×

पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात १० तर नेपाळमध्ये ११ रुपयांनी घट

Published On :    9 Aug 2022
साझा करें:

भारतात अजूनही १०६ रुपयांपर्यंत वाढीव दर, वाहतूकदारांचे मोडले कंबरडे



नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. तसेच, जगात कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या होत्या. मात्र, आता कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. याचाच परिणाम पाकिस्तान आणि नेपाळसारख्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. दरम्यान, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही मोठी कपात झालेली नाही. भारतात पेट्रोलच्या किंमती १०६ रुपयांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे वाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे.


९ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या दरानुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आहे. तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत ८९.९२ रुपये आहे. याचबरोबर, मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत १०६ रुपयांपेक्षा जास्त आहे. या दरम्यान कंपन्यांनी कोणतीही वाढ किंवा कपात केलेली नाही. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या बॅरलच्या किमती कमी झाल्या असूनही पाकिस्तानसारख्या देशात इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे भारतीय इंधन कंपन्यांचा तोटा होत असल्याचे बोलले जात आहे.


दुसरीकडे ग्लोबल पेट्रोल प्राईसेज. कॉमच्या डेटानुसार, जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो, तर २० जून रोजी तेथे एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय चलनात ८६.७१ रुपये होती. १ ऑगस्ट २०२२ च्या किमतींबद्दल बोलत असताना, पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय चलनात ७६.४६ रुपये होती.


पाकिस्तानशिवाय, नेपाळमध्येही पेट्रोलच्या दरात घट झाली आहे. २० जून रोजी नेपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय चलनात १२४.२७ रुपये होती. तर १ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय चलनात ११३.९४ रुपये झाली होती.


भूतानमध्ये पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २० जून रोजी भूतानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत भारतीय चलनात ९२.०८ रुपये होती. तर १ ऑगस्टच्या किमतीनुसार भूतानमध्ये पेट्रोल भारतीय चलनात १०१.३० रुपये झाले आहे. त्याचबरोबर जगातील विविध देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तफावत आहे.


याचे कारण तेथे लावले जाणारे कर आणि अनुदान आहे. यासोबतच भारतीय पेट्रोल कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे की, एप्रिल-जून तिमाहीत त्यांच्या तोट्यात लक्षणीय वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या या पहिल्या तिमाहीत कंपन्यांना १८ हजार ४८० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सत्यशोधनाची १५० वर्षे..
थयथयाट करणार्‍या खासदार नवनीत राणांविरोधात अजामीनपात्
राज्यातील शून्य ते वीस पटसंख्येच्या शाळांना लावणार कुल
राज्यातील ‘मिंधे’ सरकार दिल्लीचे वेठबिगार
अनु.जातीच्या तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला
उत्तर प्रदेशात सरकारी रुग्णालये गरिबांच्या उपचारात रस
सरना धर्म संहितेसाठी आदिवासी पुन्हा आंदोलन करणार
बालमृत्यू दरात थोडीशी घट आणि केंद्रातील आरएसएस सरकारने
मोहन भागवत यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे
खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार?
‘आरएसएस’ पासून देश व संविधानाला धोका असल्याने मुख्यालय
आरएसएस मुख्यालयावरील मोर्चात देशभरातील भिक्खूंना सहभा
‘ब्राम्हणी’ आतंकवादाचा म्होरक्या मोहन भागवतांना ठरवले
कर्नाटक हिजाब वादावर युक्तिवाद पूर्ण
भाजपासमोर नतमस्तक झालो असतो तर इतके दिवस तुरुंगात राहाव
रूपयाच्या पुन्हा गटांगळ्या, भारतीय अर्थव्यवस्था डबघाईल
उद्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे पहिले राष्ट्रीय अध
टीआरपीसाठी वृत्तवाहिन्यांवर द्वेषयुक्त भाषेचा वापर
एसटी कर्मचार्‍यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आत
शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच ‘आवाज’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper