×

ईव्हीएम घोटाळा, शेतकरी आंदोलनासारख्या मूळ मुद्यांपासून ध्यान हटवण्यासाठीच कोरोना वाढू दिला

Published On :    3 May 2021  By : MN Staff
शेयर करा:


विचारपूर्वक रणनीती बनवली गेलेय-केंद्र सरकारवर वामन मेश्राम यांचा आरोप





पुणे: कोरोनाकडे दुर्लक्ष करून देशात अस्थिरता निर्माण करायची आणि त्याच मुद्याकडे लोकांचे लक्ष वेधायचे. ईव्हीएम घोटाळा, शेतकरी आंदोलन, कामगार कायदे बदलणे, महागाई, बेरोजगारी, उपासमारी या मूळ मुद्यांपासून ध्यान हटवण्यासाठीच कोविडकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि लोकांना मरू देण्यात आले. ही रणनीती विचारपूर्वक बनवली गेल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. एमनटीव्हीशी ते बोलत होते. त्यांची मुलाखत एमएनटीव्हीचे मुख्य संपादक कुमार काळे आणि सहसंपादक संकेत कांबळे यांनी घेतली.


ज्या प्रकारे व्यवस्थापन करण्यात आले, त्याला प्रशासनिक विफलतादेखील समोर आली आहे. याल जबाबदार कोण या प्रश्‍नाला उत्तर देताना मेश्राम म्हणाले, भारतात कोरोनापासून मरणार्‍यांची संख्या तीन ते चार लाख आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होताना असताना केंद्रातील भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. पहिल्या टप्प्यातील नियंत्रण आणि आताचे नियंत्रण याची तुलना केल्यास केंद्र सरकारची निष्क्रियता समोर येते. त्यामुळे केवळ याला प्रधानमंत्री जबाबदार आहेत. प्रधानमंत्री भाजपाचा प्रधानमंत्री असत नाही तर ते भाजपाचे नेते असतात. देशाचे प्रधानमंत्री असतात. सर्व लोकांचे प्रधानमंत्री असतात. अशा संकटाच्यावेळी प्रधानमंत्री उभे राहत नाहीत. त्यामुळे कोरोना वाढवण्याला केंद्र सरकार व नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.


कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ११ जणांची एंपावर कमिटी बनवण्यात आली. ती सर्वशक्तीमान कमिटी आहे. प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली ती कमिटी बनवण्यात आली आहे. याचा अर्थ मोदींच्या नेतृत्वात त्या कमिटीला आदेश द्यायला हवे होते. त्या कमिटीच्या माध्यमातून त्यांनी काम करून घ्यायला हवे होते. जर प्रधानमंत्रीच काय करत नसेल तर कमिटीला काय घेणे देणे आहे. त्यामुळे ही कमिटी निष्क्रीय झाली. परिणामी प्रशासनिक कमिटीला जबाबदार मानू शकत नाही. प्रधानमंत्री त्याला जबाबदार आहेत असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


निवडणूक आयोगालाही जबाबदार ठरवता येणार नाही, कारण सुनील अरोरा यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोग काम करत होता ते एका विभागाप्रमाणे होते. त्यामुळे त्यांचे नेतृत्वदेखील प्रधानमंत्र्यांच्या नियंत्रणात होते. परिणामी निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतले ते निवडणूक आयोगाचे नव्हतेच तर प्रधानमंत्री आणि भारत सरकारचेच होते. त्यामुळे या सर्व बाबींना नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. भारतात कोरोना वाढणार याची प्रधानमंत्र्यांना कल्पना होती की नाही? जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून दुसरी लाट येऊ शकते हा इशारा दिल्यानंतरही सरकार सतर्क का झाले नाही? प्रधानमंत्री स्वत: बोलत आहेत की, कोरोनाची त्सुनामी आली आहे. हे भयंकर राष्ट्रीय संकट निर्माण झाले आहे. त्याचा फायदा भाजपा सरकारलाच होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्र्यांनी घोटाळा करून निवडणूक जिंकली, त्यावरील लोकांचे लक्ष हटवण्यासाठी कोरोनाला वाढू देण्यात आले असाही आरोप मेश्राम यांनी केला.


देशात कोरोना फैलावेल तेव्हा सर्वोच्च न्यायालय ओपन होणार नाही. घोटाळ्यांवर सुनावणी होणार नाही. सर्वोच्च न्यायालय आता ओपन कोर्टसारखे काम करत नाही. १० टक्के कोर्टात काम सुरू आहे. ओपन कोर्ट नसल्याने ईव्हीएम घोटाळ्याच्या खटला प्रलंबित आहे. याचा फायदा नरेंद्र मोदींना होत आहे. राम मंदिराच्याविरोधातही दुसरा खटला दाखल झाला आहे. याची कुठल्याही प्रकारे सुनावणी होऊ नये यासाठी ओपन कोर्ट ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारला फायदा होत आहे असे माझे म्हणणे आहे. २४ तास निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणे बरोबर नव्हते, नरेंद्र मोदी यांनी एम्पावर कमिटीला सक्रीय करून काम करून घेऊ शकत होते. परंतु त्यांनी काम करून घेतले नाही. कारण कोरोना जेवढा वाढेल तेवढा शेतकरी आंदोलन दबले जाईल. ईव्हीएम घोटाळ्याचा विषय बाजूला पडेल. अशा अनेक बाबी आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक निष्क्रियता करून विचारपूर्वक रणनीती बनवण्यात आली आहे अशा शब्दात मेश्राम यांनी भाजपाच्या राजकारणाची पोलखोल केली.


शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आले. शेतकरी आंदोलन समाप्त करावे असेही सांगता येत नव्हते. मग अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली की, मीडियात कोरोनाचा विषय चालवला तर शेतकर्‍यांचा विषय आपोआप बाजूला पडेल. तसेच झाले आहे. त्यामुळे त्यांनी योजनापूर्वक सार्‍या बाबी घडवून आणल्या आहेत. हे देशाच्याविरोधात फार मोठे षड्यंत्र आहे. मोदींनी त्यांच्या पक्षाच्या हिताचे निर्णय घेतले हेच यातून दिसून येते ही दु:खाची बाब असल्याचे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


केंद्र सरकारला शक्तीशाली मानण्यात येते. कारण त्यांच्याकडे साधन-संसाधनांची कुठलीही कमतरता नाही. युनोच्या माध्यमातून भारताला मदत देण्यात येणार होती, परंतु आमच्याकडे आरोग्य व्यवस्था मजबूत असल्याचे सांगत केंद्र सरकारने मदत धुडकावली. केंद्र सरकार एवढे शक्तीशाली असते की सारी उपलब्धता ते पूर्ण करू शकतात. आता तर जीएसटीचा प्रत्येक राज्याचा वाटा आहे तोदेखील केंद्र सरकार त्या त्या राज्यांना देत नाही. जेवढी राज्य सरकार विफल होतील तेवढे संकट निर्माण होईल असे मेश्राम यांनी सांगितले. सरकारला वाचवण्यासाठी कोरोनाचा आसरा घेतला जात आहे का? या प्रश्‍नावर मेश्राम म्हणाले, हा भाजपा व आरएसएसचा आंधळा राष्ट्रवाद आहे. पुलवामा, कारगील सारख्या घटनांचा वापर करून राष्ट्रवादाला हवा देण्याचे काम त्यांचे सुरू असते. लोकही गप्पगुमान ऐकतात. हे भक्तांना खुश करण्यासाठी राष्ट्रवाद आहे. त्यामुळे ते खुशही होतात असेही मेश्राम यांनी स्पष्ट केले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र-भाग-१
मराठा आरक्षण, न्यायालयाची भूमिका आणि षड्यंत्र भाग-२
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम क
कोरोना काळातही आदिवासी बांधव दुर्लक्षितच, खावटी योजना क
राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघणार
सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्य
गुजरात मॉडेलचा बुरखा टराटरा फाटला; वृत्तपत्रे भरली शोकस
२०२० मध्ये जगभरात उपासमारीशी झगडणार्‍या १५.५ कोटींपैकी
केंद्रातील भाजपा सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकताय
सचिन वाझेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मोडले कंबरडे
कोरोना परिस्थिती कशी हाताळू नये हे भाजपा सरकारने जगाला द
राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांनी मराठा आरक्षण मिळवून द्या
मराठा आरक्षणासाठी पुन्हा कोर्टात जाणार
आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक
इमेज बिल्डींगसाठी ३०० सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांना जुं
मराठा आरक्षणाबाबत आज अंतिम निकालाची शक्यता
कोरोना काळात भरपूर कमावलंत, फी वाढवू नका
सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द
इंधन दर वाढ कायम; पेट्रोल १९ तर डिझेल २१ पैशांची वाढ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper