×

आगामी कालखंडात आमच्या मर्जीशिवाय दिल्लीत सरकार बनू देणार नाही

Published On :    25 Sep 2022
साझा करें:

ओबीसींची एकता स्थापित होणे गरजेचे-वामन मेश्राम यांचे प्रतिपादन



बनारस: आगामी कालखंडात आमच्या मर्जीशिवाय दिल्लीत सरकार बनू देणार नाही, आम्ही बनू देऊ तेव्हाच सरकार बनेल ना असा इशारा देतानाच ओबीसींची एकता स्थापित होणे गरजेचे असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. बनारस येथे राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या प्रथम राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर अखिल भारतीय कुणबी महासभेचे अध्यक्ष नंदकुमार बघेल, प्रा. जर्नादन यादव, चौधरी विकास पटेल उपस्थित होते.


मेश्राम म्हणाले, ओबीसी हा देशात मोठा समूह आहे. त्यामध्ये एनटी-१९७, एमबीसी-५० प्रकारच्या जाती आहेत. ओबीसी म्हणजे शेतकरी वर्गे आहे. तो मागास आहे. पूर्वीचा शुद्र म्हणजेच आजचा ओबीसी होय. एससी समूह अस्पृश्य आहे. ओबीसी हा स्पृश्य आहे. महाराष्ट्रात कुणबी ओबीसीमध्ये आहेत. परंतु मराठा ओबीसीमध्ये नाही. लेवा, कडवा पटेल, जाट वर्णव्यवस्थेत शुद्र  आहेत. मात्र ते ओबीसीत नाहीत. त्यामुळे ओबीसींची एकता स्थापित कशी जाईल यावर विचार करायला हवे. 


ओबीसींची एकता स्थापित करण्यासाठी एक आधार असायला हवे. त्यासाठी रसायन असायला हवे. सिंधु घाटी सभ्यतेत जाती नव्हत्या. प्राचीन भारतीय इतिहासात ओबीसी पूर्वीचे बुद्धीस्ट आहेत. त्यानंतर मूलनिवासी व त्या अगोदर ते नाग लोक आहेत. या नाग लोकांना झगडा ब्राम्हणांसोबत होता. नाग लोकांचे ब्राम्हणांनी ६ हजार २४७ जातीचे तुकडे केले. या देशावर नाग लोकांचे राज्य होते. आपल्या संस्कृतीवर त्यांनी घाला घातला आणि आपल्याच संस्कृतीला त्यांनी स्वत:ची संस्कृती म्हणून सांगितली. 


नवल वियोगी यांचे पुस्तक वाचले तर लक्षात येईल की, नाग लोक प्राचीन भारतात शासक होते. त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. पुरातत्विक प्रमाण देऊन त्यांनी ते सिद्ध केले आहे. एवढेच नाही तर महाभारतात नाग लोकांना जाळण्याचा इतिहास आहे. परंतु ती समजून घेण्याची दृष्टी असायला हवी. ब्राम्हण कधीच नागपंचमी करत नाही, नागपूजा करत नाही. 


बहुजन समाज नागपंचमी सण साजरा करतो. तुम्हांला काय करायचे आहे त्यासाठी पहिल्यांदा तुमच्या मनात भावना येतात, त्यानंतर विचार आणि मग एकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली जातात. आपण क्रमिक असमानतेनुसार ब्राम्हणांपेक्षा वेगळे आहोत. सार्‍या प्राचीन इतिहासात त्याचे दाखले सापडतील. लोकांना जागवण्याचे काम केले पाहिजे.


२०३० पर्यंत ३० टक्के लोक एकत्र आले तरी काम फत्ते होईल. म्हणजेच काम पूर्णत्वास जाईल. कारण ३१ टक्के घेऊन कॉंग्रेसने सरकार बनवले होते. त्यामुळे ८५ टक्केच लोक एकत्र आले पाहिजेत असे काही नाही. म्हणून संकल्प केला पाहिजे. संकल्प एक मानसिक स्थिती आहे. त्यावेळी ओबीसींमध्ये संकल्प करणारे एकमेव राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले होत, आता कुणीच ओबीसींमध्ये संकल्प करणारा सापडत नाही. 


आता आपली एवढी ताकद वाढली आहे की, १७-१७ राष्ट्रीय अधिवेशन घेत आहोत. त्यावेळी एक राष्ट्रीय अधिवेशन घेणे जमत नसे. २०३० पर्यंत आपल्या संघटनेची ताकद एक हजार पटीने वाढणार आहे. त्यामुळे आगामी कालखंडात आमच्या मर्जीशिवाय दिल्लीत सरकार बनू देणार नाही असा इशारा देतानाच त्यामुळेच समस्यांचे समाधान होणार आहे असे मेश्राम यांनी सांगितले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यावर संसदेत च
‘द कश्मीर फाइल्स’ व्हल्गर आणि प्रोपगंडा : नदव लॅपिडच्या
उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
एससी समुदायातील ६ विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेतील
वन संवर्धन नियम २०२२ मुळे आदिवासींच्या अधिकारावर घाला
‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम
तोंडाने विष्ठा करणारा रेशिम बागेतील किडा
वेदमंत्रांच्या घोषात एनसीबीसीची सूत्रे स्विकारली: हंसर
छत्तीसगडमध्ये आता ७६ टक्के आरक्षण
आरोपमुक्तीच्या याचिकेवर सुनावणी का करू?
पॉक्सो कायद्याची १० वर्षे: जलदगती न्यायालये सुस्त
देश आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेलाय
देशातील बेरोजगारीत वाढ; नोव्हेंबरमध्ये दर ८ टक्क्यांवर,
‘ब्राह्मण भारत छोडो’
संभाजीराजेंच्या संघटनेने भगतसिंग कोश्यारींना काळे झें
कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या
भारतात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, ६६ टक्के शाळांमध्ये इंटरन
पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी...!
महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्याचे तुणतुणे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper