×

बालमृत्यू दरात थोडीशी घट आणि केंद्रातील आरएसएस सरकारने स्वत:ची थोपटली पाठ

Published On :    24 Sep 2022
साझा करें:

२०१४ मध्ये १ हजार मुलांमागे ३९ तर २०२० मध्ये २८ मृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण घटल्याचा अहवाल



नवी दिल्ली:  २०१४ मध्ये १ हजार मुलांमागे ३९ तर २०२० मध्ये २८ मृत्यू झाले. बालमृत्यूचे प्रमाण घटल्याचा अहवाल भारताच्या रजिस्ट्रार जनरलने जाहीर केला आहे. बालमृत्यू दरात थोडीशी घट झाली आणि केंद्रातील आरएसएस सरकारने स्वत:ची पाठ थोपटली आली आहे. परंतु बालमृत्यू होऊच नयेत यासाठी सरकारकडे काहीच उपययोजना नाहीत, त्यामुळे त्यांचे अपयश आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.


भारताचे रजिस्ट्रार जनरलने गुरुवारी जाहीर केलेल्या नमुना नोंदणी प्रणाली सांख्यिकी अहवाल २०२० नुसार, २०१९ मध्ये १ हजार मुलांमागे ३० मृत्यू झाले होते, तर २०२० मध्ये ही संख्या २८ वर आली आहे. २०१४ मध्ये मृतांची संख्या ३९ होती. २०१४ पासून देशात बालमृत्यू दर, पाच वर्षाखालील मृत्यू दर आणि नवजात मृत्यूदरात घट झाली आहे.


२०१९ मध्ये प्रत्येक १ हजार मुलांमागे ३५ मुलांचा मृत्यू झाला, तर २०२० मध्ये प्रत्येकी ३२ मुलांचा मृत्यू झाला. हा आकडा ग्रामीण भागात ३६ आणि शहरी भागात २१ नोंदवला गेला. मृत्यू दरातील वार्षिक घट ८.६ टक्के इतकी नोंदवली गेली. ५ वर्षांखालील मुलींचा मृत्यू दर (३३) मुलांच्या (३१) आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये यु ५ एमआरमध्ये सर्वाधिक ५ अंकांची घट झाली आहे. 


आयएमआरच्या आकडेवारीवर नजर टाकली तर एका वर्षात २ अंकांची घट झाली आहे. २०१९ मध्ये, प्रत्येकी १ हजार मुलांमागे ३० अर्भकांचा मृत्यू झाला आणि २०२० मध्ये, २८ अर्भकांचा मृत्यू झाला. एनएमआरच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यातही २ अंकांची घट झाली आहे. २०१९ मध्ये, प्रत्येकी १ हजार मुलांमागे २२ नवजात बालकांचा मृत्यू झाला आणि २०२० मध्ये २० नवजात बालकांचा मृत्यू झाला.


केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर बालमृत्यूचे प्रमाण कमी केल्याबद्दल देशातील सर्व आरोग्य कर्मचारी, काळजीवाहू आणि समुदाय सदस्यांचे अभिनंदन करत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. ते म्हणाले की, २०३० पर्यंत यूएनचे शाश्‍वत विकास लक्ष्य पूर्ण करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीमुळे आम्ही बालमृत्यूचे प्रमाण आणखी कमी करू शकू. 


एसआरएस अहवालानुसार, आतापर्यंत केरळ (४), दिल्ली (९), तामिळनाडू (९), जम्मू आणि काश्मीर (१२) पंजाब (१२) एसडीजी टार्गेटनुसार केरळ (८), तामिळनाडू (१३), दिल्ली (१४), महाराष्ट्र (८), जम्मू आणि काश्मीर (१७), कर्नाटक (२१), पंजाब (२२), पश्चिम बंगाल (२२), तेलंगणा (२३), हिमाचल प्रदेश (२४) आणि गुजरात (२४) बालमृत्यू कमी करण्यात यश आले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘स’ समागम आणि ‘म’ चा माफीनामा...!
सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यावर संसदेत च
‘द कश्मीर फाइल्स’ व्हल्गर आणि प्रोपगंडा : नदव लॅपिडच्या
उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
एससी समुदायातील ६ विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेतील
वन संवर्धन नियम २०२२ मुळे आदिवासींच्या अधिकारावर घाला
‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम
तोंडाने विष्ठा करणारा रेशिम बागेतील किडा
वेदमंत्रांच्या घोषात एनसीबीसीची सूत्रे स्विकारली: हंसर
छत्तीसगडमध्ये आता ७६ टक्के आरक्षण
आरोपमुक्तीच्या याचिकेवर सुनावणी का करू?
पॉक्सो कायद्याची १० वर्षे: जलदगती न्यायालये सुस्त
देश आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेलाय
देशातील बेरोजगारीत वाढ; नोव्हेंबरमध्ये दर ८ टक्क्यांवर,
‘ब्राह्मण भारत छोडो’
संभाजीराजेंच्या संघटनेने भगतसिंग कोश्यारींना काळे झें
कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या
भारतात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, ६६ टक्के शाळांमध्ये इंटरन
पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी...!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper