×

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना तोडण्याचे काम पुण्यातील ब्राम्हणांकडून

Published On :    29 Jun 2022
साझा करें:

परभणीतील बौद्ध-मातंग ऐक्य परिषदेत डॉ.विलास खरात यांचा निशाणा



परभणी: डॉ.बाबासाहेब आबेडकर हे बौद्ध व मातंग बांधवांमध्ये ऐक्य घडवून आणत होते. मात्र डॉ.आंबेडकरांच्या त्या चळवळीपासून मातंग बांधवांना तोडण्याचे काम पुण्यातील ब्राम्हणांकडून केले गेले. त्यात भटमान्य टिळकांचा शिष्य न.चि.केळकर व हिंदू महासभा आघाडीवर होतेे अशा शब्दात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव डॉ.विलास खरात यांनी निशाणा साधला. परभणी येथे बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहूजी क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध-मातंग ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ब्राम्हण व ब्राम्हणवादाचा खरपूस समाचार घेतला.


डॉ.खरात म्हणाले, मूलनिवासी महापुरूषांच्या विचारधारेच्या मार्गाने त्यांना एकत्र आणणे म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बौद्ध आणि मातंग या मूलनिवासी बांधवांचे ऐक्य करण्याचे अभियान सुरू झाले आहे. एक संयुक्त कार्यक्रम घ्यावा असा आग्रह लहूजी क्रांती मोर्चाने धरला, ही आमच्यासाठी गर्वाची व अभिमानाची बाब आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात जवळपास १३ मातंग परिषदा घेतल्या आहेत. बौद्ध व मातंग यांच्या एकजुटीसाठी प्रयत्न केले आहेत. 


केवळ परिषदा घेतल्या नाहीत तर येणार्‍या पिढीला आपल्या मूलनिवासी महापुरूषांचा इतिहास कळावा म्हणून त्या काळात डॉ.आंबेडकरांनी ठराव पारित केले आहेत. ते ठराव बौद्ध आणि मातंग ऐक्याचे आहेत. ते ऐतिहासिक रेकॉर्ड आम्ही जतन करून ठेवलेले आहेत. मातंग बांधव १९३५ पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत होता. गोलमेज परिषदेच्यावेळीही तो सोबत होता. मग त्यानंतरच्या काळात मातंग बांधव बाबासाहेबांच्या चळवळीपासून दूर कसा झाला? आणि या बांधवांना नेमके कुणी दूर केले? हा प्रश्‍न महत्वाचा आहे. 


कारण जर आम्हांला बौद्ध-मातंगाना एक व्हायचे असेल तर काही हा नवीन प्रयोग नाही. त्या काळात बाबासाहेबांनी आयुष्यभर गोरगरीब, दीनदुबळ्या आणि वंचित लोकांसाठी व १८ पगड जातीच्या मूलनिवासी बांधवांसाठी मोठे काम केले आहे. हे आपल्या महापुरूषांनी ठरवून दिलेले काम असून ते निर्धारित आहे. त्या काळात मूलनिवासी महापुरूषांनी जे काम केले आहे ते ऐतिहासिक कार्य व वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यासाठी बौध्द-मातंग यांची ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. 


मातंग बांधव बाबासाहेबांच्या चळवळीपासून कधी बाहेर गेला हे जाणणे गरजेचे आहे. त्यांना तोडण्याचे का काम करण्यात आले. १९२९, ३० आणि ३१ मध्ये गोलमेज परिषदेसाठी मोठी लढाई झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये केवळ महारांची बाजू मांडली नाही तर सर्व अस्पृश्य समाजाची बाजू मांडली. त्या गोलमेज परिषदेनंतर डॉ.बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व आणि लीडरशीप तयार झाली. त्यांची लीडरशीप जगाने मान्य केली. सार्‍या जगभरात बाबासाहेबांचे वलय निर्माण झाले. 


तशाप्रकारची कागदपत्रे समोर आली आहेत. महार आणि मातंग केवळ महाराष्ट्रात सापडतात परंतु त्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महार लोकांनी ईमानदारीने व प्रामाणिकपणे साथ दिली. महार छोटी जात असूनसुद्धा त्यांच्यात नेतृत्व, प्रेरणा, जागृती, उत्साह निर्माण केला. ज्याप्रमाणे महार जातीने बाबासाहेबांना साथ दिली त्याप्रमाणे मातंग बांधवांनीही त्यांना साथ दिली. त्यामुळे एक राष्ट्रीय चळवळ निर्माण होण्यासाठी महार व मातंग जातीचे मोठे योगदान होते. मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण करून ते समाजाला तयार करत होते.


आपला निर्धारित दुश्मन विदेशी ब्राम्हण अस्पृश्य जातीतील मातंग समाजाला महापुरूषांच्या विचारधारेपासून व त्यांच्या आंदोलनापासून तोडत असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आले होते. तोडण्याचे केंद्र पुणे आहे, हे त्यांना समजले होते. बाबासाहेबांची चळवळ तोडण्यासाठी हिंदू महासभा व विदेशी ब्राम्हणांनी अभियान चालवले. त्यांनी मातंग बांधवांना बौद्धापासून तोडण्याचा प्रयत्न केला. भटमान्य टिळकाचा चेला न.चि.केळकर हा मातंग बांधवांना चळवळीपासून तोडण्यासाठी योजना बनवत होता. 


म्हणजे विदेशी ब्राम्हण किती षड्यंत्रकारी आहेत, डावपेच करतात हे लक्षात येते. न.चि.केळकरने तर केसरी पेपरमधून डॉ.बाबासाहेबांवर आरोप केला की, तुम्ही अस्पृश्य लोक आम्हां ब्राम्हणांना दोष देता परंतु अस्पृश्यातीलच काही लोक इतर जातींना अस्पृश्य मानतात त्याचे काय? महार लोकही इतर जातींना अस्पृश्य मानतात. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर विदेशी ब्राम्हणांशी केवळ विचाराने लढता येणार नाही तर डावपेचाने लढायला हवे असे म्हणायचे. 


विदेशी ब्राम्हण हा कैवारी नसून आपापसात भांडणे लावून वैर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कित्येक वर्षापासून ते करत आला आहे असे त्यांचे म्हणणे होते. हेच उत्तर बाबासाहेबांनी वर्तमानपत्रातून दिले होते याची आठवण डॉ.खरात यांनी करून दिली.


न.चि.केळकरला उत्तर देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, आमच्यामध्ये, अस्पृश्यांमध्ये भेदाभेद आहे. नीचता आहे. ते वास्तविक असून ते मी नाकारत नाही. तर हा जातीभेद, वंशवाद, अस्पृश्यता ही आली कुठून? तर तुम्ही विदेशी ब्राम्हणांनी अस्पृश्यतेची घाण सार्‍या देशभरात पसरवली. ही सर्व अस्पृश्यता ब्राम्हणांच्या धर्मग्रंथातून, ब्राम्हणांच्या व्यवस्थेतून आली. याला विदेशी ब्राम्हणच जबाबदार आहेत. 


तुम्ही ब्राम्हण लोक आम्हांला सांगता जातीव्यवस्था गटार आहे. ती तुम्ही साफ करा. मात्र जातीव्यवस्था व अस्पृश्यतेचे मुख्य छिद्र तुम्ही आहात. जोपर्यंत जातीव्यवस्थेच्या गटाराचे प्रमुख केंद्र म्हणजे छिद्र ब्राम्हणांकडून साफ केले जाणार नाही तोपर्यंत जातीव्यवस्था नष्ट होणार नाही.  


जातीव्यवस्था निर्माण करण्याचे केंद्र ब्राम्हण आहे. म्हणून ब्राम्हणाला नष्ट केल्याशिवाय ते होणार नाही. ब्राम्हण नावाच्या गटारातून जातीव्यवस्थेची निर्मिती होत आहे. अस्पृश्यतेची निर्मिती होत आहे. तुमचे धर्मग्रंथ, तुमची मनुवादी-ब्राम्हणी व्यवस्था व तुमची शासन व्यवस्था नष्ट केली पाहिजे. संपवली पाहिजे. तेव्हाच जातीव्यवस्था व अस्पृश्यता बंद होणार आहे असे बाबासाहेब म्हणाल्याचे डॉ.खरात यांनी सांगितले.


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून तोडण्यासाठी ब्राम्हणांनी व हिंदू महासभेच्यावतीने के.के. सकट नावाच्या मातंग माणसाला संभ्रमित केले व त्याला मातंग नेता म्हणून घोषित केले.  के.के. सकट नावाच्या ब्राम्हणांच्या दलालाकडून मातंग बांधवांना बाबासाहेबांच्या चळवळीपासून दूर केले. त्यानंतर के.के.सकट याला मोठा गर्व झाला की मोठा नेता झालो. त्या काळात ब्राम्हणांनी मोठ्या प्रमाणात अत्याचार केला. 


आमचे सामाजिक, राजकीय आणि मूलभूत हक्क व अधिकार नाकारले. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीचा लढा अधिक सक्रीय झाला आणि त्यांनी नवीन कार्यकर्ते तयार केले. त्याचवेळी बाबासाहेबांनी धर्मांतर करावयाचे ठरवले. तेव्हा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात धर्मांतराची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पहिली मातंग जातीची ऐक्य परिषद घेतली. म्हणजेच सामाजिक चळवळीला सक्रीय करण्यासाठी बौद्ध व मातंग यांची ऐक्याची चळवळ निर्माण केली. 


मातंग बांधवांची पहिली ऐक्य परिषद भरवून मातंगांचा मोठा पाठिंबा मिळवला. हा रेकॉर्ड असून त्याचा ऐतिहासिक पुरावा आहे. ब्राम्हणांना धडा शिकवण्यासाठी बाबासाहेब विचाराने व डावपेचाने संघर्ष करत होते. त्यामुळे त्या काळात बौद्ध व मातंग ऐक्य होऊ नये यासाठी वेळोवेळी ब्राम्हण षड्यंत्र करत होते. त्याचे प्रमुख केंद्र पुणे होते. यावरून पुण्याचे ब्राम्हण किती षड्यंत्रकारी व जाती-जातीत भांडणे लावणारे, वैर निर्माण करणारे आहेत हे लक्षात येते असा हल्लाबोल डॉ.खरात यांनी केला.  

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन
‘आरएसएस’ ही उच्च जातींची संघटना: राष्ट्रध्वज, राष्ट्रगी
महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्य होरपळला
हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे हीच भाजपाची रणनिती, निती
दहा जणांना आरटीआय दाखल करण्यास आजीवन बंदी
अशोक चक्र नसलेल्या ध्वजाचा वापर
अपात्रतेची सुनावणी असताना आमदारांना मंत्रिपदाची शपथ हा
भाजपा मजबूत झाल्यास मताचा अधिकार संपुष्टात
नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ,
निष्ठूरतेची परिसीमा: आधारकार्डअभावी ग्रामीण रुग्णालया
मुलभूत समस्यांकडे लक्ष्य विचलित करण्यासाठी घर-घर तिरंग
हिंदू-मुस्लीम दंगली व ब्राम्हण्यवादी
भारताचा डाटा सुरक्षेवर २४ हजार कोटी खर्च: तरीही सायबर गु
पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात १० तर नेपाळमध्ये ११ रु
बिहारमध्ये ‘ऑपरेशन रिव्हर्स लोटस’
राज्यातील अपघातांत १८ टक्क्यांनी वाढ
वादग्रस्त संजय राठोड आणि अब्दुल सत्तार कॅबिनेटमंत्रीपद
वामन मेश्राम यांनी भारत व उत्तर प्रदेश बंदची घोषणा करताच
भटांची पिल्ले वैमानिक आणि आमची मंदिराच्या रांगेत
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ६५४ केंद
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper