×

तथागत गौतम बुध्दांची विचारसरणी आजही जगाला मार्गदर्शकच

Published On :    17 May 2022
साझा करें:

बुध्दांच्या मृत्युनंतर लुंबिनीची सुंदर बाग तीर्थक्षेत्र बनली.इसवी सन पुर्व 249 मध्ये सम्राट अशोकाने भगवान बुध्दांचे जन्मस्थान लुंंबनी येथे तीर्थयात्रा काढली.लुंबिनीचे वर्णन फाहियान आणि युवाचवांग या चिनी प्रवासी यांनीही केले आहे.लुंबिनी हे नेपाळमधील ठिकाण आहे.जिथे भगवान बुध्दांचा जन्म झाला होता.सध्या हे ठिकाण नेपाळमधील रुपांडेई जिल्हयात आहे.बौध्द परंपरेनुसार  राणी महामायादेवीने 563 ईसापुर्व सिध्दार्थ गोतमाला जन्म दिला आहे.पुढे ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्यांना बौध्द म्हटले जाऊ लागले.लुंबिनी हे बुध्दाच्या जन्मस्थानाशी संबंधित असल्याने त्याला खुप महत्व आहे.हे बौध्द तीर्थक्षेत्र आहे.जगभरातुन लोक येथे येतात.लुंबिनीचे मायादेवी मंदिर .लुंबिनीमध्ये मायादेवी मंदिरासह अनेक जुनी मंदिरे आहेत.यांसोबतच अनेक देश आणि बौध्द संघटनांनी नवीन मंदिरे स्तुप स्मारके आणि मठही येथेही आहेत.काहींचे बांधकाम सुरु आहे.येथे आंतरराष्टी्रय संशोधन केंद्र आणि संग्रहालय देखील आहे.येथे एक पवित्र तलाव देखील आहे.जिथे बुध्दांच्या आईने जन्म देण्यापुर्वी अंघोळ केली होती.


बुध्दानेही  येथेच आपल्या जन्मानंतर स्नान केले.लुंबिनी हे नेपाळच्या दक्षिणेस हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे.संशेधकाच्या पथकाने लुंबिनीच्या उत्खनना दरम्यान शतकानूशतके जुने मंदिर आणि गाव शोधून काढले आहे.या ठिकाणाबाबत कोणतीही पुर्व माहीती उपलब्ध नव्हती.युनेस्कोने बुध्दाच्या जन्मस्थानाला ऐतिहासिक महत्व असलेले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.बुध्दाच्या काळात लुंबिनी कपिलवस्तूच्या पुर्वेला होती.हे शाक्य प्रजासत्तक होते.सम्राट अशोकाने स्थापित केलेला अशोक स्तंभ देखील आहे.जो ब्राम्ही लिपी प्राकृत भाषेत आहे.ज्यामध्ये लुंबिनी हे बुध्दाचे जन्मस्थान असल्याचे लिहिले आहे.कुशीनारा आपल्या मृत्यूपुर्वी भगवान बुध्द म्हणाले ही ती जागा आहे जिथे तथागताचा जन्म झाला.हे असे ठिकाण आहे जे आस्तिकांनी पाहावे.आजमितीला जगभरातून यात्रेकरु आणि पर्यटक लुंबिनीला येतात.हे ठिकाण जगातील बौध्द धर्माच्या चार प्रमूख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.


बुध्दांच्या मृत्युनंतर लुंबिनीची सुंदर बाग तीर्थक्षेत्र बनली.इसवी सन पुर्व 249 मध्ये सम्राट अशोकाने भगवान बुध्दांचे जन्मस्थान लुंंबनी येथे तीर्थयात्रा काढली.लुंबिनीचे वर्णन फाहियान आणि युवाचवांग या चिनी प्रवासी यांनीही केले आहे.फाहियानच्या म्हणण्यानुसार कपिलवस्तूला पुर्वेला 50 मैलांवर सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप लुबिनी वन युवाचवांगने पाहिला होता.या ठिकाणी पहिल्यांदा पाहिला होता.कदाचित हुणांच्या आक्रमणांनंतर ही जागा विस्मृतीच्या अंधारात गेली असावी.डॉ. फुहरार यांनी 1866 मध्ये हे ठिकाण शोधून काढले.तेव्हापासून हे ठिकाण बौध्द जगतात श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाते.


हे पण वाचा : राजस्थानमधील मंत्रिपुत्र रोहित जोशीला बलात्कार प्रकरणी समन्सभारत देशाला ज्ञानाची संस्काराची युगानयुगे मार्गदर्शन करणारया विचारसरणीची अतिशय समृध्द परंपरा लाभली आहे.भारतीय दर्शन शास्त्रांपैकी एक शास्त्र  बौध्ददर्शन होय.राजपुत्र म्हणून जन्माला आलेले आणि बुध्दगयेला बोधी वृक्षाखाली परमशांतीचा अनुभव घेतलेले गौतमबुध्द हे या दर्शनशास्त्राचे प्रणेते आहेत.वैशाख पौर्णिमेचा बुध्दपौर्णिमा हा दिवस भारतातच नव्हे तर इतरही अनेक देशात उत्साहाने साजरा केला जातो.गौतमबुध्दांचा झाली तेव्हा राजकीय सामाजिक परिस्थिती अशी होती की केवळ सत्ता व पैसा हीच सुखाची साधने वाटु लागली होती.भौतिकतेचा हव्यास इतका पराकोटीला पोचला होता की त्यापुढे दुसरयाचे सर्वस्व दुसरयाचा जीव मातीमोल ठरत होता.सम्राट अशोक हा त्यावेळचा जगज्जेता राजा होता. बळ आणि संपत्तीच्या जोरावर हवे ते सुख क्षणार्धात मिळवू शकेल असा .परंतू त्याच्याही जीवनात एक क्षण असा आला की भौतिकता खरे सुख देऊ शकत नाही.समाधानाशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही.हे त्याच्या लक्षात आले की आणि तो गौतमबुध्दांना शरण गेला.सम्राट अशोक कशाला? आजही समाजामध्ये कमी अधिक प्रमाणात हेच चित्र पाहायला मिळते.


शिक्षण धंदा घर दार लग्न मूलबाळ जबाबदारया संकटे यातून पार पडताना फक्त संख्येला भौतिकाला स्वताच्या फायदयाला महत्व देण्याची सवय लागल्यास एक क्षण असा येतो की कोणतीही गोष्ट आनंद देऊ शकत नाही.समाधान हा भाव हरपुन बसतो.त्यामूळे धम र्म्हणजे स्वभाव मूळ गुणधर्म होय.अग्नीचा धर्म आहे ऊब देणे.नदीचा धर्म आहे वाहणे.वृक्षाचा धर्म आहे फुले फळे देणे.छाया देणे.अशा प्रकारे सर्व प्राणीमात्रांचा स्वताचा असा धर्म आहे.जर मानवता हा मनूष्याचा धर्म आहे.गरजवंताला मदत करणे.सर्वाच्या कल्याणाचे पाहणे. सर्वाबरोबर मिळूनमिसळून राहणे. यामूळे बुध्दीची उपासना करणारा बुध्द आहे.


गौतमबुध्द ज्ञानाचे सार्वभौमत्व स्पष्ट करतात.गोष्टी लक्षात ठेवणे माहिती गोळा करणे व जे अनुभवाने सिध्द करता येणे म्हणजे ज्ञान होय.सत्याला प्रकाशित करणारे ज्ञानच शांतीचा अनुभव देते.शक्तीचा उत्कर्ष करते.एखादयाची फसवणूक केल्यावर व यासाठी बुध्दीचा चुकीचा वापर केल्यास त्यातून शेवटी अशांती मिळणार आहे.संघ म्हणजे अमर्याद होय.अथांग असीमित कोण्त्याही मर्यादेत अडकून न राहता छोटया छोटया गोष्टीत न रमता आपण या विश्वाचा एक महान भाग आहोत हे समजावणारे नीतीसुत्र होय.समाजाला एकत्र ठेवणारे विचार आत्मसात करणे सर्वाचे हित जपणे योग्य निर्णय घेणे म्हणजेच आत्मविश्वास होय.रोजचे जीवन जगताना नीतीसूत्रे अंगीकारली म्हणजे स्वार्थापेक्षा मानवतेला महत्व देणे होय.ज्ञानाला आदर दिला व मनात परोपकाराची भावना कायम तेवत ठेवली आणि स्वहितापेक्षा समाजाच्या हिताला प्राधान्य दिले तर गौतमबुध्दांचा उपदेश खरा अर्थ या दृष्टीने अनुभवता येईल.आणि आतल्या बुध्दतत्वाला प्रसन्न करता येईल.भुतकाळाकडे लक्ष देऊ नका भविष्याविषयी विचार करु नका.


आपल्या मनांत आपल्या वर्तमानातल्या क्षणांवर लक्ष केंद्रित करा.हजारो पोकळ शब्दांपेक्षा शांती आणणारा एक शब्द चांगला असतो.समाधान मोठी गोष्ट आहे.प्रामाणिकपणा सगळयात मोठी संबंध आहे.आणि आरोग्य सगळयात मोठी भेट आहे.व रागाला धरुन राहणे हा गरम कोळसा आहे.म्हणून सर्व मनुष्य मात्रांनी सन्मानाने राहावे आणि इतरांस सन्मानाने जगु दयावे.


बौध्द धर्माच्या अनुयायांसाठी हा सर्वात मोठा सण आहे.बौध्द धर्मातील लोक वैशाख पौर्णिमेला भगवान बुध्दांची जयंती मोठया प्रमाणात साजरी करतात.तथागत गौतम बुध्दांचे विचाराने या जगाला शांतीचा संदेश दिला आहे.गौतम बुध्दांचे विचार या जगासाठी व त्यांच्या अनुयांयासाठी प्रेरणादायी आहेत .दया क्षमा शांती या संदेशाचा गौतम बुध्दांनी सर्वत्र प्रसार केला.आजही गौतम बुध्दांची विचारसरणी जगाला मार्गदर्शक ठरत आहे.जोपर्यत जीवन कसे जगावे हे समजत नाही तोपर्यत मन बाहेर भटकवण्याऐवजी आतमध्ये शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही.धावाधाव करुन बाहय जगातुन मिळवलेल्या सुखाला सूख म्हणता येत नाही.त्यासाठी जीवन समरसतेने शांतीने संयमाने नीतीमूल्याने जगावे लागते.


बुध्दी धृती आणि स्मृतीरुपी प्रज्ञेच्या मदतीने मनुष्याचे मन हे इच्छेला बळी न पडता योग्य निर्णय घेऊ शकते.अर्थात बुध्दी असो किंवा प्रज्ञा असो ती शुध्द असायला हवी.अक्षय आनंद प्रमानंद आत्मिक समाधान आणि प्रमोच्चशांती हाच आपल्या जीवनाचा उद्देश्य असतो.बौध्द तत्वज्ञानात यालाच निर्वाण म्हटले आहे.समाजात समतोल साधला गेला पाहिजे.तरच आपण नवीन पिढीला स्वतंत्र समता न्याय या तत्वांचा आदर्श दिला पाहिजे.त्यामूळे या जगाला गौतम बुध्दांचे विचारच तारु शकतात.या जगाला गौतम बुध्दांच्या क्षमा शांती प्रेम व सार्वजनिक समानता या आदर्श विचारसरणीची गरज आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणे चुकीचे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लंडन सर्वोत्तम शहर, मुंब
३.५९ कोटी ग्राहकांनी वर्षभरात एकही सिलिंडर भरला नाही
३१ टक्के राज्यसभा खासदारांवर फौजदारी खटले
दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
५४ टक्के भारतीयांचा सोशल मीडियावर विश्‍वास
लोकविरोधाच्या धास्तीने पेशवा फडणवीस मुख्यमंत्रीपदापा
टरबुजाने बंडखोर आमदारांवर खर्च केले ७ हजार कोटी
भाजपाकडून घटनाविरोधी काम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper