तर दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर त्याच दिवशी भाजपा मुख्यालयात प्रधानमंत्री मोदींवर पुष्पवृष्टी केल्याचा प्रकार - इंडिया गठबंधन
नवी दिल्ली : भारतात दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्यानंतर इंडिया गठबंधनने भाजपा सरकारच्या प्रधानमंत्री मोदीं सेलिब्रेशनचा निषेध करण्यात आला आहे आणि दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर त्याच दिवशी भाजपा मुख्यालयात प्रधानमंत्री मोदींवर पुष्पवृष्टी केल्याचा प्रकार घडला आहे असे इंडिया गठबंधनच्या अहवालात म्हटले आहे.
13 सप्टेंबर 2023 रोजी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून मुझमिल भट हे शहीद झाले होते. त्याच दिवशी भाजपा मुख्यालयात त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात भाजपा सरकारचा प्रधानमंत्री मोदींवर पुष्पवृष्टी केल्याचे चित्र समोर आले आहे.
भारतात दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यालयात झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल आयोजित कार्यक्रमाला विरोधी पक्षांच्या इंडिया गठबंधनने भाजपा सरकारचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा सत्कार करण्यात आला हे चुकीचे आहे, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये भयंकर हत्याकांड आजही सुरुच आहेे.
दक्षिण काश्मीरच्या कोकरनागमध्ये बुधवारी (१३ सप्टेंबर) 2023 झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, जम्मू-काश्मीर पोलिसांचे उपअधीक्षक (डीएसपी) हुमायून मुझमिल भट आणि मेजर आशिष धोंचक शहीद झाले होते. १९ राष्ट्रीय रायफल्स शहीद झाले.
त्याच दिवशी, दिल्लीतील भाजप मुख्यालयात नरेंद्र मोदी यांच्यासाठी भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता, जेथे जी-20 शिखर परिषद यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल भाजपा सरकारचे प्रधानमंत्री यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते जमले होते. मोदींनी भाजप कार्यालयाचा दौरा केला होता, त्यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली, त्यांनी जी-20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. एकीकडे भारतात दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे जवान शहीद झाल्याच्या नंतर मोदी सरकार आनंदात आहे हे सरकारचे वागणे चुकीचे व तिरस्काराचे आहे.
गुरुवारी (१४ सप्टेंबर) 2023 आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी सैनिक विभागाचे अध्यक्ष कर्नल रोहित चौधरी यांनी या घटनेवरून भाजपा सरकारचा प्रधानमंत्री मोदीं यांच्यांवर निशाणा साधला आणि ते म्हणाले, ..जेव्हा आमचे भारतीय जवान व सहकारी देशासाठी लढत होते आणि बलिदान देत होते, त्यावेळी आमचे भाजपा सरकारचे प्रधानमंत्री हे स्वताच्याच लोकांकडून स्वताचाच गौरव करत होते. फुलांचा वर्षाव होत होता, फुलांच्या हारांनी त्यांचे स्वागत केले जात होते आणि तिथे आमचे भारतीय जवान सोबती गोळ्या खात बलिदान देत होते.
शहीद जवानांच्या शोकाकुल कुटुंबीयांचा आणि प्रधानमंत्री कार्यालयात त्यांच्या आगमनाचा व्हिडिओ दाखवत ते म्हणाले, हे कसले प्रधानमंत्री , हे कसले भाजपा सरकार आहे जे स्वतःला देशभक्त म्हणवते, जे भारतीय जवान व लोकांचा आदर न करता असंवेदनशीलता दाखवत आहे. आपल्या भारतीय जवान शहीदकृहोत आहे आणि हे भाजपा सरकारच्या पक्षाच्या मुख्यालयात पुष्पवृष्टी केली जात आहे. ही लज्जास्पद गोष्ट आहे
.दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार साकेत गोखले यांनीही भाजप मुख्यालयातील उत्सवाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले की मोदींनी उत्सव एका दिवसासाठी ठेवला होता का?
त्यांनी ट्विटरवर दिलेल्या निवेदनात लिहिले आहे की, काय अत्यंत धक्कादायक आहे की, भाजपा सरकारचा प्रधानमंत्री मोदीं भाजप मुख्यालयात एका भव्य पार्टीसह जी-20 साठी स्वतःला सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला, तर या भारतीय जवान व शूर वीर पुरुषांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणि ही बातमी हे देखील बाहेर आली होती ख्तरीही होते. मोदी आपला जनसंपर्क फक्त एका दिवसासाठी पुढे ढकलू शकत नाहीत का? अशा दु खद घटनेच्या वेळी भाजपचा जयजयकार करणे आणि मोदींचा गौरव करणे बंधनकारक होते का?
13 सप्टेंबर 2023 रोजी भाजप मुख्यालयात पोहोचलेल्या भाजपा सरकारचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली हेएक धक्कादयक कृत्य आहे.राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार मनोज झा यांनीही हा सोहळा का पुढे ढकलण्यात आला नाही याबाबत प्रधानमंत्री यांच्याांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. ते म्हणाले, भाजपा सरकारचा प्रधानमंत्री आणि भाजप सरकारने भारत देशाला सांगावे की, आपल्या सशस्त्र दलातील अधिकारी आणि जवानांच्या अत्यंत समर्पणाच्या सन्मानार्थ 2 दिवसही पुढे ढकलण्यात येणारा एवढा महत्त्वाचा उत्सव कोणता होता?
ते पुढे म्हणाले, पुलवामाच्या वेळी उशिराने कळले, असे म्हटले होते, पण अनंतनागबाबत सकाळी कळल्यानंतरही उत्सव सुरूच होता. एक-दोन दिवस वाढवता आले नसते का?
विरोधी आघाडीचा भाग असलेल्या इंडिया गठबंधनचा भाग आम आदमी पक्षानेही भाजपा सरकारच्या प्रधानमंत्री यांच्याांवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले, एकीकडे शहीद जवानांची अंत्ययात्रा निघत असताना प्रधानमंत्री भाजपा सरकारचा जल्लोष करत होते... ही भारताच्या प्रधानमंत्री पदांच्या असंवेदनशीलतेची उंची आहे.
ते पुढे म्हणाले, तुम्ही (मोदी) जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवण्याचे आश्वासन दिले होते, पण कधी पुलवामामध्ये आमचे 40 जवान शहीद होतात, कधी आमच्या जवानांच्या तंबूंवर हल्ले होतात... पुलवामाच्या वेळी ते कामात व्यस्त होते. शूटिंग देश कोविड महामारीशी झुंजत होता, स्मशानभूमी आणि गंगेचे घाट मृतदेहांनी भरले होते पण प्रधानमंत्री बंगालच्या निवडणुकीत व्यस्त होते. भारतातील भाजपा सरकारने प्रायोजित दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, असेही सिंग म्हणाले.
आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:
email : news@mulniwasinayak.comAll content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.
It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.
Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.