×

चिंताजनक: राज्यात २४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य, ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार

Published On :    14 May 2023
साझा करें:

संचमान्यतेमुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान होण्याची भीती



मुंबई: राज्य शासनाच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या संचमान्यतेमुळे २४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य ठरणार असून राज्यातील साधारणत: ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संचमान्यतेमुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान होणार आहे, अशी भीती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने व्यक्त केली आहे.


महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील व सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना २०२२-२३ च्या संच मान्यतेसंदर्भात एक निवेदन दिले असून त्यात त्यांनी ही संच मान्यता म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.


उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठासमोर शिक्षक भरती संबंधी सुमोटो याचिका सुरू आहे. या याचिकेत शासनाला २८ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. या याचिके संबंधी राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी २७ एप्रिल रोजी एक परिपत्रक काढलेले आहे. यात राज्यातील शिक्षक भरती ही ऑगस्ट २०२३ पासून सुरू करण्याचे संकेत दिलेले आहेत. या पत्रानुसार १५ मे २०२३ पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्याचे आधार कार्ड सरल प्रणालीमध्ये नोंदवून घेण्याचे व आधार संलग्नित विद्यार्थी संख्याच गृहीत धरून संच मान्यता करण्याचे निर्देश दिलेले आहेत.


यापूर्वी २०१५ मध्ये शिक्षणाच्या हक्क कायद्यातील तरतुदींचा चुकीचा निर्णय घेऊन १७ हजार शिक्षक अतिरिक्त करण्यात आलेले होते. त्यांचे समायोजन अजूनही पूर्णपणे झालेले नाही. वरील निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका क्रमांक ३३३७ /२०१६ व ३३३८/२०१६ प्रलंबित आहेत. वरील प्रलंबित याचिकांचा निर्णय लागेपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाने याचिका क्र. ४२९०/२०१६ नुसार देण्यात आलेले आहेत, असे विजय नवल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने पारीत केलेल्या आदेशानुसार शाळा प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, हे स्पष्ट केले असतानाही शालेय शिक्षण प्रशासन महाराष्ट्रात शिक्षण हक्क कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करीत आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.


८ मेपर्यंत एकूण २ कोटी ०९ लाख ९६ हजार ६२९ विद्यार्थ्यांपैकी १ कोटी ६९ लाख ५५ हजार ६८६ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध ठरवण्यात आलेले आहेत. एकूण २४ लाख ६० हजार ४७३ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध आहेत. १५ मे रोजी हे विद्यार्थी संच मान्यतेमधून वगळण्यात येतील व त्यामुळे साधारणतः २४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य होतील. यामुळे राज्यातील साधारणतः ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षक भरती ऑगस्टपर्यंत होऊच शकत नाही.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांत
शरद पवार आणि वामन मेश्राम एका मंचावर येण्याने भारतातील व
राजकारणात कधी सत्ता येते पण, जाते पण, पाय जमिनीवर चिकटून र
सर्व प्रमुख बँकांमधील कर्मचारी एकाच वेळी देशभरात संपाव
राष्ट्रीय महापरिवर्तन मोर्चाची स्थापना, 32 प्रादेशिक पक्
महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत पुन्हा सर्वसाामान्यां
ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या वाढली, तर ऑगस्ट 2023
जन्माचा दाखला देशभरात महत्त्वाचा पुरावा, आता आधार कार्ड,
साता़रात इ.स. १९१९ पर्यंत शिवाजी महाराजांची वाघ नखे असल्
भाजपा सरकार लवकरच बुडणार, आरएसएस संघटना आणि भाजपा सरकारच
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने कर्ज काढून जन
भाजपा नेत्यांची 80 टक्के भडकाऊ व जातीयवादी वक्तव्ये आणि ध
विदर्भ व मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी जात प्
जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, युुनोला युद्ध थांबवण्
नेत्यांकडून मुस्लिम द्वेषात व मुस्लिम धर्माविषयी वादग्
नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात
देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नको आहेत, त्यांच्या हाता
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या सरकारकडून जाणुनबुजून स
2 वर्षात डेंग्यूच्या आजाराने 600 मृत्यू, तर 4 लाख लोकांना डे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper