×

अत्त दीप भव: तथागत बुद्धांचा विचारच महत्वाचा

Published On :    16 May 2022
साझा करें:

बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. तोच खरा धम्मोधर असतो. धम्म उपासक उपासिका बनण्या करीता स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.



डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटाळून हिंदू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिरपणे धम्मदीक्षा घेतली होती. हे काही लोक विसरतात. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती असो या बुद्धाची  (२०६७ वी ) जयंती असो आम्हाला समाजात  कोणताही बदल झाला असे म्हणता येत नाही किंवा बदल झाला नाही असेही म्हणता येत नाही. उत्सव महत्वाचा वाटतो. विचार आणि त्यानुसार आचरण  असणारा संघ कुठेही दिसत नाही. 


दोन वर्षे भीम जयंती साजरी न करणार्‍यांनी १३१ वी जयंती खूप जोशात उत्स्फूर्तपणे साजरी केली. दोन चार दिवस जयंती उत्सव साजरा करण्यासाठी एक महिना सर्व व्यक्तिगत,राजकीय वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन एकदिलाने संघ शक्ती दाखवून दिली. मी अनेकांना विचारले आपली पुढची दिशा काय असेल? मतदारसंघात आपण ही संघ शक्ती एकगठ्ठा मताचा अधिकार बजावून कायमस्वरूपी ठेऊ शकतो काय? यांचे उत्तर कोणाकडेच नव्हते निवडणुकीच्या वेळी नेते जे ठरवतील ते पाहू. आज आपण एकत्र आलो ते नेत्याच्या सांगण्यावरून नाही तर आपला निर्णय आपण घेतला. निवडणुकीतही आपल्या मतदारसंघाचा निर्णय आपण घेऊ नां. यावेळी बुद्धाच्या संदेशाची आठवण येते.


बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. तोच खरा धम्मोधर असतो. धम्म उपासक उपासिका बनण्या करीता स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. त्यामुळे आपली सामाजिक आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल असा सोप्या भाषेत सांगणारे बुद्ध आम्हांला आजही समजले नाही. म्हणूनच आम्ही भीम,बुद्ध जयंती उत्स्फूर्तपणे साजरी करतो,पण पुढची दिशा ठरवत नाही. कारण संघ नाही, संघाला धम्माची संहिता नाही. मग बुद्धाचे विचार आणि बाबासाहेबांचे संविधानातील नियम कसे लागू होतील.


बुद्ध पोर्णिमा जगातील मानवाच्या दुष्टीने खूप महत्वपूर्ण सण,उत्सव आहे. तो वेगवेगळ्या देशात वेग वेगळ्या नांवाने ओळखला जातो.बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतमाचा जन्म लुंबिनी शाक्य राज्य नेपाळ येथे झाला.याच दिवशी सात वर्ष कठोर तपश्‍चर्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते.आणि याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे महापारीनिर्वाण झाले. तथागत बुद्धांनी  सांगितले होते, अत्त दीप भव,स्वयं प्रकाशित व्हा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शासनकर्ती जमात व्हा. 


या दोन महान संदेशाचा आम्ही अर्थच समजून घेतला नाही. कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही. प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तू आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका असे बुद्ध नेहमी सांगत होते. विचारावर विश्‍वास ठेऊन प्रमाणिकपणे वागलात तर तुम्हाला आयुष्य हसवेल, तेव्हा समजा की हे चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. 


याची आठवण आपल्याला अन्याय अत्याचार व हत्याकांड झाल्यावरच येते. बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तोपर्यत आठवत नाही. ते म्हणतात संघ बडा बलवान संघ करेगा सबकी रक्षा क्यो की संघ बडा बलवान. धर्मांतरीत आंबेडकारी समाज, संघ, संघटना आणि पक्ष विचारधाराच मानत नाही. हे मान्य करीत नाही. म्हणून इतराशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता. हे समाजाला कोण सांगेल?


आंबेडकर आणि बुद्ध जयंती साजरी केलीच पाहिजे पण विचारधारेनुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्व प्राप्त होते. युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आरएसएसच्या प्रत्येक घटनाकडे लक्ष ठेऊन स्वत:चा कार्यक्रम ठरवायचा. म्हणजे तुमच्याकडे बघून भूंकणार्‍या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचू शकणार नाही. ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील. तुम्हाला समता,स्वत्रंत, बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागतील. त्यानुसार समाजात चर्चा बैठका घेऊन सातत्य ठेवावे लागेल. दोन चार दिवस जयंत्या साजर्‍या करण्यापुरत्या मतभेद दूर होणार असतील तर, केवळ जयंती साजरी करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर जयंती साजरी करण्याचा अर्थ काय?


माणसाच्या संघाने, संघटनेने, पक्षाने जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नये, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवित नसतात. हे आजच्या आंबेडकरी चळवळीला कोण सांगेल? बुद्ध म्हणतात काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता. त्यात सर्वोचस्थानी आपण पोहचू शकतो. स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंतन सतत केले पाहिजे.संघर्ष केल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.


आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढून टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. म्हणूनच बुद्ध विहारे ही समाजाची समाज परिवर्तनाची केंद असायला पाहिजे होती. पण बहुसंख्य विहारे व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदामुळे बंद असतात. त्याबाबत कोणीच गांभीर्याने चर्चा संवाद परिसंवाद करीत नाही. मग मार्ग कसा निघेल? मग दरवर्षी भिम,बुद्ध जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा उदेश काय जर त्यातून पुढील दिशा ठरत नसेल तर?


श्रीलंका,थायलंड,बर्मासह १८० देशात भव्य बुद्ध विहारे ही शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे केंद्र असतात. तिथे शिस्तबद्ध आचरणात सर्व व्यवहार होतात. एक दिवस विशेष बुद्ध जयंती साजरी करून त्यांना काहीच बदल अपेक्षित नसतो. समाजातील चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे, मग आजवर जे काहीच केले नाही असे काही तरी करण्याची तयारी ठेवा. 


म्हणजे समाजात बदल घडेल. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही. अडीच हजार वर्षा पूर्वी बुद्धानी मानव कल्याणासाठी सांगितलेला संदेश आजही एकूण मानव जातीसाठी खूप उपयोगी आहे.व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा होईल.जर समाजातील व्यक्तीचा विकास झाला नाही तर समाज काय करेल व्यक्ती एकत्र आल्या तर समाज तयार होतो. समाज एकत्र आला तर संघ, संघटना आणि पक्ष तयार होतो. मग तो मानव कल्याणाकरीता मानव मुक्तीचा मार्ग खुला करतो. 


आज देशात भिख्खु संघ संघटित नाही. त्यामुळे देशातील उपासक उपासिका यांचा ही संघ संघटना संघटित नाही. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला धम्म किती ही चांगला असला तरी तो आत्मसात करण्यात आपण कुठे तरी कमी पडतो. म्हणून तमाम आंबेडकरी चळवळीतील बौद्ध बांधवास बुद्ध जयंती निमित्ताने स्वत:चे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून बुद्धाला त्यांच्या धम्माला शरण जा आणि संघ शक्ती बनवा. बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आणा .भिम,बुद्ध जयंतीचा उत्सव आणि पुढील दिशा ठरवा. बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक मंगल कामना, सबका मंगल हो!

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणे चुकीचे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लंडन सर्वोत्तम शहर, मुंब
३.५९ कोटी ग्राहकांनी वर्षभरात एकही सिलिंडर भरला नाही
३१ टक्के राज्यसभा खासदारांवर फौजदारी खटले
दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
५४ टक्के भारतीयांचा सोशल मीडियावर विश्‍वास
लोकविरोधाच्या धास्तीने पेशवा फडणवीस मुख्यमंत्रीपदापा
टरबुजाने बंडखोर आमदारांवर खर्च केले ७ हजार कोटी
भाजपाकडून घटनाविरोधी काम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper