×

प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे राजकारण..!

Published On :    1 Jul 2022
साझा करें:

मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना ही आंबेडकरी विचारांच्या आणि मुस्लीम समाजाचा तिरस्कार करून मोठी झाली. कॉंग्रेसमधील जात दांडगे,धन दांडगे यांच्या राजकीय वर्चस्वाला त्यांनी सुरुंग लावला. दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍या घटना घडवून त्याविरोधात कायदा सुव्यवस्था बिगडविणारे आंदोलने करून त्यांनी सत्ताधार्‍यांना सळो की पळो केले.



मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना ही आंबेडकरी विचारांच्या आणि मुस्लीम समाजाचा तिरस्कार करून मोठी झाली. कॉंग्रेसमधील जात दांडगे,धन दांडगे यांच्या राजकीय वर्चस्वाला त्यांनी सुरुंग लावला. दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍या घटना घडवून त्याविरोधात कायदा सुव्यवस्था बिगडविणारे आंदोलने करून त्यांनी सत्ताधार्‍यांना सळो की पळो केले. पोलीस प्रशासनात दहशत निर्माण केली. गल्लीबोळात गुंडगिरी करणारे पोरे लढाऊ शिवसैनिक झाले.त्यातील एक एकनाथ शिंदे हा रिक्षावाला आज शिवसेनेला भारी पडत आहे.


अनेक शिवसेना नेत्याची आर्थिक प्रगती डोळ्यात भरणारी आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीय सांगणार्‍या मनुवादी पिलावळीला उद्धव ठाकरे यांची आजची शिवसेना वैचारिक दृष्टीने भारी पडत असल्यामुळे राज्यातील पेशवाई पेटून उठली होती. अडीच वर्षात अनेक प्रयोग केल्यावर ही महाआघाडीचे ठाकरे सरकार कोसळत नाही.


हे ब्राम्हणी काव्यात कसलेल्या पेशवाईच्या वैचारिक वारसदारांना सहन होत नाही.म्हणूनच त्यांनी इडी इन्कमटॅक्सचा पिंजरा तयार करून त्यात एक एक शिकार घेण्याचा सापळा लावला. त्यात पहिले नाव आहे प्रताप सरनाईक यांच्याकडे १७५ करोड संपती असल्याचे ईडीने चौकशीची नोटीस पाठविली. तेव्हा या कट्टर शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे पत्र लिहून भाजपा सोबत युती करण्याची हात जोडून विनंती केली.त्यामुळे ईडी सुरु झालेली कारवाई काही काळासाठी थांबवली गेली.


दुसरे नांव आमदार यामिनी जाधव ह्या यशवंत जाधव यांची पत्नी आहेत. सोन्याचे अंडे देणार्‍या मुंबई महानगरपालिकेत ते गेली अनेक वर्ष नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. यांच्यावर ईडीने कारवाई सुरु केली. काही कोटी संपती जप्ती केली. काही कारवाई सुरु होती. शिकारीच्या पिंजर्‍यात हा दुसरा शिकार झाला. 


महाराष्ट्रात सर्वात कमी वयाची तरुण मुलगी शिवसैनिक खासदार झाली. तिने वाशीम जिल्ह्यात अनेक एससी- मुस्लीम दंगली,हत्याकांड घडविले त्यामुळेच ती कायम प्रसिद्धीत राहिली आहे.तिचे एक संस्थान निर्माण झाले. तिने अनेक सामाजिक सेवा संस्था (एनजीओ ) निर्माण केल्या आणि ते चालवणारी तिची आई व प्रमुख संचालक होता साईद खान. त्याला ईडी ने अटक केली आणि सर्वच विकास चक्र फिरले. ते भावनाच्या गळ्यापर्यंत पोचले.


त्यात एकेकाळचा रिक्षावाला आनंद दिघेंचा विश्वासू वाहन चालक ते नगरसेवक,आमदार आजचा नंबर दोनचा कॅबिनेट मंत्री यांच्या ही संपत्तीची मोजणी करणे अवघड झाल्यामुळे ठाण्यात ईडीने अनेक पिंजरे लावले, त्यात आपण अडकणार आहोत यांची कल्पना त्यांना होती. त्यासाठी या सर्वांनी उद्धव ठाकरे यांना भाजपा सोबत युती करण्याची विनंती केली.पण प्रथमच उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार यांची विचारांची तळपती तलवार बाहेर काढली. मला शेंडी आणि जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही.


महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ते ही भर विधानसभेत उद्धव ठाकरेंनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा चालवण्याची घोषणा काय केली, त्यामुळे ब्राम्हणवादी पेशवाई गटाने शिवसेनेला खिंडार पाडण्यासाठी खलबतं,कपट-कारस्थानं सुरू केली.त्याचे अंमलबजावणी सुरत,गुवाहाटीत झाली. त्यात कट्टरपंथीय शिवसैनिक नाहीत तर गल्लीबोळातील गुंडगिरी करून जात दांडगे,धन दांडगे यांचे वर्चस्व नष्ट करून तयार झालेले लोकप्रतिनिधी ज्यांची कोणती ही विचारधारा नाही.


आज त्याची प्राथमिकता हे सेल किंवा जेल. भाजपा सोबत गेल्यास संपती वाचून सुरक्षित राहू शकतात. अन्यथा सर्व संपती जप्ती आणि जेल. किती वर्ष ते ही सांगता येत नाही.अशा परिस्थिती ते सर्व आमदार आहेत. दिल्लीचा ईडी त्यांना आज वाचवेल पण उद्याचा मतदारसंघातील मतदार ईडी त्यांना वाचवणार नाही. हे शंभर टक्के सत्य आहे.


मला शेंडी आणि जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही म्हणजेच हिंदुत्वाच्या आडून ब्राम्हणत्व मान्य नाही असं भर विधानसभेत सांगणारा, आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा चालवू पाहणारे उद्धव ठाकरे हे ब्राम्हणवादी गटाच्या म्होरक्याला अडचणीचे ठरू लागले. त्यामुळेच आज महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत आहे. त्यात महागाई,बेरोजगारी, भ्रष्टाचार,ओबीसी जनगणना, आरक्षण, शिक्षण, आरोग्य कोणताही मुद्धा महत्वाचा नाही.


उद्धव ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा व संत तुकोबारायांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला,तेव्हा महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण भारतातील ब्राम्हणवादी म्हणजेच मनुवादी व्यवस्थेने उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यासाठी कट्टरपंथीय शिवसैनिक लोकप्रतिनिधी बाहेर पडले नाही तर? ज्यांनी मराठी माणसांच्या पोटावर लाथा मारून संपती गोळा केली ती भ्रष्टाचारी,दलाल,बांडगूळ मंडळी आहेत.त्यांची संख्या फक्त चाळीस असली तरी ती जास्त दिवस जगणारी नाही, तर इतिहासात गद्दारी करणारी नांवे म्हणून त्यांची नोंद  घेतली जाणार आहेत. त्यात एका जातीची नाहीत तर अनेक जातीतील गद्दारी करणारी नांवे असणार आहेत.


छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा शिवसेनेने कधीच घेतला नाही.आणि शिवसेनेची वैचारिकता कधीच स्पष्टीकरण करणारी नव्हती. कधी मराठी,मराठी माणूस आणि महाराष्ट्र. हिंदुत्व कधी आले त्यांना ही कळले नाही. मनुवादी हिंदुत्व म्हणजे जातीव्यवस्था मान्य असणारी समाज व्यवस्था. मला शेंडी आणि जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही म्हणजेच हिंदुत्वाच्या आडून ब्राम्हणत्व मान्य नाही. 


तर भारतीय राज्यघटनेने दिलेले समता स्वातंत्र्य,बंधुभाव,समान अधिकार सामन न्याय. हाच प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आहे. चाळीस आमदार त्याला काळिमा फासत आहेत. त्यांनी रामायण महाभारतातील वर्ण व्यवस्थेचे समर्थन करणार्‍या आणि विरोध करणार्‍या पात्राचा अभ्यास करावा. पुढील इतिहास भूगोल लिहून ठेवावा. म्हणूनच आजचे देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे याचा गांभीर्याने विचार करावे. आजचे बळी दिसतात पण उद्या जेव्हा आपला बळी जाईल तेव्हा त्यांची कोणीच नोंद घेणार नाही. म्हणूनच लिहले प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे राजकारण?

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन
‘आरएसएस’ ही उच्च जातींची संघटना: राष्ट्रध्वज, राष्ट्रगी
महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्य होरपळला
हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे हीच भाजपाची रणनिती, निती
दहा जणांना आरटीआय दाखल करण्यास आजीवन बंदी
अशोक चक्र नसलेल्या ध्वजाचा वापर
अपात्रतेची सुनावणी असताना आमदारांना मंत्रिपदाची शपथ हा
भाजपा मजबूत झाल्यास मताचा अधिकार संपुष्टात
नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ,
निष्ठूरतेची परिसीमा: आधारकार्डअभावी ग्रामीण रुग्णालया
मुलभूत समस्यांकडे लक्ष्य विचलित करण्यासाठी घर-घर तिरंग
हिंदू-मुस्लीम दंगली व ब्राम्हण्यवादी
भारताचा डाटा सुरक्षेवर २४ हजार कोटी खर्च: तरीही सायबर गु
पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात १० तर नेपाळमध्ये ११ रु
बिहारमध्ये ‘ऑपरेशन रिव्हर्स लोटस’
राज्यातील अपघातांत १८ टक्क्यांनी वाढ
वादग्रस्त संजय राठोड आणि अब्दुल सत्तार कॅबिनेटमंत्रीपद
वामन मेश्राम यांनी भारत व उत्तर प्रदेश बंदची घोषणा करताच
भटांची पिल्ले वैमानिक आणि आमची मंदिराच्या रांगेत
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ६५४ केंद
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper