×

धार्मिक अल्पसंख्यांकाविरोधात द्वेषपूर्ण सर्वाधिक गुन्हे भाजपाशासित राज्यांमध्ये

Published On :    23 Nov 2022
साझा करें:

खास करून मुस्लिम, ख्रिश्‍चन, शिख टार्गेट, ‘भारतातील धार्मिक अल्पसंख्याक’ अमेरिकन एनजीओचा अहवाल



नवी दिल्ली: धार्मिक अल्पसंख्यांकाविरोधात द्वेषपूर्ण सर्वाधिक गुन्हे भाजपाशासित राज्यांमध्ये दाखल करण्यात येत असून खास करून मुस्लिम, ख्रिश्‍चन, शिखांना टार्गेट करण्यात येत आहे. या गुन्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलीसांची भूमिका संशयास्पद आहे असेही  अमेरिकन एनजीओ कौन्सिल ऑन मायनॉरिटी राइट्स इन इंडिया (सीएमआरआय) ने प्रकाशित केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.


‘भारतातील धार्मिक अल्पसंख्याक’ नावाचा हा अहवाल रविवारी (२० नोव्हेंबर) दिल्लीस्थित प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे एनजीओद्वारे सार्वजनिक करण्यात आला. भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांची स्थिती, अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांची उदाहरणे, माध्यमांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व आणि इतर विषयांबद्दल माहिती देण्यात आली आहे.


वकील कवलप्रीत कौर, विद्यार्थी कार्यकर्ते सफूरा जरगर, निधी परवीन, शरजील उस्मानी आणि तजीन जुनैद यांनी हा अहवाल जारी केला. निधी, शर्जील आणि तजीन यांचाही अहवाल तयार करण्यात सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस होते. भाजपशासित राज्यांमध्ये अधिक घटनाद्वेषपूर्ण गुन्ह्यांवरील एका प्रकरणात, अहवालात काही प्रकरणांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणार्‍यरा एजन्सींच्या कृती द्वेषपूर्ण गुन्ह्यांना वाढवण्याच्या मार्गांचा तपशील देतात. 


या प्रकरणात, प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही डेटावर आधारित अहवाल सूचित करतो की २०२१ मध्ये भारतात ख्रिश्चन, मुस्लिम आणि शीख यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांची २९४ प्रकरणे नोंदवली गेली. यातील सर्वाधिक (१९२) गुन्हे मुस्लिमांविरुद्ध, ९५ ख्रिश्चन आणि सात शिखांविरुद्ध नोंदवले गेले. ख्रिश्चन समुदायाला मुख्यत्वे सक्तीच्या धर्मांतराच्या आरोपाखाली लक्ष्य करण्यात आले, तर मुस्लिम समुदायाला आंतरधर्मीय संबंध आणि गोहत्येच्या आरोपाखाली लक्ष्य करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बहुतांश घटनांमध्ये गुन्हेगार उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते किंवा हिंदू अतिरेकी गट होते.


धार्मिक अल्पसंख्याकांविरूद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्याच्या घटना मोठ्या प्रमाणात भाजपशासित राज्यांमध्ये घडल्या आहेत. शिखांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांची नोंदही केली जात नाही आणि प्रसारमाध्यमांद्वारे नोंदवली जात नाही. शीख समुदायाच्या सदस्यांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या प्रकरणांसाठी आमच्या प्राथमिक संशोधनादरम्यान सक्तीने बेपत्ता होणे आणि न्यायबाह्य हत्यांची अनेक प्रकरणे आढळून आली. द्वेषाच्या गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्यांना ताब्यात घेण्यात किंवा अटक करण्यात पोलिसांच्या पक्षपातीपणा कडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘स’ समागम आणि ‘म’ चा माफीनामा...!
सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यावर संसदेत च
‘द कश्मीर फाइल्स’ व्हल्गर आणि प्रोपगंडा : नदव लॅपिडच्या
उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
एससी समुदायातील ६ विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेतील
वन संवर्धन नियम २०२२ मुळे आदिवासींच्या अधिकारावर घाला
‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम
तोंडाने विष्ठा करणारा रेशिम बागेतील किडा
वेदमंत्रांच्या घोषात एनसीबीसीची सूत्रे स्विकारली: हंसर
छत्तीसगडमध्ये आता ७६ टक्के आरक्षण
आरोपमुक्तीच्या याचिकेवर सुनावणी का करू?
पॉक्सो कायद्याची १० वर्षे: जलदगती न्यायालये सुस्त
देश आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेलाय
देशातील बेरोजगारीत वाढ; नोव्हेंबरमध्ये दर ८ टक्क्यांवर,
‘ब्राह्मण भारत छोडो’
संभाजीराजेंच्या संघटनेने भगतसिंग कोश्यारींना काळे झें
कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या
भारतात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, ६६ टक्के शाळांमध्ये इंटरन
पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी...!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper