×

बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत २७ मे रोजी सर्वपक्षीय बैठक

Published On :    23 May 2022
साझा करें:

राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष



पाटणा : बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. याआधी जातनिहाय जनगणनेबाबत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. अलीकडेच विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी यासंदर्भात नितीश कुमार यांची भेट घेतली. आता नितीश कुमार यांनी बैठक बोलावली असून जातनिहाय जनगणनेवर चर्चा होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यासाठी तारीखही आली आहे.


हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे  प्रवक्ते दानिश रिझवान यांनी सांगितले की, राज्यसभा निवडणुकीपूर्वी जातनिहाय जनगणनेवर सर्वपक्षीय बैठक होणार आहे. २७ मे रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत बैठक बोलावली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना कळविण्यात येत आहे.


जातनिहाय गणनेबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते की, लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येईल आणि सर्वजण बसून आपल्या सूचना देतील. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासोबत झालेल्या वन टू वन भेटीचाही नितीश कुमार यांनी उल्लेख केला आहे. 


जातनिहाय जनगणनेची सरकारच्या पातळीवर सर्व तयारी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सर्वांची सूचना घेऊनच पुढील काम केले जाईल. यावर विलंब होत असल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही मधल्या काळात निवडणुकांमुळे संधी मिळाली नाही, पण आता लवकरच आपापसात चर्चा करून सर्वांच्या संमतीने एक दिवसाची तारीख ठरवू, असे म्हटले आहे.


गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात जातनिहाय जनगणनेवरून राजकीय गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षनेते आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी तर जातनिहाय जनगणना न झाल्यास पाटणा ते दिल्ली पायी कूच करण्याची घोषणा केली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणे चुकीचे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लंडन सर्वोत्तम शहर, मुंब
३.५९ कोटी ग्राहकांनी वर्षभरात एकही सिलिंडर भरला नाही
३१ टक्के राज्यसभा खासदारांवर फौजदारी खटले
दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
५४ टक्के भारतीयांचा सोशल मीडियावर विश्‍वास
लोकविरोधाच्या धास्तीने पेशवा फडणवीस मुख्यमंत्रीपदापा
टरबुजाने बंडखोर आमदारांवर खर्च केले ७ हजार कोटी
भाजपाकडून घटनाविरोधी काम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper