×

आसाममध्ये पोलिस चकमकीत ५१ आरोपींचा खात्मा

Published On :    23 Jun 2022
साझा करें:

स्वतंत्र एजन्सीमार्फत या चकमकींची चौकशी करण्याची मागणी



गुवाहाटी:  मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी मे २०२१ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून १३ महिन्यांत राज्यभरात पोलिस चकमकीच्या एकूण १६१ घटना घडल्या, त्यामध्ये ५१ आरोपी मारले गेले आणि १३९ जण जखमी झाले. स्वतंत्र एजन्सीमार्फत या चकमकींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुवाहटी उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने मंगळवारी या घटनेशी संबंधित जनहित याचिकेची सुनावणी २९ जुलैपर्यंत पुढे ढकलली.


गृह आणि राजकीय विभागाचे सहसचिव अनिमेश तालुकदार यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले की, रेकॉर्डनुसार, मे २०२१ ते २१ मे २०२२ पर्यंत पोलिस कारवाई किंवा पोलिस कोठडीदरम्यान ५१ लोकांचा मृत्यू झाला आणि १३९ जण जखमी झाले. या घटना राज्यातील ३१ जिल्ह्यांशी संबंधित आहेत. आसाममधील ३१ जिल्ह्यांमध्ये मे २०२१ ते ३१ मे २०२२ पर्यंत एकूण १६१ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सर्व प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपास करण्यात आल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.


पोलिस गोळीबाराच्या प्रत्येक घटनेसाठी स्वतंत्र एफआयआर नोंदवले गेले नाहीत वकील आरिफ मोहम्मद यासीन जवादर यांनी आरोप केला आहे. हा आरोप आसाम सरकारने नाकारला आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयाच्या देखरेखीखाली चकमकींचा तपास स्वतंत्र एजन्सीकडे करण्याची विनंती केली आहे. वकील आरिफ मोहम्मद यासीन जवादर यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे गेल्या वर्षी हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेल्या अनेक चकमकींबद्दल आसाम पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.


मानवी हक्क आयोगाकडे केलेल्या तक्रारीत पोलिसांनी क्षुल्लक गुन्हेगारांना बनावट चकमकीत गोळ्या घातल्याचं म्हटलं होतं. त्यांनी पोलिसांच्या ताब्यातून शस्त्रे हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला, असे चकमकीचे कारण देण्यात आले आहे. अलीकडच्या काळात अशा २० हून अधिक चकमकी झाल्याचा दावा जवादर यांनी केला होता. सर्व आरोपी हे किरकोळ गुन्हेगार जसे की ड्रग्ज विक्रेते, गुरेढोरे तस्कर, दरोडेखोर दहशतवादी नाहीत. त्यांना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची शक्यताही नव्हती. त्यातील काहींचा जागीच मृत्यू झाला, हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असे त्यांनी म्हटले होते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणे चुकीचे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लंडन सर्वोत्तम शहर, मुंब
३.५९ कोटी ग्राहकांनी वर्षभरात एकही सिलिंडर भरला नाही
३१ टक्के राज्यसभा खासदारांवर फौजदारी खटले
दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
५४ टक्के भारतीयांचा सोशल मीडियावर विश्‍वास
लोकविरोधाच्या धास्तीने पेशवा फडणवीस मुख्यमंत्रीपदापा
टरबुजाने बंडखोर आमदारांवर खर्च केले ७ हजार कोटी
भाजपाकडून घटनाविरोधी काम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper