×

वाढते व्यसन आणि उपाय

Published On :    2 May 2021  By : MN Staff
शेयर करा:


बदलती जीवनशैली सोबत माणसाचे आहार आणि आजार बदलत चाललेला आहे. आपल्या आहारावर आपली शारीरिक प्रकृती अवलंबून असते, जसे जसे आपल्या दैनिक खानपानामध्ये बदल झाले तसे विकार आपल्याला जडायला लागले. एक महत्त्वाची गोष्ट विकार किंवा आजार जस जडले तर आपण तज्ञ वैद्याकडे जाऊन त्याचे निराकरण करून घेऊ शकतो.






बदलती जीवनशैली सोबत माणसाचे आहार आणि आजार बदलत चाललेला आहे. आपल्या आहारावर आपली शारीरिक प्रकृती अवलंबून असते, जसे जसे आपल्या दैनिक खानपानामध्ये बदल झाले तसे विकार आपल्याला जडायला लागले. एक महत्त्वाची गोष्ट विकार किंवा आजार जस जडले तर आपण तज्ञ वैद्याकडे जाऊन त्याचे निराकरण करून घेऊ शकतो. पण आजाराप्रमाणेच अजून एक समस्या आहे ती म्हणजे व्यसन. व्यसन याला दुसर्‍या भाषेत लत, सवय, किंवा एखादे काम करण्यासाठी विशिष्ट गोष्टीची आवश्यकता अशा अनेक प्रकारे त्याला संबोधता येते. कोणतेही व्यसन कोणत्याही आजारापेक्षा नक्कीच मोठे आहे. आजारावर उपचार करून, शस्त्रक्रिया करून आपल्याला त्याचे निदान करता येते. परंतु व्यसनाचे निदान करण्यासाठी औषध वा शस्त्रक्रिया उपयोगाची नसते. मग व्यसन दुर करायचे तरी कसे? हा प्रश्न उपस्थित होतो. आपण व्यसनाचे निदान कसे करायचे हे समजून घेण्याअगोदर आपण व्यसन कोणकोणत्या प्रकारचे असते हे समजून घेणे आवश्यक आहे.


बघा आजपर्यंत दारू, सिगारेट, अफु, गांजा, ड्रग्ज या पदार्थांचे सेवन करणार्‍या लोकांनाच व्यसनी म्हणून बघितलं जात होते. परंतु कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन न करणारा व्यक्ती व्यसनाधिन बनु शकतो का? तर याचे उत्तर आहे हा बनू शकतो. कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन न करता लागलेले व्यसन, सवय, लत खुपच घातक असते. आज मादक पदार्थांचे सेवन करता व्यसन लागण्यासाठी कारणीभुत आहे आपल्या हातातील मोबाईल, घरातील टीव्ही, आणि इतर उपकरणे जसे लॅपटॉप, व्हिडीओ गेम इत्यादी. मोबाईल, टीव्ही, व्हिडीओ गेम यामुळे व्यसन जडलेल्या व्यक्ती प्रत्येक घरात सापडतात.


ही गोष्ट सत्य असून नाकारता येत नाही हेही तेवढेच खरे आहे. आता आपल्याला या गोष्टीचे व्यसन लागले हे कसे ओळखायचे. बघा व्यसन कोणतेही असले तरी ते घातकच असते म्हणून कोणत्याही प्रकारचे व्यसन आपल्याला जडणार नाही, लागणार नाही याची खबरदारी घेऊन आपण आपले जिवन जगले पाहिजे. आज कमी पैशामध्ये जास्त इंटरनेट मिळते त्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोठा मोबाईल दिसतो. मग त्याला काम असो वा नसो मोठा मोबाईल हातात असणे म्हणजे आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न असतो. 


मग या मोबाईलचा वापर नेमका करायचा तरी कसा तर दिवसभर सोशल मिडीयावर सक्रिय रहायचे, मित्र मैत्रीणी सोबत बोलत रहायचे, कोणतेही काम करताना मोबाईल बाजूला करायचा नाही ही सवय असेल तर आपणास मोबाईलचे व्यसन लागले हे निश्चित. पुन्हा एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, मोबाईल वापरल्याने व्यसन लागत नाही तर त्याचा अतिवापर केल्याने आणि फक्त मोबाईलचाच विचार केल्याने व्यसन मात्र नक्की लागते. आपल्या मोबाईलचे व्यसन लागले की नाही हे कसे ओळखायचे तर खुप सोपे आहे. आपण दररोज मोबाईल वापरताना कोणत्या वेळेला वापरतो, किती वेळ वापरतो, सोशल मिडीयावर कोणत्या वेळी सक्रीय राहतो, हे बघून घ्यायचे आणि आपण स्वत: च्या च मनाशी ठरवायचे त्या वेळेत मी मोबाईल बघणार नाही. 


जसे तुम्ही रोज दुपारी बारा ते दोन मोबाईल हातात घेऊन सोशल मिडीयावर कोणाला बोलत असाल, काही मोबाइल मध्ये बघत असाल तर एक दिवस ठरवायचे या वेळेत मोबाईल बघणार नाही, सोशल मिडीयावर सक्रीय राहणार नाही, असे ठरवून तुम्ही दोन तास मोबाईलला हात लावला नाही, किंवा मोबाईलकडे बघण्याची इच्छा न होता तो दोन तासाचा वेळ सहज निघून जात असेल तर असे समजायचे तुम्हाला मोबाईलचे व्यसन लागलेले नाही. परंतु नियमित वेळेत तुम्ही मोबाईल आणि सोशल मिडीया याचा वापर करणे अवघड जात असेल, मोबाईल शिवाय वेळ जात नसेल, करमत नसेल तर आपण मोबाईल व्यसनाच्या आहरी गेले हे निश्चित समजा.


महिला घरकाम करताना टिव्ही किंवा मोबाईलवर काहीतरी मनोरंजनाचे कार्यक्रम बघत असतील, आणि टिव्ही मोबाईल सुरू नसेल तर कोणत्याही प्रकारच्या कामात मन लागत नसेल, काम वेळेवर होत नसेल, किंवा एखादा ठराविक कार्यक्रम बघण्यासाठी सर्व कामे लवकर आवरून टीव्ही समोर बसणे, किंवा कार्यक्रम बघितल्यानंतर उरलेले काम करणे असे कोणी करत असेल तर त्या महिलेला व्यसन लागलेले आहे असे समजावे. अनेक लहान मुलांना जेवण करताना सध्याच्या आई मोबाईल, टिव्ही दाखवून जेवु घालतात, त्यांना वाटते आपण मुलांचे मनोरंजन करत आहोत पण ते तसे नसते, हातात मोबाईल आल्याशिवाय लहान मुलं दुध सुद्धा पित नाहीत, जेवण करत नसतील तर त्या लहान जिवाला आपण स्वतः व्यसनाच्या खाईत ढकलत असतो आणि याची जाणीव आपल्याला राहत नाही. काही काही व्हिडीओ गेम खेळण्यात काही लोक, मुलं एवढे मग्न असताना ना व्हिडिओ गेम खेळले नाही तर त्यांना थोडे पण करमत नाही, वा जेवण जात नाही एवढे गाढ व्यसन लागलेले असते. 


व्यसनाचे काही लक्षणे अगदी साधे असतात, आपण साधं असली की पाहिजे ते लक्ष देत नाही, पाहिजे ते उपाय करत नाही म्हणून समस्या वाढत जातात. समस्या वाढल्यावर आपल्याला त्याचे परिमाण दिसायला लागतात. जसे जेवताना मोबाईल सुरू पाहिजे असल्यास मोबाईल सुरू नसला तर जेवन जात नाही, बाकीचे काम होत नाही, मन कुठे लागत नाही, व्हिडीओ गेम बंद झाल्याने कित्येक मुलांनी जिवन संपवले. व्यसन लागल्याने ती वस्तू नाही मिळाली की माणसाचे मन एका जागेवर राहत नाही. काही काही लोक तर डिप्रेशन मध्ये जातात. आपण काय करतो याचे भान राहत नाही, सतत नकारात्मक विचार येतात, हळूहळू मानसिक आजाराला सुरवात होते. बाब खूप छोटी असते परंतु परिणाम खूपच घातक असतात. म्हणून कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊन आपण व्यसनाधिन होऊ नये. व्यसन लागलेच किंवा व्यसन लाऊ नये म्हणून काय करायचे.


बघा मोबाईलच्या अती वापरामुळे डोके दुखी, झोप कमी होणे, झोप न झाल्याने चिडचिड होणे अशा प्रकारचे अनेक लक्षण आपल्या मध्ये येत असतात. हे लक्षण आपल्या मध्ये येऊ नाही म्हणून आपण सर्वात महत्त्वाचे अत्यावश्यक आहे तेव्हाच त्याचा वापर करावा. म्हणजे थोडक्यात वापरावर निर्बंध घालावे. मर्यादितपणे वापर करावा. परंतु ज्याला व्यसनच लागले आहे त्यांनी काय करावं तर जसे आपला मोबाईल खराब झाला तर चांगल्या रिपेअर शॉपवर आपण दुरूस्ती साठी देतो, मोबाईलला काही होऊ नाही म्हणून स्क्रीन गार्ड लावतो. 


पण आज खर्‍या अर्थाने ब्रेन गार्डची गरज आहे. आणि हे ब्रेन गार्ड म्हणजे मोटीवेशनल स्पिकर आणि समुपदेशक होत. समुपदेशकाकडनू (कॉन्सलर) योग्य ती माहिती घेऊन आपण आपले जिवन सुंदर बनवू शकतो. सर्दी खोकला ताप आला तर आपण डॉक्टर कडे जातो. मानसिक ताणतणाव आला तर आपण समुपदेशकाकडे जाऊन आपला उपचार करून घेतला तर आपले जिवन आपल्या हातात राहील नाहीतर पैशावाले, नोकरीवाले स्वतःचे जिवन स्वत: संपवितात याचे कारण सुरवातीला लागलेले व्यसन आणि त्यातून निर्माण झालेले डिप्रेशन. आपण फ्रि लाईम जगण्यासाठी समुपदेशकाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. तरच आपल्याला समाधान मिळेल.


विनोद पंजाबराव सदावर्ते
९१३०९७९३००



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र-भाग-१
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र भाग-२
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम क
कोरोना काळातही आदिवासी बांधव दुर्लक्षितच, खावटी योजना क
राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघणार
सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्य
गुजरात मॉडेलचा बुरखा टराटरा फाटला; वृत्तपत्रे भरली शोकस
२०२० मध्ये जगभरात उपासमारीशी झगडणार्‍या १५.५ कोटींपैकी
केंद्रातील भाजपा सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकताय
सचिन वाझेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मोडले कंबरडे
कोरोना परिस्थिती कशी हाताळू नये हे भाजपा सरकारने जगाला द
राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांनी मराठा आरक्षण मिळवून द्या
मराठा आरक्षणासाठी पुन्हा कोर्टात जाणार
आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक
इमेज बिल्डींगसाठी ३०० सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांना जुं
मराठा आरक्षणाबाबत आज अंतिम निकालाची शक्यता
कोरोना काळात भरपूर कमावलंत, फी वाढवू नका
सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द
इंधन दर वाढ कायम; पेट्रोल १९ तर डिझेल २१ पैशांची वाढ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper