×

केंद्रातील भाजपा सरकारविरोधात शेतकर्‍यांसहित कामगारही आले एकत्र

Published On :    3 May 2021  By : MN Staff
शेयर करा:


व्यापक संघर्ष करण्याचा निर्धार कायम





नवी दिल्ली: आता कामगारांच्या मागण्यांसहित शेतकर्‍यांनी लढण्याचा निर्धार केल्याने केंद्र सरकारला घाम फुटला आहे. त्यामुळे या शेतकरी आंदोलनाला रोखावे कसे याची केंद्र सरकारच्या माध्यमातून खलबते सुरू झाली आहेत. १ मे रोजी मजूर-किसान एकता दिवस साजरा करण्यात आला. भाजपा सरकारच्या धोरणांविरोधी संघर्ष करण्याचा विडा उचलण्यात आला.


यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्रीय किसान संघटना आणि संयुक्त किसान मोर्चासमवेत विभागी संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. विनाशकारी, लोकविरोधी, शेतकरीविरोधी, कामगारविरोधी कायदे बदलण्याची मागणी करण्यात आली. सरकारच्या धोरणांविरोधात संघर्षाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार प्रत्येक क्षेत्रात शोषण करत आहे. अशाच प्रकारे  कृषी कायद्याद्वारे अर्थव्यवस्था उद्धवस्त केली जात आहे.


खाजगीकरण सर्व उद्योग, सेवा, नैसर्गिक संसाधने, आरोग्य आणि शिक्षणात केले जात आहे. त्याच वेळी कामगारांवर गुलामगिरी लागू केली जात आहेत. कामगार संहिता लागू करून लोकशाही हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरअंकुश ठेवून हे फॅसिस्ट हेतूने राबविले जात आहेत. कोरोना वाढण्याला खासगीकरणामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत निर्माण झालेल्या अनागोंदीचा हा परिणाम आहे. 


एवढेच नव्हे तर भाजपा सरकारच्या लसीकरण धोरणात नफा मिळवून देण्यासही प्रोत्साहन मिळते जे लोकांच्या जीवाचे नुकसान करीत आहे. कामगार आणि शेतकर्‍यांच्या संयुक्त बैठकीत सर्व लोकांचे हक्क आणि रोजीरोटीच्या प्रश्‍नांवर देशव्यापी संघर्ष तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कामगार कायदे, कृषी कायदे व वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे, शोषण करणारे लस धोरण मागे घ्या आणि सर्वांसाठी मोफत लसीकरण सुनिश्चित कराA,  कृषी उत्पादनांसाठी एमएसपी द्या, खाजगीकरण- निर्गुंतवणूक धोरण थांबवा अशा प्रकारच्या मागण्यांवर विचार करण्यात आला आहे. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र-भाग-१
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र भाग-२
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम क
कोरोना काळातही आदिवासी बांधव दुर्लक्षितच, खावटी योजना क
राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघणार
सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्य
गुजरात मॉडेलचा बुरखा टराटरा फाटला; वृत्तपत्रे भरली शोकस
२०२० मध्ये जगभरात उपासमारीशी झगडणार्‍या १५.५ कोटींपैकी
केंद्रातील भाजपा सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकताय
सचिन वाझेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मोडले कंबरडे
कोरोना परिस्थिती कशी हाताळू नये हे भाजपा सरकारने जगाला द
राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांनी मराठा आरक्षण मिळवून द्या
मराठा आरक्षणासाठी पुन्हा कोर्टात जाणार
आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक
इमेज बिल्डींगसाठी ३०० सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांना जुं
मराठा आरक्षणाबाबत आज अंतिम निकालाची शक्यता
कोरोना काळात भरपूर कमावलंत, फी वाढवू नका
सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द
इंधन दर वाढ कायम; पेट्रोल १९ तर डिझेल २१ पैशांची वाढ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper