×

दहाव्याला पिंडदान, कर्मकांड न करता २५ आंबे लागवड आणि समाज प्रबोधन उपक्रम

Published On :    2 May 2021  By : MN Staff
शेयर करा:


आष्टी ता.परतूर जि.जालना येथील राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे पदाधिकारी परमेश्‍वर भालशंकर यांच्या आईचा दहाव्याचे निमित्ताने कोणतेही कर्मकांड, मुंडन,पिंडदान न करता सत्यशोधक पध्दतीने २५ दर्जेदार केशर आंबे यांची लागवड स्वतःच्या शेतात करण्यात आले.





जालना: आष्टी ता.परतूर जि.जालना येथील राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे पदाधिकारी परमेश्‍वर भालशंकर यांच्या आईचा दहाव्याचे निमित्ताने कोणतेही कर्मकांड, मुंडन,पिंडदान न करता सत्यशोधक पध्दतीने २५ दर्जेदार केशर आंबे यांची लागवड स्वतःच्या शेतात करण्यात आले. झाडांच्या लागवड ठिकाणी आईच्या अस्थी विसर्जन केल्या. वृक्षारोपण हे हभप रामेश्‍वर तिरमुखे, रामप्रसाद थोरात, मौर्य क्रांती संघाचे अध्यक्ष बाबुराव गोसावी,पत्रकार उद्धव डोळस व संयोजक परमेश्‍वर भालशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सत्यशोधक वारकरी महासंघाचे राज्यकार्याध्यक्ष हभप रामेश्‍वर तिरमुखे यांचे सत्यशोधकीय प्रवचन झाले.


मायबापे केवळ काशी तेणे न जावे तीर्थाशी| या अभंगावर निरूपण करतांना त्यांनी विविध  क्रांतिकारी दृष्टांत दिले. ज्यामुळे या कृतीला उपस्थित यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. भालशंकर परिवाराचे अभिनंदन केले. यावेळी पुढे बोलतांना तिरमुखे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगाचे आपण कृतीतून आचरण करावे. 



कोणत्याही तीर्थाला जायचे गरज नाही,आपले माय बाप हेच देव आहेत,त्यांचीच सेवा करणे म्हणजे साक्षात देवाची सेवा होय. याचबरोबर छत्रपती शिवराय, महाराणी अहिल्यामाई होळकर यांचे वृक्षांच्या बाबतचे धोरण सांगितले. संत रवीदास, संत नामदेव, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई  फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सत्यशोधक विज्ञानवादी, विचार आत्मसात करून आचरण करावे,असे विश्‍लेषण यावेळी तिरमुखे यांनी केले.   

   
आजच्या युवा पिढीने  परंपरेने चालत आलेल्या प्रथा, परंपरा सोडून देऊन सत्यशोधक पद्धतीने वास्तुप्रवेश, लग्नसोहळा, दहाव्याच्या कार्यक्रम करावेत. सत्यशोधक पद्धतीने आजच्या युगाप्रमाणे बदल करणे गरजेचे आहे. जुनाट बुरसटलेल्या रुढीपरंपरेला बाजूला ठेवून विज्ञानवादी विचाराने करण्यात यावे. याबाबत अनेक प्रासंगिक उदाहरणे तिरमुखे यांनी दिले. 


आजची परिस्थिती अशी आहे की हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक मृत्यू होत आहेत. त्यामुळे मोफत आणि भरपूर ऑक्सिजन देणारे झाडे आपण लावली पाहिजेत ती संगोपन केली पाहिजेत असे संयोजक परमेश्‍वर भालशंकर यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाबूराव गोसावी यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित सिद्धेश्‍वर केकान, सिताराम सोनटक्के,मुंजा सागते, बाबासाहेब कावळे, दिलीप भालशंकर, विलास रोकडे, शशिकांत कावळे , घनश्याम माने आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम हा कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आला.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र-भाग-१
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र भाग-२
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम क
कोरोना काळातही आदिवासी बांधव दुर्लक्षितच, खावटी योजना क
राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघणार
सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्य
गुजरात मॉडेलचा बुरखा टराटरा फाटला; वृत्तपत्रे भरली शोकस
२०२० मध्ये जगभरात उपासमारीशी झगडणार्‍या १५.५ कोटींपैकी
केंद्रातील भाजपा सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकताय
सचिन वाझेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मोडले कंबरडे
कोरोना परिस्थिती कशी हाताळू नये हे भाजपा सरकारने जगाला द
राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांनी मराठा आरक्षण मिळवून द्या
मराठा आरक्षणासाठी पुन्हा कोर्टात जाणार
आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक
इमेज बिल्डींगसाठी ३०० सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांना जुं
मराठा आरक्षणाबाबत आज अंतिम निकालाची शक्यता
कोरोना काळात भरपूर कमावलंत, फी वाढवू नका
सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द
इंधन दर वाढ कायम; पेट्रोल १९ तर डिझेल २१ पैशांची वाढ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper