने मामा रामभाऊ आणि गंगाराम बडे यांच्याकडे सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. लोणीतही पुढील वर्ग नसल्यामुळे वडिलांना आबाजीला  पुन्हा गावाकडे सावरगावला आणले. 

   
आषाढी एकादशी निमित्त गीते बाबाची दिंडी सावरगाव मार्ग पंढरीला जात होती. गावातील काही लोकही त्यात जात, आबाजी ही घरच्यांना चुकवून त्या दिंडीसोबतच पंढरपूरला गेले. त्यांनी दिंडीसोबत आणि पंढरपूरमध्ये गीते महाराजांचे कीर्तन ऐकले. प्रभावित होऊन त्यांनी स्वतः तुळशीची माळ गीते महाराजांकडून घालून घेतली आणि वारकरी बनले. पंढरपूरवरुन आल्यानंतर १५ दिवसांचा दिंडीचा पूर्ण वृत्तांत गावकरी आणि सवंगड्यांना सांगितला. तसेच कुटुंबियांना माळकरी होण्यासाठी हट्ट धरला, नाहीतर मी घरी येणार नाही. कुटुंबीय सुध्दा नारायणगड येथे माणिकबाबांच्या हस्ते तुळशीमाळ घालून माळकरी बनले.


माणिकबाबांनी आबाजीस काही दिवस नारायणगडावर थांबण्यास सांगितले, माणिकबाबांनी आबाजीस भगवान हे नाव दिले. काही काळ या ठिकाणी राहिल्यानंतर नेकनूरचे बंकटस्वामी हे नारायणगडावर आले. त्यांनी भगवानबाबांना पाहिले, त्याच्यासोबत चर्चा केली आणि माणिकबाबांना आग्रह करून भगवानबाबांना वारकरी शिक्षण देण्यासाठी तीन वर्षे आळंदी येथे ठेवले. तेथील शिक्षण प्रशिक्षणानंतर भगवानबाबा नारायणगडावर परत आले. त्या ठिकाणी माणिकबाबांच्या मार्गदशर्नाखाली त्यांचे कार्य सुरु झाले. १९१८ मा माणिक बाबांचे मुख्य शिष्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर भगवानबाबांना १९२० साली नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी सुरु केली. याचबराबरोबर सावरगाव येथे बाबांचे पहिले कीर्तन झाले.
शोध जाता पोथी पुराणात|
तो एक पाखंडी समजावा॥
सत्य तुझ्यापाशी होय अंतर्यामी| जाणीचे दुख इतराचें ॥

अर्थ : सत्य शोधण्यासाठी पोथी पुराणाची गरज नाही. सत्य हे स्वतःच्या अंतकरणात आहे. जे दुसर्‍याचे दुःख जाणते, ते सत्य होय. या अभंगातून निश्चितपणे आम्हाला संत भगवानबाबांवर संत तुकारामांचा प्रभाव लक्षात येतो.
जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुले|
तोचि साधु ओळखावा,
देव तेथेचि जाणावा|

संत भगवानबाबांचे कार्य पाहून, माणिकबाबांच्या निधनानंतर त्यांच्यावर नारायणगडाचे प्रमुख म्हणून जबाबदारी आली. त्यांनी थोड्याच दिवसात नारायणगड व परिसरात प्रभावी प्रबोधन आणि वर्तनाने परिवर्तन सुरु केले. त्यांच्या उपदेशाने अनेकांनी दारु, मांसाहार, व्यसन सोडून दिले. चारित्र्य संपन्नतेस बाबानी महत्त्व दिले. तसेच अनेक अंधश्रध्दा, प्रथा, नवस, परंपरा यावर आघात करून बाबांनी त्या बंद केल्या. नवसे कन्यापुत्र होती, तरी का करने लागे पती
शेंदरी- हेंदरी दैवत पूजन बंद केले. याबाबत बोगलवाडी, ता. धारूर येथील महालक्ष्मी यात्रेत मरीआईला रेड्याचा बळी देण्याची प्रथा बंद करण्यासाठी प्रबोधन  करुन ते बंद केले. मिडसावंगी, ता. पाथर्डी येथे सिध्दनाथाची यात्रा भरते. या ठिकाणी कोंबड्या, बकर्‍यांचा बळी देत असत. यासाठी भगवानबाबांनी पशुहत्या बंदीचा जिल्हाधिकान्यांकडून मनाई आदेश आणला. लोकाचे प्रबोधन केले.शंका निरसन केले, लोकांनी ते मान्य केले. पण तेथील खाटीक बाबाकडे आले आणि म्हणाले,
 अब हमने क्या काम करना ?


भगवानबाबांनी त्याच शिवारात असणारी २० एकर पड़ीक जमीन त्याना दान म्हणून दिली त्यानी जमीन मशागत करुन उपजीविका भागवली. आजही काही लोक जरी बाबांना एका जातीत आणि प्रांतात बंदिस्त करीत असले तरी बाबांनी मध्यप्रदेशातील इंदौर येथे जावून प्रबोधन, कीर्तन केले आहे. भगवान बाबांचे प्रबोधन कार्य प्रचंड प्रमाणात वाढले होते. अनेक गावात ते प्रबोधनातून परिवर्तन घडवत होते. त्याचबरोबर शाळा, शिक्षणाबाबत उद्बोधन केले. अनेक मुलांना शिक्षणासाठी मदत केली. औरंगाबादला विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले. खोकरमोहा ता. शिरुर कासार येथेही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधले. यातून अनेकांनी शिक्षण घेतले. बाबा कीर्तनातून सांगत.
माझ्यापेक्षा थोर शोधावा मास्तर
नसे जेथे चौथीपर्यंत शाळा
घाला दुसर्‍या शाळेत सत्वर
संत भगवानबाबांचे हे कार्य काही धर्मपंडित धार्मिक ठेकेदारांना सहन झाले नाही. त्यांनी बाबांविरुद्ध षड्यंत्र सुरु ठेवले, त्यांना त्रास देणे, अपमानित करणे, नारायणगड सोडून जाण्यासाठी धमकी देणे हे प्रकार केले. पुढे तर १९३३ साली त्यांचे चरित्र बदनाम करण्यासाठी एका स्त्रीचा वापर करण्यात आला. परंतु संत भगवानबाबांनी तुकोबाचे अभंग प्रत्यक्ष अंगीकारत,वागत होते.
परोपकारे नेणे परनिंदा|
परखिया सदा बहिणी माया ॥
मात्र दुष्ट लोकांनी संत भगवानबाबांना कोर्ट कचेर्‍या करायला लावल्या. यात प्रचंड त्रास सहन करावा लागला.जसे संत तुकाराम म्हणतात,
छळताति मज,करता कीर्तन
सिन वाटे बहु, त्या काळीचा ॥
करवि, आणिकांचे घात |
खोडी काढून पंडित ॥
भगवानबाबांनी नारायणगड संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची न्यायालयीन मदतीसाठी हैदराबाद येथे भेट घेतली होती. कारण बॅरिस्टर म्हणून डॉ.आंबेडकर यांचे मार्गदशून खूप मोलाचे होते.उभयतात चर्चा झाली.


नारायणगडाच्या संदर्भात भगवान बाबांना प्रचंड त्रास होऊ लागला.त्यामुळे त्यांनी गड सोडण्याचा निर्णय घेतला. भगवानबाबांनी नवा पर्याय शोधण्यासाठी सुरुवात केली आणि १९५१ साली खरवंडी जवळील धौम्य डोंगर, जो बानूमाय कासार, त्यांचा मुलगा बाजीराव पाटील यांचा होता, तो त्यांनी भगवानबाबांना दिला. भगवानबाबांनी मिडसांगवी,पारगाव, खरवंडीसह शेजारील गावकर्‍यांच्या मदतीने श्रमदानातून भगवानगडाचे काम सुरू केले. १ मे १९५८ साली यशवंतराव चव्हाणांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना केली. पंढरपूरच्या पांडुरंगाचे ते अनुयायी बनले. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.भगवानबाबांनी विठ्ठल रुक्मिणी यांचे अनुयायी बनले. भगवानबाबांचे भक्त,लोक कोणाकोणाच्या मूर्ती बसवून भक्त बनत आहे, याचा विचार करावा वाटतो.
आमुचा एक विठ्ठल प्रचंड|
इतर देवांचे न पाहू तोंड|
संत तुकाराम
नामा म्हणे ऐसें अवघे संप्रदाय| मिळोनी धरा पाय विठोबाचे|
संत नामदेव


याच ठिकाणी भगवानबाबांनी नंतर विद्यालय सुरु केले, बाबांनी ज्योतीराव  फुलेंचा कृतीविचार  संपूर्णपणे अंगीकारला होताच, जो मती, निती, गती, वित्त येण्यासाठी म्हणजेच शिक्षण गरजेचे आहे ते देण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्य केले. असेच समाजप्रबोधनाचे कार्य करण्यासाठी कान्हेरला गेले असताना भगवानबाबांच्या छातीत त्रास जाणवू लागला. हृदयविकाराचा झटका आला. अमदनगरला दवाखान्यात नेले. पुढे रुबी हॉल पुणे येथे दाखल केले. मात्र, १९ जानेवारी १९६५ रोजी रात्री १ वाजता भगवानबाबांची प्राणज्योत मालवली. भगवानबाबांच्या आयुष्यात जे लोक चमत्कार घुसवितात ते एक थोतांड आहे. कारण ५५ वर्षांपूर्वी निधन झालेल्या बाबांचा स्मृतिदिन जर आम्हाला तिथी पाहून करावा लागतो, यापेक्षा मोठी गुलामी कोणती असू शकते? संत भगवानबाबांचे कृतीविचार महाराष्ट्राबाहेर देशात परदेशात घेऊन जाण्यासाठी कृतिशील प्रयत्न करावे लागतील. त्यासाठीची संसाधने वापरवी लागतील. आपले, बळ, बुध्दी, श्रम आणि पैसा हा राष्ट्रव्यापी संघटीत आंदोलनास द्यावा लागेल. तरच व्यवस्था परिवर्तन घडवून येईल.

रामेश्‍वर तिरमुखे
०९४२०७०५६५३

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
२५ मे भारत बंदला रोखण्यासाठी ब्राम्हणवाद्यांकडून हनुमा
कोरोना काळात जगात दर ३० तासांनी एका अब्जाधीशाचा उदय, तर द
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत २७ मे रोजी सर्वपक्षीय ब
अनधिकृत शाळांचे फुटले पेव
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, मुस्लिमांना केले जातेय टा
यूएपीएची तरतूद देशद्रोहापेक्षा धोकादायक
मध्य प्रदेशात २९ आणि राजस्थानमध्ये दररोज १४ मुले हरवतात
टुकार अभिनेत्री केतकी चितळेच्या जामीन अर्जावर २६ तारखे
ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे नसून बुद्धीस्ट स्थळ
ज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ
ज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका
कर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा
कोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी
ज्ञानवापी प्रकरणात हिंदू एनजीओ पदाधिकाऱ्याला सर्वोच्च
तथागत गौतम बुध्दांची विचारसरणी आजही जगाला मार्गदर्शकच
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना
शहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे
बाबरी मस्जिद गमावली पण आता ज्ञानवापी मस्जिद गमावणार ना
महाराष्ट्र सरकारकडून राजभवनला देण्यात येणाऱ्या निधीत व
अत्त दीप भव: तथागत बुद्धांचा विचारच महत्वाचा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper