×

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ६५४ केंद्रे बंद!

Published On :    8 Aug 2022
साझा करें:

लाखो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित



मुंबई: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची कनिष्ठ महाविद्यालयांना संलग्नित असलेली राज्यातील ६५४ केंद्रे बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.


दुर्गम भागात उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये नसल्याने तेथील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही मुक्त विद्यापीठाची केंद्रे देण्यात आली होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दोन वर्षांआधीच्या पत्राचा दाखला देत विद्यापीठाने अचानक कनिष्ठ महाविद्यालयांना संलग्नित असलेली केंद्रे बंद करून प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. 


पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे हे केंद्र वरिष्ठ महाविद्यालयांमध्येच असावे असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबर २०२० मध्ये सर्व विद्यापीठांना दिले होते. परंतु, करोनाकाळात याकडे दुर्लक्ष करणार्‍या मुक्त विद्यापीठाने आता ३२ अभ्यासक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालयांतील ६५४ केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला. केंद्रावरील विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालयातील केंद्र स्थापन करून त्यांना पुन्हा शिक्षणात कायम ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. 


केवळ उच्च शिक्षण देणार्‍या महाविद्यालयांना केंद्रे जोडलेली असावीत या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका पत्राचा दाखला देत विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाने आज जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.


पदवी आणि पदव्युत्तरच्या ३२ अभ्यासक्रमांच्या केंद्राबाबत हा निर्णय घेतला आहे. तूर्तास येथील प्रवेश स्थगित केले आहेत. मात्र, विद्यार्थिहितासाठी ‘यूजीसी’कडून परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जवळच्या महाविद्यालयात लवकरच केंद्रे सुरू केली जातील, अशी माहिती विद्यापीठातील एका अधिकार्‍याने दिली.


पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम हे वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांकडून शिकवले जाणे आवश्यक आहे. प्राध्यापक असतील त्याच ठिकाणी केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असतानाही मुक्त विद्यापीठाने कनिष्ठ महाविद्यालयांत पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम दिले. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असलेले केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर खासगी विद्यापीठांचा विस्तार सुरू आहे. या विद्यापीठांना अधिकाधिक विद्यार्थी मिळावे, यासाठी अशा प्रकारची दुरुस्त शिक्षणासाठी असणारी केंद्रे बंद केली जात असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातून होत आहे. मुक्त विद्यापीठाची केंद्रे बंद करून खासगी शिक्षणाला बळ देण्याचा हा डाव असल्याचा आरोपही केला जात आहे. मुंबई-७९, पुणे-८६, अमरावती-१०५, औरंगाबाद-५१, नाशिक-७६, कोल्हापूर-७५, नांदेड १०९ अशी एकूण ६५४ केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सत्यशोधनाची १५० वर्षे..
थयथयाट करणार्‍या खासदार नवनीत राणांविरोधात अजामीनपात्
राज्यातील शून्य ते वीस पटसंख्येच्या शाळांना लावणार कुल
राज्यातील ‘मिंधे’ सरकार दिल्लीचे वेठबिगार
अनु.जातीच्या तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला
उत्तर प्रदेशात सरकारी रुग्णालये गरिबांच्या उपचारात रस
सरना धर्म संहितेसाठी आदिवासी पुन्हा आंदोलन करणार
बालमृत्यू दरात थोडीशी घट आणि केंद्रातील आरएसएस सरकारने
मोहन भागवत यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे
खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार?
‘आरएसएस’ पासून देश व संविधानाला धोका असल्याने मुख्यालय
आरएसएस मुख्यालयावरील मोर्चात देशभरातील भिक्खूंना सहभा
‘ब्राम्हणी’ आतंकवादाचा म्होरक्या मोहन भागवतांना ठरवले
कर्नाटक हिजाब वादावर युक्तिवाद पूर्ण
भाजपासमोर नतमस्तक झालो असतो तर इतके दिवस तुरुंगात राहाव
रूपयाच्या पुन्हा गटांगळ्या, भारतीय अर्थव्यवस्था डबघाईल
उद्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे पहिले राष्ट्रीय अध
टीआरपीसाठी वृत्तवाहिन्यांवर द्वेषयुक्त भाषेचा वापर
एसटी कर्मचार्‍यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आत
शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच ‘आवाज’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper