×

१५१ अशैक्षणिक कामे शिक्षकांच्या माथी

Published On :    25 Sep 2022
साझा करें:

विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी?-राज्यातील शिक्षकांचा प्रश्‍न



मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात १५१ अशैक्षणिक कामे शिक्षकांच्या माथी मारल्याने शिक्षक वर्गावर कमी आणि शाळेबाहेरच जास्त दिसू लागले आहेत. आधीच कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीतील शिक्षणापासून कोसो दूर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावत असतानाच या विचित्र कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख दिवसेंदिवस खालावत चालल्याची चिंता आहे. भविष्यात या बाबींचा विचार होण्याची खरी गरज आहे. अशाप्रकारच्या अशैक्षणिक कामांमुळे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी? असा सवाल राज्यातील शिक्षक करताना दिसत आहेत.


कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी सर्वांत ‘सॉफ्ट टार्गेट’ असलेल्या शिक्षकांना वेठीस धरता येते, हे आजपर्यंतच्या सरकारी कामकाज पद्धतीवरून सिद्ध झाले आहे. आता तरी खूपच बरे दिवस आहेत; नाहीतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ही शिक्षक मंडळी गावोगाव फिरत होती. दर दहा वर्षांनी जनगणनेचे कामही या शिक्षकांची वाटच पाहते. 


विविध निवडणुकांचे कर्तव्य पार पाडणे, राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकार्‍याच्या कल्पकतेतून नवनवे समोर येणारे उपक्रम, शाळेत खिचडी शिजविण्यापासून अनेक शासकीय योजनांची वेगवेगळ्या पद्धतीने वारंवार मागितली जाणारी माहिती सादर करताना नाकीनऊ येतात. आपण अजूनही शिक्षणासारख्या पायाभूत सुविधांमध्येही म्हणावी तशी प्रगती करू शकलो नाही, इतकेच नव्हे तर रस्ते, ड्रेनेज, वीज आणि पाणी या माफक अपेक्षांचीही पुर्तताही झाली नसल्याची खंत आहे. जिल्हा परिषद शाळेत वीजबिलाची तरतूद नसल्यामुळे अनेक संगणक धूळखात पडले आहेत, मग नवनवीन तंत्रज्ञान वापरात येणार तरी कसे, हा प्रश्‍न आहे.


गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे ग म भ न या मुळाक्षरांचेही ज्ञान मिळवू न शकलेल्या विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगतीचे आव्हान असतानाच आपल्यावर सोपविलेल्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकच सतत व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा एकशिक्षकी, द्विशिक्षकी असल्याने तेथील चित्र तर फारच विदारक आहे. 


शासनाने नेमून दिलेल्या अशैक्षणिक कामांमुळे मुळात शिक्षकच शाळेवर नसल्याने त्याचा फोटो शाळेत लावला काय आणि न लावला काय, सगळे ‘मुसळ केरातच’ अशी स्थिती होणार आहे. वर्षभरात १५१ अशैक्षणिक आणि खर्डेघाशीची कामे करण्याच्या नादात शाळेत किती वेळ आणि किती दिवस शिक्षक उपस्थित राहणार? त्यांचे विद्यार्थ्यांशी नाते व पालकांशी संबंध कसे जुळणार? अशी अनुत्तरीत करणारी प्रश्‍नावली मोठी आहे. त्यातच भरीस भर म्हणून राज्यभरात शिक्षकांची ३१ हजार पदे रिक्त आहेत. या कामाचा अतिरिक्त भारही असतोच.


केवळ एका ऑगस्ट महिन्याचा शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण पाहिला तर त्यांच्यावर शिक्षणाच्या मूळ कामाव्यतिरिक्त कोणकोणत्या अतिरिक्त जबाबदार्‍या पडल्या होत्या, ते पाहता येईल. बीएलओ (मतदान अधिकारी) : शिक्षकांना मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याचा आदेश, उद्दिष्ट, त्याची पूर्तता करण्यासाठी तहसीलमध्ये बैठका, व्हॉट्सप संदेश, पुन्हा तत्काळ बैठक, हर घर तिरंगा : जनजागृती, प्रभातफेरी, गृहभेटी, विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणीचे आदेश, दशसूत्री उपक्रम : शाळा व्यवस्थापन समिती व पालक सभांचे आयोजन, उपक्रमांची माहिती लिंकद्वारे भरणे, ध्वजवंदन, 


ध्वजसंहिता जागृती : हर घर तिरंगा आढावा, दुपारी शिक्षण परिषद, शिक्षकांना मार्गदशन, हर घर तिरंगा : उपक्रम आढावा, गोषवारा, आजादी का अमृत महोत्सव : राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे उपक्रम, गाव व शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविणे, सांस्कृतिक कार्यक्रम करणे, माहिती संकलन करणे, विहित नमुन्यात सादर करणे, समूह राष्ट्रगान कार्यक्रम, बँक खाते बदल : गेल्या तीन वर्षांत चौथ्यावेळी बँक खाते बदलाचे आदेश होते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यावर संसदेत च
‘द कश्मीर फाइल्स’ व्हल्गर आणि प्रोपगंडा : नदव लॅपिडच्या
उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
एससी समुदायातील ६ विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेतील
वन संवर्धन नियम २०२२ मुळे आदिवासींच्या अधिकारावर घाला
‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम
तोंडाने विष्ठा करणारा रेशिम बागेतील किडा
वेदमंत्रांच्या घोषात एनसीबीसीची सूत्रे स्विकारली: हंसर
छत्तीसगडमध्ये आता ७६ टक्के आरक्षण
आरोपमुक्तीच्या याचिकेवर सुनावणी का करू?
पॉक्सो कायद्याची १० वर्षे: जलदगती न्यायालये सुस्त
देश आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेलाय
देशातील बेरोजगारीत वाढ; नोव्हेंबरमध्ये दर ८ टक्क्यांवर,
‘ब्राह्मण भारत छोडो’
संभाजीराजेंच्या संघटनेने भगतसिंग कोश्यारींना काळे झें
कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या
भारतात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, ६६ टक्के शाळांमध्ये इंटरन
पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी...!
महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्याचे तुणतुणे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper