×

एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचार्‍याच्या मुलाने आईच्या साडीने घेतला गळफास

Published On :    20 Jan 2022
साझा करें:

महाविकास आघाडी सरकार आणखी किती जणांचे बळी घेणार



सोलापूर  :  एसटी कर्मचार्‍यांच्या संपात सहभागी व्हायचं आहे असं सांगून वडिलांनी घर सोडले आणि इकडे मुलाने आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा संपविली. अमर तुकाराम माळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अवघ्या २० वर्षांचा होता. हा प्रकार सोलापूरमधल्या कोंडी येथे घडला. गेल्या महिनाभरात अनेक एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणखी किती जणांचे बळी घेणार असा सवाल केला जात आहे.


अमर माळीचं दयानंद महाविद्यालयात १२ वीपर्यंत शिक्षण झालं आहे.तो गेल्या काही दिवसात शांत शांत बसत होता. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली. पण वडिल तुकाराम माळी यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली. संपामुळे दोन तीन महिने पगार नाही, काम बंद आहे तुला पैसे कुठून देऊ असं वडिलांनी हताश होऊन सांगितलं.


अमरशी बोलणं झाल्यावर वडिल तुकाराम माळी आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी निघून गेले. अमरही काही कामासाठी घराबाहेर गेला. दुपारी अमर आल्यानंतर आईने त्याला जेवणाचा आग्रह केला. पण आराम करायचा असल्याचं सांगत अमर न जेवताच स्वत:च्या खोलीत गेला. बराच वेळ झाला तरी अमर बाहेर न आल्याने आईने आवाज दिला. पण खोलीतून कोणताही प्रतिसाद आला आहे.


अमर खोलीतून कोणताच प्रतिसाद देत नसल्याचं आईने मोठ्या मुलाला ही गोष्ट सांगितली. मोठ्या भावानेही अमरला आवाज दिला. पण आतून कडी लावण्यात आली होती. शेवटी मोठ्या भावाने खिडकीतून आत पाहिलं असता अमरने आईच्या साडीने गळफास घेतला होता. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अमरला खाली उतरवलं. त्याला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच अमरचा मृत्यू झाला होता.

वडिलांनी फोडला हंबरडा
एसटी आंदोलनात गेलेल्या वडिलांना अमरच्या भावाने ही गोष्ट सांगताच ते घरी आले. माझा पगार झाला नसल्याने तुला पैसे देता आले नाहीत असं सांगत त्यांनी हंबरडा फोडला. अमरचं १२ सायन्स पर्यंतचे शिक्षण झाले होते.तो अभ्यासात हुशार होता त्याने असे कसे काय केले हे कळत नाही अशी चर्चा त्याच्या मित्रांमध्ये आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
२५ मे भारत बंदला रोखण्यासाठी ब्राम्हणवाद्यांकडून हनुमा
कोरोना काळात जगात दर ३० तासांनी एका अब्जाधीशाचा उदय, तर द
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत २७ मे रोजी सर्वपक्षीय ब
अनधिकृत शाळांचे फुटले पेव
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, मुस्लिमांना केले जातेय टा
यूएपीएची तरतूद देशद्रोहापेक्षा धोकादायक
मध्य प्रदेशात २९ आणि राजस्थानमध्ये दररोज १४ मुले हरवतात
टुकार अभिनेत्री केतकी चितळेच्या जामीन अर्जावर २६ तारखे
ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे नसून बुद्धीस्ट स्थळ
ज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ
ज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका
कर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा
कोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी
ज्ञानवापी प्रकरणात हिंदू एनजीओ पदाधिकाऱ्याला सर्वोच्च
तथागत गौतम बुध्दांची विचारसरणी आजही जगाला मार्गदर्शकच
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना
शहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे
बाबरी मस्जिद गमावली पण आता ज्ञानवापी मस्जिद गमावणार ना
महाराष्ट्र सरकारकडून राजभवनला देण्यात येणाऱ्या निधीत व
अत्त दीप भव: तथागत बुद्धांचा विचारच महत्वाचा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper