×

भाजपाच्या मातृसंस्थेला जे हवे आहे, ते कोर्टाच्या माध्यमातून नष्ट करण्याचा प्रयत्न

Published On :    12 May 2022
साझा करें:

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून छगन भुजबळ यांचा आरएसएसवर निशाणा



नाशिक: आम्ही ओबीसींच्या बाजूने आहोत, असे भाजपा वरवर दाखविण्याचा प्रयत्न करतेय. मात्र एकाबाजूला ते ओबीसींच्या हिताच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जातात. दुसर्‍या बाजूला ते इम्पिरीकल डेटा देत नाहीत. 


कदाचित भाजपाच्या मातृसंस्थेला जे हवे आहे, ते जर राजकीय चाकोरीतून होत नसेल तर ते कोर्ट आणि इतर माध्यमातून होईल आणि आरक्षण नष्ट होईल असे प्रयत्न केले जात असल्याची शंका येते, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज अप्रत्यक्षपणे आरएसएसवर निशाणा साधलाय. आज जनता दरबार उपक्रमास छगन भुजबळ उपस्थित राहिले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


भाजपाने महाविकास आघाडी सरकारला धक्का देण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशने जसे कायदे केले होते, तसे कायदे महाराष्ट्राने केले. मात्र त्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका काहींनी घेतली. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राबाबत जो निर्णय दिला, तोच निर्णय मध्य प्रदेशसाठी दिला आहे. 


मध्य प्रदेशच्या बाजूने केंद्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडत आहेत. ज्याप्रमाणे आम्ही इम्पिरीकल डेटा मागत होतो, तो डेटा दिला असता तर आज इतर राज्यांवरही संकट आले नसते. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा संपुर्ण देशाला लागत असतो, हे आम्ही आधीपासून सांगत होतो असेही छगन भुजबळ म्हणाले.


भाजपच्या अशा धोरणांमुळे संबंध देशातील ओबीसी समाजावर संकट आले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुर्ण प्रयत्नशील असून ओबीसींना न्याय मिळवून देईल असा विश्‍वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
२५ मे भारत बंदला रोखण्यासाठी ब्राम्हणवाद्यांकडून हनुमा
कोरोना काळात जगात दर ३० तासांनी एका अब्जाधीशाचा उदय, तर द
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत २७ मे रोजी सर्वपक्षीय ब
अनधिकृत शाळांचे फुटले पेव
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, मुस्लिमांना केले जातेय टा
यूएपीएची तरतूद देशद्रोहापेक्षा धोकादायक
मध्य प्रदेशात २९ आणि राजस्थानमध्ये दररोज १४ मुले हरवतात
टुकार अभिनेत्री केतकी चितळेच्या जामीन अर्जावर २६ तारखे
ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे नसून बुद्धीस्ट स्थळ
ज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ
ज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका
कर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा
कोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी
ज्ञानवापी प्रकरणात हिंदू एनजीओ पदाधिकाऱ्याला सर्वोच्च
तथागत गौतम बुध्दांची विचारसरणी आजही जगाला मार्गदर्शकच
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना
शहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे
बाबरी मस्जिद गमावली पण आता ज्ञानवापी मस्जिद गमावणार ना
महाराष्ट्र सरकारकडून राजभवनला देण्यात येणाऱ्या निधीत व
अत्त दीप भव: तथागत बुद्धांचा विचारच महत्वाचा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper