×

भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित

Published On :    25 Nov 2022
साझा करें:

मुंबईत १३ मुलांचा मृत्यू



नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा गोवर रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरात त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या महिन्यात मुंबईत गोवरमुळे १३ मुलांचा मृत्यू झाला आहे. बुधवारपर्यंत, शहरात २३३ पुष्टी झालेल्या प्रकरणांची नोंद झाली होती, त्यापैकी २०० हून अधिक गेल्या दोन महिन्यांत नोंदवले गेले होते. आतापर्यंत १३ मृत्यूंपैकी नऊ मृत्यू मुंबईत झाले आहेत, तर उर्वरित चार शहराच्या बाहेरील भागात नोंदवले गेले आहेत.


तर जवळपासच्या भागात (१७ नोव्हेंबरपर्यंत) मालेगावमधील ५१, भिवंडीतील ३७, ठाण्यात २८, नाशिकमधील १७, ठाणे ग्रामीणमध्ये १५, अकोला, नाशिक आणि यवतमाळमधील ११ यांचा समावेश आहे. १०-१० कल्याण-डोंबिवलीत तर वसई-विरारमध्ये नऊ-नऊ रूग्ण सापडले आहेत.


एका अहवालात दावा करण्यात आला आहे की २०२१ मध्ये भारतासह अनेक देशांमध्ये चार कोटी मुले गोवर लसीच्या डोसपासून वंचित राहतील. जेव्हा भारत विशेषतः महाराष्ट्र सध्या गोवरच्या प्रादुर्भावाशी झुंज देत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या एका महिन्यात १३ मुलांचा गोवरामुळे मृत्यू झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.


महाराष्ट्राव्यतिरिक्त बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड आणि केरळमध्येही रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे वृत्त आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार चिंतेत असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरू करण्याची तयारी सुरू आहे. पण आता ही केवळ भारताचीच समस्या नसून संपूर्ण जगासमोर गोवर रुग्णांची संख्या वाढण्याची समस्या समोर समोर आले आहे.


२०२१ मध्ये संपूर्ण जगात सुमारे चार कोटी मुलांना गोवर प्रतिबंधक लसीचा डोस मिळाला नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि अमेरिकेच्या सीडीसीने संयुक्तपणे जारी केलेल्या या अहवालात सुमारे २.५ कोटी मुलांना पहिला डोस मिळाला नाही आणि सुमारे १.४७ कोटी मुलांना दुसरा डोस मिळाला नाही. ही घसरण जगभरातून गोवरचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का आहे. 


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले की हे किती विडंबनात्मक आहे की कोविड विरूद्ध लस विक्रमी वेळेत बनवल्या गेल्या आणि सामान्य लसीकरण कार्यक्रमांवर वाईट परिणाम झाला आणि लाखो लोकांना धोका पोहचला. या समस्येचा भारतात व्यापक परिणाम झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या दोन महिन्यांत एकट्या मुंबईत २०० हून अधिक केसेस झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत समोर आलेल्या प्रकरणांच्या तुलनेत ही मोठी झेप आहे. एका अहवालानुसार, २०२१ मध्ये मुंबईत १० प्रकरणे होती आणि एकाचा मृत्यू झाला, २०२० मध्ये २९ प्रकरणे होती परंतु एकही मृत्यू झाला नाही आणि २०१९ मध्ये ३७ प्रकरणे आणि तिघांचा मृत्यू झाला.


भारतातील राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत, गोवरची लस प्रत्येक मुलाला दोन डोसमध्ये द्यावी लागते. पहिला डोस वयाच्या नऊ महिन्यांचा आणि दुसरा १५ महिन्यांच्या वयात द्यावा. कोविडमुळे लसीकरणावर परिणाम झाल्याचे अधिकार्‍यांनी मान्य केले आहे. एकट्या मुंबईत सुमारे २०,००० बालकांना गोवरची लस देता आलेली नाही. लस योग्य वेळी दिल्यास गोवर जवळजवळ पूर्णपणे टाळता येऊ शकतो. 


परंतु २०२१ मध्ये, जगभरातील केवळ ८१ टक्के मुलांना पहिला डोस मिळाला होता आणि ७१ टक्के मुलांना दुसरा डोस मिळाला होता. २००८ पासून पहिल्या डोसची ही सर्वात कमी जागतिक सरासरी होती. भारत अशा पाच देशांपैकी एक होता जिथे बहुतेक मुलांना पहिला डोस मिळाला नाही. ही परिस्थिती जगभरातील सरकारांसाठी चिंतेचा विषय बनू शकते. कारण जगातील कोणताही प्रदेश गोवरचे पूर्णपणे निर्मूलन आणि समूळ उच्चाटन करू शकला नाही आणि त्याचा विषाणू खूप लवकर सीमा ओलांडू शकतो.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यावर संसदेत च
‘द कश्मीर फाइल्स’ व्हल्गर आणि प्रोपगंडा : नदव लॅपिडच्या
उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
एससी समुदायातील ६ विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेतील
वन संवर्धन नियम २०२२ मुळे आदिवासींच्या अधिकारावर घाला
‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम
तोंडाने विष्ठा करणारा रेशिम बागेतील किडा
वेदमंत्रांच्या घोषात एनसीबीसीची सूत्रे स्विकारली: हंसर
छत्तीसगडमध्ये आता ७६ टक्के आरक्षण
आरोपमुक्तीच्या याचिकेवर सुनावणी का करू?
पॉक्सो कायद्याची १० वर्षे: जलदगती न्यायालये सुस्त
देश आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेलाय
देशातील बेरोजगारीत वाढ; नोव्हेंबरमध्ये दर ८ टक्क्यांवर,
‘ब्राह्मण भारत छोडो’
संभाजीराजेंच्या संघटनेने भगतसिंग कोश्यारींना काळे झें
कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या
भारतात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, ६६ टक्के शाळांमध्ये इंटरन
पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी...!
महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्याचे तुणतुणे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper