×

बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणार्‍या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य

Published On :    24 Jun 2022
साझा करें:

गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लू मधील ७० खोल्यांचं आठवडाभराचं एकत्रित भाडं तब्बल ५८ लाख, खानपानावर दररोज ८ लाख, चार्टर्ड विमानाचा प्रवास खर्च कोट्यवधींच्या घरात



मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. या भुकंपाचं मूळ मात्र गुजरातमधून सुरू झालं. शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरूवातील गुजरातमधील सूरतमध्ये थांबलेले होते. यानंतर या आमदारांना आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये ठेवण्यात आलं आहे. हे गुवाहाटीमधील पंचतारांकित हॉटेल आहे. 


या हॉटेलमधील ७० खोल्यांचं आठवडाभराचं एकत्रित भाडं तब्बल ५८ लाख, खानपानावर दररोज ८ लाख, चार्टर्ड विमानाचा प्रवास खर्च कोट्यवधींच्या घरात आहे. बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणार्‍या खर्चात एखाद्या गरीबाचं पूर्ण आयुष्य निघू शकतो, एवढी पैशांची उधळपट्टी करण्यात येत आहे. हे सारे कशासाठी तर सत्तेच्या मेव्यासाठी...!


सध्या दररोज अनेक शिवसेना आमदार या हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. हॉटेलबाहेर आमदारांच्या सुरक्षेसाठी आणि हे आमदार फुटू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमधील ७० खोल्या या आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. 


या खोल्यांचं आठवडाभराचं एकत्रित भाडं तब्बल ५८ लाख रूपये इतकं असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. याशिवाय आमदारांच्या खानपानावर याठिकाणी दररोज ८ लाख रूपये खर्च करण्यात येतात, अशी माहितीही समोर आली आहे. एकंदरीतच आमदारांच्या राहाण्याची सोय, खानपानाचा खर्च आणि चार्टर्ड विमानाने होणार्‍या प्रवासाचा खर्च कोट्यवधींच्या घरात आहे.


या पंचतारांकित हॉटेलमध्ये १९० खोल्या आहेत. १९० पैकी ७० खोल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. या हॉटेलचं व्यवस्थापन सध्या कोणाचंही नवीन बुकिंग घेत नाही. रेडिसन ब्लूचे बॅक्वेट बंद करण्यात आले आहे. सध्या या हॉटेलमध्ये राहात असलेल्यांनाच तिथल्या भोजनकक्षात (रेस्टॉरंटमध्ये) जाण्याची परवानगी आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणे चुकीचे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लंडन सर्वोत्तम शहर, मुंब
३.५९ कोटी ग्राहकांनी वर्षभरात एकही सिलिंडर भरला नाही
३१ टक्के राज्यसभा खासदारांवर फौजदारी खटले
दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
५४ टक्के भारतीयांचा सोशल मीडियावर विश्‍वास
लोकविरोधाच्या धास्तीने पेशवा फडणवीस मुख्यमंत्रीपदापा
टरबुजाने बंडखोर आमदारांवर खर्च केले ७ हजार कोटी
भाजपाकडून घटनाविरोधी काम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper