×

सत्यशोधनाची १५० वर्षे..

Published On :    24 Sep 2022
साझा करें:

२४ सप्टेंबर १८७३ रोजी महाराष्ट्राच्या इतिहासात एक अतिशय महत्त्वाची घटना घडली. महाराष्ट्राच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात या घटनेमुळे नवे संदर्भ जोडले गेले. लेखन व पत्रकारितेचे नवे पर्व निर्माण झाले, आणि समाजाच्या सामाजिक संरचनेत आमुलाग्र परिवर्तन घडले. स्त्रीयांच्या जीवन-जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्या. मूक समाजाला नवा आवाज आणि महाराष्ट्राला नवी दृष्टी मिळाली; त्या घटनेला यावर्षी १५० वर्षे होणार आहेत. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा जोतीराव फुले यांनी ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना करून महाराष्ट्राला नवे विचारपीठ खुले करून दिले.



२४ सप्टेंबर १८७३ रोजी महाराष्ट्राच्या इतिहासात एक अतिशय महत्त्वाची घटना घडली. महाराष्ट्राच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात या घटनेमुळे नवे संदर्भ जोडले गेले. लेखन व पत्रकारितेचे नवे पर्व निर्माण झाले, आणि समाजाच्या सामाजिक संरचनेत आमुलाग्र परिवर्तन घडले. स्त्रीयांच्या जीवन-जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्या. मूक समाजाला नवा आवाज आणि महाराष्ट्राला नवी दृष्टी मिळाली; त्या घटनेला यावर्षी १५० वर्षे होणार आहेत. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा जोतीराव फुले यांनी ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना करून महाराष्ट्राला नवे विचारपीठ खुले करून दिले.

धर्म राज्य भेद मानवा नसावे| सत्याने वागावे ईशासाठी ॥
ख्रिस्त, महंमद, मांग ब्राम्हणासी| धरावे पोटाशी | बंधू परी
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक| भांडणे अनेक कशासाठी?

असा विश्‍वव्यापी मानवतेचा विचार घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्मा’चा विचार स्पष्ट केला. मानवी समता व बंधुता यावर आधारीत मानवधर्माच्या प्रसारासाठी सत्यशोधक समाजाची उभारणी केली. अज्ञान - अंधश्रद्धा - अस्पृश्यता-विषमता याला नकार देऊन ज्ञान-विज्ञान-समानता आणि बंधुता यावर आधारीत समाजाची उभारणी करण्यासाठी सत्यशोधक समाजाची संकल्पना जोतीरावांनी मांडली, 


त्यामध्ये १) ईश्‍वरभक्ती करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. २) भटभिक्षुक धर्माचा धाक घालून अडाणी जनतेची पिळवणूक करतात त्यामुळे अडाणी लोकांची धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता करणे. ३) जमीनदार व सावकार यांच्या मगरमिठीतून शेतकर्‍यांची सुटका करणे. ४) शिक्षण सर्वांना सहज मिळावे व सर्वांनी शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न करणे ५) मनुष्य जन्माने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो, त्यामुळे जन्मजात श्रेष्ठत्त्वावर प्रहार करणे.


या प्रमुख उद्दिष्टांसाठी सत्यशोधक समाजाची उभारणी करण्यात आली. त्यानुसार प्रत्यक्ष कृती कार्यक्रम धडकपणे राबविण्यास सुरुवात झाली. सर्वसामान्य लोकांना ज्ञान मिळावे म्हणून जोतीराव जीवाचा आटापिटा करीत असतांनाच अडाणी समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवित होते. 


भटजीशिवाय लग्न लावण्यात सत्यशोधक समाजास प्रथम यश १८८० साली आले. त्यानंतर १८८४ सालापर्यंत ओतूर गावच्या साळी, माळी व तेली समाजाच्या लोकांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न लावलीत. एकीकडे जन्मजात श्रेष्ठत्त्व नाकारत भितीमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देत असतानाच शिक्षण आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत सत्यशोधक समाजाने लक्ष दिले. त्यासाठी ‘सत्यशोधक जलसे’ निर्माण करण्यात आले.


१८७७ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. या दुष्काळात गोरगरीबांसाठी महात्मा फुले यांनी अन्नछत्र उभारले. मे १८७७ मध्ये सत्यशोधक समाजाने एक विनंतीपत्रक प्रसिद्ध करून मदतीचे आवाहन केले. या अन्नछत्राची जबाबदारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी नेटाने पार पाडली. व्यसनांमुळे बहुजन समाजातील अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली असल्यामुळे सत्यशोधक समाजाने दारूच्या नवीन दुकानांना प्रखर विरोध केला. 


१८ जुलै १८८० रोजी पुणे नगरपरिषदेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष प्लॅकेट यांना पत्र लिहून महात्मा फुले यांनी नगरपालिकेने दारुच्या गुत्त्यांना परवानगी देऊ नये असे आवाहन केले होते. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत सत्यशोधक समाज सदैव अग्रभागी होता. शेती व शेतकर्‍यांच्या परिस्थितीबाबत विवेचन आणि विश्‍लेषण करून लेख, कविता, पुस्तके, जलसे लिहिण्यात येत असत. 


कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी ‘सुशिक्षण गृह’ (१८८४), दीनबंधू सार्वजनिक सभा (१८८४) स्थापन करून मागास व स्त्रीयांच्या प्रशिक्षणासाठी प्रयत्न केले. दीनबंधू सार्वजनिक सभेच्या माध्यमातून एक लाख सह्यांचा अर्ज पार्लमेंटकडे केला होता. ‘शेतकरी व कारागीर यांच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे’ यासाठी हा अर्ज करण्यात आला होता.


१८८९ साली ‘दीनबंधू फ्री स्कूल’ची स्थापना भालेकरांनी केली होती. कृष्णराव भालेकर हे सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते व महात्मा फुले यांचे कट्टर समर्थक होते. भालेकरांनी पोवाडे, लावणी लिहिल्या, तसेच ‘बळीबा पाटील’ ही कादंबरीसुद्धा लिहिली. ‘दीनबंधु’ ‘दीनमित्र, ‘शेतकर्‍याचा कैवारी’ ही वृत्तपत्रे चालवून सत्यशोधक समाजाचा प्रचार केला. 


कृष्णराव भालेकर यांच्याप्रमाणेच ज्ञानगिरी बुवा, धोंडीराम कुमार, ग्यानोबा झगडे, गणपतराव सखाराम पाटील, मुकुंदराव पाटील, तुकाराम पिंजन, भास्करराव जाधव, केशवराव विचारे गुरुजी, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, सत्यशोधक दासराम, आनंदस्वामी यांनी सत्यशोधक चळवळ तळागाळापर्यंत पोहचविली. सत्यशोधक आनंदस्वामी यांनी फार मोठा शेतकर्‍यांचा उठाव घडवून आणला होता. इतिहासात हा उठाव सातारा बेड १९२० या नावाने प्रसिद्ध आहे.


एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रे समाजातील शेतकरी- कष्टकर्‍यांच्या प्रश्‍नांची चर्चा करीत नसल्यामुळे लोकजागृतीसाठी वृत्तपत्रांची नितांत गरज निर्माण झाली. अशावेळी कृष्णराव भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी ‘दीनबंधू’ हे सत्यशोधक समाजाचे पहिले वृत्तपत्र सुरु केले. त्यानंतर १८७७ ते १९३० या कालखेडात जवळपास ६० नियतकालिके सत्यशोधकांनी काढली. 


‘दीनमित्र ( गणपतराव पाटील १८८८), ‘राघवभूषण’(गुलाबसिंह कौशल्य १८८८), ‘अंबालहरी’ (कृष्णराव भालेकर १८८९), ‘शेतकर्‍यांचा कैवारी (कृष्णराव भालेकर १८९२), ‘मराठा दीनबंधू (भास्करराव जाधव १९०१), दीनमित्र ( मुकुंदराव पाटील १९१०), ‘विश्‍वबंधू ( बळवंतराव पिसाळ १९११), जागरूक (वालचंद कोठारी १९१७), जागृति ( भगवंतराव पाळेकर १९१७), ‘डेक्कन रयत (अण्णासाहेब लट्ठे १९१८), ‘विजयी मराठा’ (श्रीपतराव शिंदे १९१९), ‘सत्यप्रकाश’ (नारायण विभूते १९१९), ‘गरिबांचा कैवारी’ (बाबूराव यादव १९२०), ‘भगवा झेंडा’ (दत्ताजीराव कुरणे १९२०), ‘तरुण मराठा’ (सखाराम पांडूरंग सावंत १९२०), राष्ट्रवीर (शामराव देसाई १९२१), प्रबोधन (के. सी. ठाकरे १९२१), संजीवन (द. भि. रणदिवे १९२१), ‘सिंध मराठा’ (दत्तात्रेय अणावकर १९२४), ‘हंटर’ (खंडेराव बागल १९२५), ‘मजूर’ (रामचंद्र लाड १९२५), ‘कर्मवीर’ ( शि. आ. भोसले १९२५), ‘नवयुग’( बाबासाहेब बोले १९२६), ‘सत्यवादी’ (बाळासाहेब पाटील १९२६), ‘ब्राम्हणेतर’ ( व्यंकटराव गोडे १९२६) ‘कैवारी’’ दिनकरराव जवळकर १९२८) यांसारखी नियतकालिके सत्यशोधक चळवळीत लोकजागृती घडवित होती. ‘जागृति’ हे साप्ताहिक बडोद्याहून, तर ‘सिंध मराठा’ हे कराचीहून प्रसिद्ध होत असे. सत्यशोधक चळवळीतील वृत्तपत्रे आणि पुस्तकांनी १८७३ पासून शंभर वर्षे लोकजागृती घडविली. आज जे काही सकारात्मक परिवर्तन समाज जीवनात घडल्याचे आपण पाहतो, त्यामागे सत्यशोधक चळवळीचे फार मोठे कार्य आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही.

डॉ. प्रवीण श्रीकृष्ण बनसोड
मो.९४२३४२५१२९

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यावर संसदेत च
‘द कश्मीर फाइल्स’ व्हल्गर आणि प्रोपगंडा : नदव लॅपिडच्या
उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
एससी समुदायातील ६ विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेतील
वन संवर्धन नियम २०२२ मुळे आदिवासींच्या अधिकारावर घाला
‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम
तोंडाने विष्ठा करणारा रेशिम बागेतील किडा
वेदमंत्रांच्या घोषात एनसीबीसीची सूत्रे स्विकारली: हंसर
छत्तीसगडमध्ये आता ७६ टक्के आरक्षण
आरोपमुक्तीच्या याचिकेवर सुनावणी का करू?
पॉक्सो कायद्याची १० वर्षे: जलदगती न्यायालये सुस्त
देश आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेलाय
देशातील बेरोजगारीत वाढ; नोव्हेंबरमध्ये दर ८ टक्क्यांवर,
‘ब्राह्मण भारत छोडो’
संभाजीराजेंच्या संघटनेने भगतसिंग कोश्यारींना काळे झें
कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या
भारतात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, ६६ टक्के शाळांमध्ये इंटरन
पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी...!
महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्याचे तुणतुणे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper