×

दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी

Published On :    30 Jun 2022
साझा करें:

शिक्षक आणि कंत्राटी कर्मचार्‍यांना २ महिन्यांपासून पगार नाही



नवी दिल्ली:  दिल्लीत जवळपास डझनभर महाविद्यालये आहेत, जिथे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना पगाराच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या अखत्यारीतील या सर्व महाविद्यालयांना दिल्ली सरकारकडून निधी दिला जातो. या १२ महाविद्यालयांचे अनुदान तात्काळ जाहीर करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे केली आहे. दिल्ली टीचर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, १२ महाविद्यालयांचे अनुदान न जारी केल्याने केवळ पगार पेमेंटच नाही तर प्रलंबित वैद्यकीय बिले, सेवानिवृत्तीचे फायदे आणि इतर विकास खर्चांवरही परिणाम झाला आहे.


शिक्षकांच्या पदोन्नतीची थकबाकीही त्यांना लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी दिल्ली सरकारकडे करण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठाचे नवे शैक्षणिक सत्र २० जुलैपासून सुरू होत असल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यानंतर प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश, ओबीसी कोट्यातील दुसर्‍या टप्प्यातील शिक्षकांची नियुक्ती, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नियुक्ती याशिवाय परीक्षा आणि त्याचे मूल्यमापन आदींसाठी अनुदान आवश्यक असेल.


दिल्ली सरकारच्या पूर्ण अनुदानीत १२ महाविद्यालयांना निधी जारी करण्यात आणखी विलंब न लावता मदत करावी, जेणेकरुन या अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षक आणि कर्मचार्‍यांचे पगार आणि इतर देणी अदा करता येतील. डीटीएचे अध्यक्ष डॉ. हंसराज सुमन यांनीही दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दिल्ली सरकारशी संलग्न असलेल्या १२ पूर्ण अनुदानीत महाविद्यालयांचे अनुदान त्वरित जारी करण्याची मागणी केली आहे. 


ते म्हणाले की, काही महाविद्यालयातील शिक्षकांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कायम, तदर्थ, अतिथी शिक्षक व कंत्राटी कर्मचार्‍यांवर प्रचंड आर्थिक संकट कोसळले आहे. डीटीएचे एक शिष्टमंडळ लवकरच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची भेट घेऊन महाविद्यालयांना अनुदान देण्याची मागणी करणार आहे.


१२ पूर्णपणे अनुदानित दिल्ली सरकारी महाविद्यालयातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने सांगितले की, शेकडो शैक्षणिक आणि शिक्षकेतर कर्मचारी वेळेवर पगार न मिळाल्याने आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. काही महाविद्यालयांना दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. 


शिक्षकांना पदोन्नती होऊन महिना उलटून गेला तरी अद्यापपर्यंत त्यांना थकबाकी देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे त्यांची वैद्यकीय बिलेही भरलेली नाहीत. आपल्या महाविद्यालयातील अनेक अतिथी, तदर्थ व कंत्राटी कर्मचार्‍यांना दरमहा घरभाडे, ईएमआय, घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, मुलांची फी आदी भरावे लागतात, व्याजावर पैसे घेऊन ते हप्ता भरत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन
‘आरएसएस’ ही उच्च जातींची संघटना: राष्ट्रध्वज, राष्ट्रगी
महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्य होरपळला
हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे हीच भाजपाची रणनिती, निती
दहा जणांना आरटीआय दाखल करण्यास आजीवन बंदी
अशोक चक्र नसलेल्या ध्वजाचा वापर
अपात्रतेची सुनावणी असताना आमदारांना मंत्रिपदाची शपथ हा
भाजपा मजबूत झाल्यास मताचा अधिकार संपुष्टात
नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ,
निष्ठूरतेची परिसीमा: आधारकार्डअभावी ग्रामीण रुग्णालया
मुलभूत समस्यांकडे लक्ष्य विचलित करण्यासाठी घर-घर तिरंग
हिंदू-मुस्लीम दंगली व ब्राम्हण्यवादी
भारताचा डाटा सुरक्षेवर २४ हजार कोटी खर्च: तरीही सायबर गु
पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात १० तर नेपाळमध्ये ११ रु
बिहारमध्ये ‘ऑपरेशन रिव्हर्स लोटस’
राज्यातील अपघातांत १८ टक्क्यांनी वाढ
वादग्रस्त संजय राठोड आणि अब्दुल सत्तार कॅबिनेटमंत्रीपद
वामन मेश्राम यांनी भारत व उत्तर प्रदेश बंदची घोषणा करताच
भटांची पिल्ले वैमानिक आणि आमची मंदिराच्या रांगेत
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ६५४ केंद
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper